AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑक्टोपस आणि जेलीफिशसारखा दिसणारा हा विचित्र मासा! Video

आजकाल सोशल मीडियावर याच्याशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक अतिशय विचित्र प्राणी पाहायला मिळतोय.

ऑक्टोपस आणि जेलीफिशसारखा दिसणारा हा विचित्र मासा! Video
rare fishImage Credit source: Social Media
| Updated on: Nov 25, 2022 | 6:08 PM
Share

या जगात लाखो प्राणी आहेत त्यातील अनेक प्राणी आपण रोज पाहतो, परंतु असे अनेक प्राणी आहेत जे फारच दुर्मिळ आहेत. ते अधूनमधूनच दिसतात. त्याचबरोबर पृथ्वीवर आणि खोल सुमद्रात असे काही जीव आहेत, जे दिसत नाहीत आणि जेव्हा जेव्हा लोकांना दिसतात तेव्हा ते आश्चर्यचकित करतात. अनेक वेळा असे विचित्र जीव दिसतात, जे पाहून प्रत्येकालाच आश्चर्याचा धक्का बसतो. आजकाल सोशल मीडियावर याच्याशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक अतिशय विचित्र प्राणी पाहायला मिळतोय. आता या विचित्र प्राण्याला पाहून लोकांना आश्चर्य वाटतं की हे नेमकं आहे काय?

हा विचित्र प्राणी ऑक्टोपससारखा दिसतो, पण या प्राण्याला भरपूर पाय आहेत, जे पक्ष्यांच्या पंखांसारखे दिसतात. समुद्राच्या खोलगट भागात हे पंख हवेत उडत असल्याप्रमाणे फडफडत असतात.

हा एक रहस्यमय मासा असल्याचं बोललं जात आहे. ऑक्टोपस आणि जेलीफिशसारखा दिसणारा हा मासा किती विचित्र दिसतो, हे तुम्ही व्हिडिओत पाहू शकता.

अवकाशात अनेक रहस्यमय जीव असू शकतात, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. पण समुद्राच्या खोल भागातही अशी रहस्ये दडलेली आहेत, ज्यांच्याविषयी पृथ्वीवर राहणाऱ्या मानवालाही माहिती मिळू शकलेली नाही. हा गूढ मासाही याचे उदाहरण ठरू शकतो.

या रहस्यमय माशाचा समुद्रात तरंगतानाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @OTerrifying नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘प्रशांत महासागरात तरंगताना दिसणारा रहस्यमय मासा’.

20 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 29 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर 1 लाखांहून अधिक लोकांनीही या व्हिडिओला लाईक केलं आहे.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.