Video: या व्हिडीओने तुमच्या डोळ्यात पाणी नाही आणलं तर समजा, तुमचं काळीज दगडाचं होत चाललंय!

आजही लोक कृष्ण-सुदामाच्या मैत्रीचे उदाहरण देतात, ज्यामध्ये कसलीही भिंत नव्हती, फक्त मैत्री होती, अशी मैत्री होती, ज्यावर सर्वस्व, संपत्ती, जमीन असो, सगळ्याचा त्याग व्हायचा. अशी मैत्री आजच्या काळात क्वचितच पाहायला मिळते.

Video: या व्हिडीओने तुमच्या डोळ्यात पाणी नाही आणलं तर समजा, तुमचं काळीज दगडाचं होत चाललंय!
याला म्हणतात खरी मैत्री

प्रत्येक नात्यापेक्षा मैत्रीचं नातं मोठं असतं असं म्हणतात. मैत्री खरी असेल तर माणूस कोणत्याही गोष्टीतून निघून यशाकडे झेप घेतो. आजही लोक कृष्ण-सुदामाच्या मैत्रीचे उदाहरण देतात, ज्यामध्ये कसलीही भिंत नव्हती, फक्त मैत्री होती, अशी मैत्री होती, ज्यावर सर्वस्व, संपत्ती, जमीन असो, सगळ्याचा त्याग व्हायचा. अशी मैत्री आजच्या काळात क्वचितच पाहायला मिळते. सोशल मीडियावर मैत्रीची उदाहरणं देणारे अनेक व्हिडीओज पाहायला मिळत असले, तरी खऱ्या मैत्रीची उदाहरणं असलेलं खरे व्हिडीओ क्वचितच पाहायला मिळतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अनेक शाळकरी मुलं जेवत आहेत आणि त्यापैकी दोन मुले अशी आहेत, जी मैत्रीचे एक अद्भुत उदाहरण घालून देताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, सर्व मुलांसमोर जेवणाचे ताट ठेवले आहे, पण त्यातील एक मूल हाताने जेवत नाही. ते मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे दिसून येत आहे. पण त्याच्या शेजारी बसलेल्या आणखी एका मुलाने असे काम केले की, आता जगभरातील लोक त्याचे कौतुक करताना थकत नाहीत. त्या मुलाने मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मुलाला स्वत:च्या हाताने जेवू घातले आणि शाळेत मैत्रीचा नवा अध्याय सुरू केला.

व्हिडीओ पाहा

जरी सहसा तुम्ही जास्त शाळकरी मुले एकमेकांशी भांडताना पाहिली असतील, परंतु हा व्हिडिओ तुम्हाला वाटेल की, मित्रांसोबत देखील अशी वागणूक दिली जाऊ शकते, त्यांना काही समस्या असल्यास त्यांना मदत केली जाऊ शकते. हा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि लिहिले आहे, ‘मैत्री म्हणजे काय? तर हेच ते.

अवघ्या 30 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 13 हजार लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी छान कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘अशा सुंदर संस्कारांचे श्रेय पालकांना जाते’. त्याचवेळी दुसरा युजर म्हणतो की, हा व्हिडीओ हृदयाला भिडला, कोणतीही अपेक्षा न ठेवता यालाच खरी मैत्री म्हणतात.

हेही पाहा:

मालकीणीचा पाय फ्रॅक्चर, कुत्र्याने रात्र मालकीणीच्या पायाजवळ काढली, निष्ठावान कशाला म्हणतात पाहा Video

Video: कुसू कुसू गाण्यावर तरुणीचा भन्नाट बेली डान्स पाहून नेटकरी घायाळ, डान्स व्हिडीओ प्रचंड Viral

Published On - 12:19 pm, Wed, 1 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI