गावातली लोकं हनुमान समजून याची पूजा करतात, या मुलाची गोष्ट वाचण्यासारखी!

त्याला देवाचा दर्जा मिळालाय, दर्जा काय लोक त्याला देवच मानतायत.

गावातली लोकं हनुमान समजून याची पूजा करतात, या मुलाची गोष्ट वाचण्यासारखी!
lalit patidar Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 25, 2022 | 5:11 PM

जन्मापासूनच आपण प्रत्येक जण वेगवेगळे असतो. आपलं शरीर, आपला मेंदू, आपल्या सवयी सगळंच! शरीराचंच घ्या ना कुणी उंचीने वेगळं, कुणी नाका डोळ्यात विचित्र. कधीकधी हाच वेगळेपणा आपली खासियत असते. रतलामच्या नंदलेटा गावातल्या एका १७ वर्षीय तरुणाच्या विचित्र शरीरामुळे त्याला देवाचा दर्जा मिळालाय, दर्जा काय लोक त्याला देवच मानतायत. या 17 वर्षांच्या मुलाची तुलना हनुमान आणि जामवंत यांच्याशी केली जाते.

रतलामच्या नंदलेटा गावात 17 वर्षीय ललित पाटीदारच्या शरीरावर आणि चेहऱ्यावर जन्मापासूनच तपकिरी केस उगवले आहेत, ज्यामुळे तो विचित्र दिसतो.

सुरुवातीला घरच्यांनीही घाबरून जाऊन मुलाला बराच वेळ घरात डांबून ठेवलं, पण जेव्हा मुलाचं शिक्षण आणि भविष्यातील चिंतेनं पालकांना घेरलं, तेव्हा त्यांनी मुलाला शिकवण्यासाठी शाळेत पाठवण्याचं धाडस केलं.

केसांनी झाकलेले शरीर पाहून सुरुवातीला इतर मुलांना ललितची भीती वाटू लागली. हळूहळू मुलं आणि गावकरी ललितला आपलं प्रेम, आपुलकी देऊ लागले.

ललितचा आत्मविश्वास परत आला आणि गावकऱ्यांचा या विचित्र मुलाबद्दलचा स्नेह वाढल्यामुळे आज ललितला या चेहऱ्याने जगासमोर येण्याचे धाडस परत आले. 17 वर्षांचा ललित इयत्ता 12 वी मध्ये आहे आणि सामान्य माणसांप्रमाणे जीवन जगत आहे.

इतकंच नाही तर ललितला आता जास्त मान दिला जातोय. कुणी ललितच्या विचित्र रूपाची तुलना जामवंतशी तर कुणी हनुमानाशी तर कुणी गावात ललितची पूजाही करतात.

ललित आज जेव्हा आपल्या सहकाऱ्यांसोबत गावात फिरतो तेव्हा त्याला त्याचा विचित्रपणा लक्षात येत नाही आणि अभ्यासात तो नेहमी अव्वल असतो.

मला मित्रांमध्ये खेळायला आणि उड्या मारायला खूप आवडतं. ललितचा भाऊ म्हणाला की, सुरुवातीला लोक आणि मुले ललितला घाबरत होती, पण आता ललितला देव मानले जाते, आता संपूर्ण गाव ललितला खूप प्रेम देते.

lalit patidar

lalit patidar

माजी सरपंच इंद्रजीत सांगतात की, ललितच्या उपचारासाठी खासदार सुधीर गुप्ता यांच्याशी चर्चा झाली. बड्या डॉक्टरांच्या संपर्कातून वयाच्या २१व्या वर्षानंतरच उपचार अशक्य असल्याचं समोर आलं, त्यामुळे आता वयाच्या २१ व्या वर्षानंतरच ललितवर उपचार शक्य आहेत.

ललितला त्याच्या विचित्र रूपाबद्दल देवाकडे कोणतीही तक्रार नाही आणि आता काही वर्षांनी ललितचा उपचार प्लास्टिक सर्जरीने शक्य होणार आहे.

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.