काय सोनं लागलंय का ? 29 कोटींना विकला गेला हा मासा, कारण काय तर…
Bluefin Tuna Sells For Record $3.2 Million : जपानच्या प्रसिद्ध टोयोसु (Toyosu) फिश मार्केटमधील वर्षातील पहिला लिलाव नेहमीच चर्चेचा विषय असतो, परंतु यावेळी ब्लूफिन ट्यूनाच्या लिलावाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. या माशाच्या खरेदीसाठी जी किंमत मिळाली ना त्यात अनेक बंगले उभे राहतील.

Tokyo Fish Auction : जपान (Japan) च्या टोकियामोधून एक अशी बातमी समोर आली आहे ना की त्याने संपूर्ण जग आश्चर्यचकित झालं आहे. येथे, नवीन वर्षाच्या (New Year 2026) पहिल्या लिलावात, एका माशाची विक्री झाली. पण तो इतक्या मोठ्या किमतीला विकला गेला की तेवढ्या पैशषात आपल्याकडे कित्येक बंगले बाँधले जाऊ शकतात, एखादी छोटी मोठी कंपनी वर्षभर आरामात चालेल. आपण एका ब्लूफिन टूनाबद्दल बोलत आहोत ज्याच्या लिलावाने जगात नवा इतिहास रचला आहे.
जपानच्या प्रसिद्ध टोयोसु फिश मार्केटमध्ये (Toyosu) वर्षातील पहिला लिलाव अनेकदा चर्चेत असतो, परंतु यावेळी ब्लूफिन ट्यूनाच्या लिलावाने सर्वांनाच धक्का बसला. तुम्हाला हे वाचून कदाचित धक्का बसेल पण 243 किलो वजनाचा हा मासा 510 मिलियन येन (सुमारे 29 कोटी रुपये) एवढ्या किमतीला विकण्यात आला. उच्च दर्जाच्या ट्यूनासाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तर जपानमधील ओमा किनाऱ्यावर हा मासा पकडण्यात आला. पण इतक्या जास्त किमतीत हा मासा कोणी विकत घेतला आणि का ? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. चला जाणून घेऊया..
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा ब्लूफिन टूना मासा जपानच्या आघाडीच्या सुशी चेन ‘सुशी झनमाई’ची मूळ कंपनी कियोमुरा कॉर्पोरेशनने खरेदी केला आहे. कंपनीचे मालक, कियोशी किमुरा हे “टूना किंग” म्हणून ओळखले जातात. आणि त्यांनी 2019 मध्ये रचलेला स्वतःचा विक्रम मोडत या माशासाठी सर्वोच्च बोली लावत ती जिंकलीदेखील. तेव्हा त्यांनी 333. 6 दशलक्ष येन (१९ कोटी रुपयांहून अधिक) बोली लावून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. पण आता यावर्षी या माशासाठी त्यांनी तब्बल 29 कोटी रुपये खर्च केले आगेत.
एवढी किंमत मिळण्यासारखं काय खास आहे या माशात ?
खरंतर जपानमध्ये, नवीन वर्षात होणाऱ्या पहिल्या लिलावात सर्वात मोठा मासा खरेदी करणे शुभ मानले जाते. हे व्यवसायात समृद्धी आणि शुभेच्छा यांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे इतक्या मोठ्या बोलीमुळे, एवढ्या किमतीमुळे ‘सुशी झनमाई’ या सुशी चेनला जगभरात मोफत प्रसिद्धी मिळते. ग्राहकांना आकर्षित करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. या माशाला मिळालेली किंमत हा जगभरात चर्चेचा विषय ठरला आहेय
जपानच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची आशा आहे, असं या लिलावानंतर टूना किंगने सांगितलं. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या टूना फिशसाठी 29 कोटी रुपये मोजल्यानतंरही टूना किंग आता हा मासा जास्त किमतीत विकणार नाहीत. ही खरेदी नफा कमविण्यासाठी नाही, तर ग्राहकांसोबत नवीन वर्ष साजरे करण्यासाठी आहे असं ते म्हणाले. या लिलावानंतर, हाँ ब्लूफिन टूना सर्व सुशीझानमाई आउटलेटवर पाठवण्यात आला, जिथे तो ग्राहकांना सामान्य सुशीच्याच किमतीत विकला जाणार आहे.
