कांदिवलीतील बेकायदेशीर आरएमसी प्रकल्प बंद करावा, बहुजन समाज पक्षाची मागणी
कांदिवली पश्चिम येथील बेकायदेशीर असणारा आरएमसी प्रकल्प बंद करावा अशी मागणी बहुजन समाज पक्षाकडून करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कांदिवली पश्चिम येथील बेकायदेशीर असणारा आरएमसी प्रकल्प बंद करावा अशी मागणी बहुजन समाज पक्षाकडून करण्यात आली आहे. याबाबत चारकोप विधानसभा अध्यक्ष सुनील मारूती शेजवळ यांनी सहायक आयुक्त आर दक्षिण विभाग कांदिवली पश्चिम, पोलिस निरीक्षक वाहतूक कांदिवली वाहतूक विभाग आणि उपप्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव यांना पत्र लिहिले आहे. या त्यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
बहुजन समाज पार्टीचे प्रशासनाला पत्र
सर्वे क्र.164 -सी न.भू.क्र. 1910, तुळसकरवाडी, महात्मा गांधी छेदित मार्ग क्र 1 कांदिवली (पश्चिम) या ठिकाणी बिल्डर अश्विन शेठ यांच्या कंपनीतर्फे “अॅडमॉन्ट” या इमारतीचे बांधकाम सुरु आहे, मात्र सदर ठिकाणी बिल्डरने अनधिकृत आर एम सी प्रकल्प उभारला असून मनपा च्या सर्व अटी व नियमांना बगल देत दररोज किमान 70-80 ट्रक-डंपर अशी अवजड वाहने सदरील बांधकामाच्या आर एम सी प्लांट मधून भरभरून बाहेरच्या बांधकाम साइट्सवर पाठवण्यात येतात
त्यामुळे आजूबाजूच्या 2 कि.मी. च्या परीछक्षेत्रामध्ये धुलीकण व धुराळ्यामुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास होत आहेत, विशेष म्हणजे हा प्रकल्प रहिवासी क्षेत्राच्या 50 मीटर व शाळा क्षेत्राच्या 100 मीटर अंतरावरच सुरु आहे या ठिकाणी दिवसभर शाळेतील मुले व त्याची वाहतूक करणाऱ्या शाळेच्या बसेस यांची वर्दळ असताना या प्रकल्पातून आत बाहेर करणा-या अवजड वाहनांमुळे अनेकदा अपघाता सारखी परिस्थिती उदभवली आहे. शिवाय या ठिकाणी ट्रॅफिक ची समस्या ही रोजचीच झाली आहे
आमची आपणास विनंती आहे की सदर बांधकाम साइटवरील बेकायदा व सर्व नियम पायदळी तुडवणाऱ्या “आरएमसी प्रकल्पावर बंदी आणावी अन्यथा आमच्या पक्षाकडून स्थानिक रहिवाशांच्या सहभागाने मोठे आदोलन उभारण्यात येईल.
आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (MPCB) अॅडमॉन्ट इमारतीच्या बांधकामाला परवानगी मिळाली आहे. प्रदूषण नियमांचे पालन करण्याच्या अटीवर ‘ऑरेंज/एसएसआय’ श्रेणीअंतर्गत काम ही परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी मुख्यत्वे तीन कायदे जल प्रदूषण कायदा, 1974 (कलम 26) पाण्याचे प्रदूषण रोखण्याबाबत. वायू प्रदूषण कायदा, 1981 (कलम 21): हवेचे प्रदूषण रोखण्यासाठीबाबत. धोकादायक कचरा व्यवस्थापन नियम, 2016 कारखान्यातून निघणाऱ्या घातक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत यांअंतर्गत देण्यात आली आहे.
फोन करून पदाधिकारी रडतात, माझ्यासोबत... अभिजीत अडसूळांचा भाजपवर आरोप
तासाभरासाठीही हेलिकॉप्टर मिळेना... काँग्रेसच्या बड्या नेत्याची दमछाक
मुरळीधर मोहोळ राजकारणातून संन्यास घेणार? थेट विरोधकांना आव्हान
दोन्ही NCP एक होणार? ते सावरकरांबद्दल काय म्हणायचय? बघा दादांची मुलाखत

