सोनाराच्या दुकानात जोडप्याची चोरी, कुत्र्याची शक्कल पाहून तुम्हीही म्हणाल वाह वाह!

चोरीच्या अनेक घटना दररोज घडत असतात. अशा घटना अनेकदा सीसीटीव्हीमध्ये कैद होतात आणि ते कॅप्चर झाल्यानंतर ते व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात चांगले कपडे घातलेले एक जोडपे सोनाराच्या दुकानात जाते आणि चोरी करण्याचा प्रयत्न करते. पण ते यात यशस्वी होत नाही आणि शेवटी कुत्रा त्यांच्यावर हल्ला करतो.

सोनाराच्या दुकानात जोडप्याची चोरी, कुत्र्याची शक्कल पाहून तुम्हीही म्हणाल वाह वाह!
Viral video of Robbery

मुंबई : चोरीच्या अनेक घटना दररोज घडत असतात. अशा घटना अनेकदा सीसीटीव्हीमध्ये कैद होतात आणि ते कॅप्चर झाल्यानंतर ते व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात चांगले कपडे घातलेले एक जोडपे सोनाराच्या दुकानात जाते आणि चोरी करण्याचा प्रयत्न करते. पण ते यात यशस्वी होत नाही आणि शेवटी कुत्रा त्यांच्यावर हल्ला करतो. हा व्हिडीओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे, जो पाहिल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्ते दुकानदाराच्या युक्तीची प्रशंसा करत आहेत.

व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की एक जोडपे सोनाऱ्याच्या दुकानात जात आहे. पुरुष सूट बूटमध्ये दिसत आहे तर महिलेने गाऊन परिधान केला आहे. तिने तिच्या आउटफिटला मॅच करणाऱ्या मेकअपचाही वापर केला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ते सुवर्णकाराच्या दुकानात पोहचताच त्यांना दुकानात विविध प्रकारचे दागिने दिसतात. जेव्हा दोघेही दुकानात प्रवेश घेतात, तेव्हा त्यांच्या हातात एक रिकामा बॉक्स असतो. काही काळानंतर तो माणूस त्या दुकानदाराला बोलण्यात गुंतवतो आणि ती महिला हातातील बॉक्स बाजूला ठेवलेल्या दागिन्यांवर ठेवते.

थोड्या वेळाने दोघेही नाटक करतात की त्यांना दुकानात काहीही आवडले नाही, म्हणून त्यांनी जायला हवे. जेव्हा ते दुकानातून बाहेर पडतात, तेव्हा ती महिला दागिन्यांसोहत तो बॉक्स उचलते आणि पुढे जाते. पण या दरम्यान एक मजेदार गोष्ट घडते. खरं तर, जेव्हा ती स्त्री तो बॉक्स उचलते तेव्हा तिच्या लक्षात येत नाही की त्या दागिन्यांच्या बॉक्सला दोरी बांधलेली आहे. पण, दुकानदाराच्या हे लक्षात येते की हे दोघे चोरी करायला आले आहेत.

त्यानंतर ती महिला तिच्या साथीदार चोराच्या हातात बॉक्स देऊन तिथून पळून जाते आणि दुकानात उपस्थित कुत्रा त्या माणसावर हल्ला करतो. सोशल मीडिया वापरकर्ते या व्हिडिओवर बऱ्याच प्रतिक्रिया शेअर करत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर केला गेला आहे. बरेच वापरकर्ते या दुकानदाराच्या युक्तीची प्रशंसा करत आहेत.

संबंधित बातम्या :

Video | घोड्यावर उभे राहत पैसे उधळले, पण मध्येच घोळ झाला, नवरदेवासह माणसाची चांगलीच फजिती, व्हिडीओ व्हायरल

Video: कंगव्याच्या आत भरला कॅचअप, नवऱ्याच्या प्रँकमुळे बायको चवताळली, व्हिडीओ तुफान व्हायरल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI