AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: गोल्फचा शॉट मारणात तितक्यात शेकडो कांगारुंचा कळप मैदानात आला, ऑस्ट्रेलियातील मजेदार व्हिडीओ

व्हिडिओमध्ये, एक गोल्फर शॉट मारणार आहे, तेवढ्यात डझनभर कांगारू उड्या मारत तिथं येतात. त्यानंतर काय होतं ते पाहा!

Video: गोल्फचा शॉट मारणात तितक्यात शेकडो कांगारुंचा कळप मैदानात आला, ऑस्ट्रेलियातील मजेदार व्हिडीओ
गोल्फ कोर्सवर शेकडो कांगारु
| Edited By: | Updated on: Oct 30, 2021 | 3:20 PM
Share

जर तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तुम्हाला मजेदार गोष्टी कधी पाहायला मिळतील हे कोणालाच माहीत नाही. यातील काही गोष्टी हसवणाऱ्या आणि गुदगुल्या करणारे आहेत. त्याचबरोबर अनेक व्हिडीओ पाहून त्यावर विश्वास ठेवणे कठीण जातं. व्हिडिओमध्ये, एक गोल्फर शॉट मारणार आहे, तेवढ्यात डझनभर कांगारू उड्या मारत तिथं येतात. त्यानंतर काय होतं ते पाहा! (Viral Video dozen Kangaroos enter golf course in Australia golfer shocking Video, Animal Video)

हा व्हिडिओ वेंडी पॉविक नावाच्या (Wendy Powick) हौशी गोल्फरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी माझ्या आयुष्यात असे दृश्यं यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं. मी स्ट्रोक मारणार होते, तेवढ्यात कांगारूंचा कळप माझ्या दिशेने धावत येऊन थांबला. वेंडीने पुढे लिहिले, तुम्हाला हे फक्त ऑस्ट्रेलियातच पाहायला मिळेल.

चला तर मग आधी हा व्हिडिओ पाहूया.

व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही बघू शकता की, एक महिला गोल्फर मैदानात शॉट मारण्यासाठी स्टिक घेऊन उभी आहे. दरम्यान, समोरून कांगारूंचा कळप त्या महिलेकडे वेगाने धावताना दिसत आहे. कांगारूंना आपल्या दिशेने येताना पाहून गोल्फपटूही घाबरून गेल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. ती ताबडतोब तिची स्टीक खाली आणते आणि पाहात राहाते.

यानंतर, कांगारू जे काही करतात ते खूप मजेदार आहे. कांगारू इकडे तिकडे उड्या मारायला लागतात. जणू ते गोल्फपटूसमोर नाचत आहेत. काही वेळ असे केल्यावर सर्व कांगारू तिथून निघून जातात. यादरम्यान गोल्फर वेंडीलाही त्याला पाहून हसू आवरता आले नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतेक युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत.

हेही पाहा:

Video:कुत्र्याचा थेट सिंहावर हल्ला, सिंहाचा काढता पाय, नेटकरी म्हणाले, आपल्या गल्लीत प्रत्येक कुत्रा सिंहच असतो!

Video: लाहौरच्या रस्त्यावर शहामृगाची रेस, नेटकरी म्हणाले, मी लोकलमधून उतरल्यावर असाच धावतो!

 

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.