AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : अरेच्चा! हे अस्वल तर फुटबॉलपटूंनाही लाजवेल, दमदार फुटबॉल स्कील्स पाहतच रहाल

इंटरनेटवर दररोज काही हटके व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये प्राणी आणि लहान मुलांच्या व्हिडीओजना नेटकरी फार डोक्यावर घेतात. असात दोन अस्वलांचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये अस्वल चक्क फुटबॉल खेळत आहे.

VIDEO : अरेच्चा! हे अस्वल तर फुटबॉलपटूंनाही लाजवेल, दमदार फुटबॉल स्कील्स पाहतच रहाल
अस्वल फुटबॉल खेळताना
| Edited By: | Updated on: Sep 14, 2021 | 11:27 AM
Share

मुंबई : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी सेलेब्रेटींचे, तर कधी बच्चे कंपनीचे. पण यामध्ये प्राण्यांच्या व्हिडीओजना नेटकऱ्यांची सर्वाधिक पसंती मिळते. प्राण्यांच्या निरागसपणावर अनेकजण फिदा होतात. त्यामुळे सर्वाधिक प्रेम हे प्राण्यांच्या व्हिडीओजना मिळतं. असाच एक प्राण्यांचा व्हिडीओ व्हायरल होत असून यात चक्क अस्वल फुटबॉल खेळताना दिसत आहे. जंगलामध्ये दोन अस्वलांना फुटबॉल सापडला असता, ते त्याची अगदी मजा घेऊन फुटबॉलपटूंप्रमाणे स्टंट देखील करत आहेत. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये दोन अस्वलं जंगलात खेळताना दिसत आहेत. त्यांच्यापासून काही अंतरावर असणाऱ्या लोकांनी हा व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये दोन अस्वलं अगदी मजेत फुटबॉल खेळत आहेत. तर हा व्हिडीओ शूट होण्यापूर्वी काही मुलं फुटबॉल खेळत असताना त्यांचा फुटबॉल जंगलात गेला. हा बॉल अस्वलांना सापडताच ते त्याच्योसोबत मस्ती करु लागले. त्यानंतर ती मुलं तिथे आली असता त्यांनी पाहिलं अस्वल त्यांच्या फुटबॉलसोबत मस्ती करत आहेत. मग त्यातील काहींनी या सर्वाची शूटींग केली.

व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट होताच लोकांनी अनेक कमेंट्स करायला सुरुवात केली. एका यूजरने  हा व्हिडीओ अगदी कमाल आहे असं लिहिलं. तर दुसऱ्याने अस्वलांना फुटबॉल खेळताना पाहून माझा दिवस बनला, असंही लिहिलं आहे. तर एका युजरने कमेंटमध्ये लिहिलं की, या व्हिडीओतून अस्वलांनी त्यांनाही फुटबॉल खेळता येतो हे दाखवून दिलं आहे. सध्या जगभरात हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकजण या व्हिडीओला लाईक आणि शेअर करत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सूफियान नामक व्यक्तीने पोस्ट केला है. 13 सप्टेंबर ला हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तेव्हापासून या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक केले जात आहे.

इतर बातम्या :

VIDEO : पिझ्झा पाहून बाळाने दिली लाखमोलाची Reaction, व्हिडीओ पाहून नेटकरीही खुश

अवघ्या 17 महिन्यात 3 कोटींचं कर्ज फेडलं, महिलेनं सांगितली पैसे बचतीची ‘आयडियाची कल्पना’!

Video | डोळे मिटलेले, चेहऱ्यावर हसू, गाणं ऐकणारा गोड चिमुकला एकदा पाहाच !

(Two wild bears playing football video went viral on social media see bears playing Football)

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.