‘आला अंगावर, घेतला शिंगावर’, बैलाच्या वाटेला जाणं म्हताऱ्याला महागात पडलं, पाहा Viral Video

'आला अंगावर, घेतला शिंगावर', बैलाच्या वाटेला जाणं म्हताऱ्याला महागात पडलं, पाहा Viral Video
बैलाचा हल्ला

या व्हिडीओमध्ये एक बैल भिंतीच्या कडेला शांतपणे उभा असल्याचं दिसतं. समोर 2 मुलंही बसल्याचं या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. तेवढ्यात एक म्हातारा तिथं काठी घेऊन येतो, आणि बैलाच्या मागे जाऊन त्याच्या पाठीत काठीचे 3-4 जोरदार वार करतो.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सोनेश्वर भगवान पाटील, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 16, 2021 | 5:08 PM

जर तुम्ही इंटरनेटच्या दुनियेत सक्रिय असाल, तर अनेक मजेशीर व्हिडीओ तुम्ही पाहात असाल, अनेक वेळा हे व्हिडीओ इतके मजेदार असतात की, तुम्हाला हे व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो पाहिल्यानंतर तुम्हाला ‘आला अंगावर, घेतला शिंगावर’ हे वाक्य नक्कीच आठवेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Viral Video of Old Man beaten bull see how animal take revenge from it funny animal attack video)

बऱ्याचदा माणूस संकटं ही स्वत: हून अंगावर ओढावून घेतो. याचाच प्रत्येय देणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक बैल भिंतीच्या कडेला शांतपणे उभा असल्याचं दिसतं. समोर 2 मुलंही बसल्याचं या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. तेवढ्यात एक म्हातारा तिथं काठी घेऊन येतो, आणि बैलाच्या मागे जाऊन त्याच्या पाठीत काठीचे 3-4 जोरदार वार करतो. आता असं केल्यानंतर बैल पळून जाईल असं या म्हाताऱ्याला वाटलं असेल, पण, झालं उलटंच. हा बैल चिडतो, आणि काठीने मारणाऱ्या म्हाताऱ्याला थेट शिंगांवर घेतो.

नशिबाने या घटनेवेळी जवळच दोन तरुणही तिथंच बसलेले होते, ही घटना घडल्यानंतर त्यांनी धावत जाऊन म्हाताऱ्याला वाचवलं, हा सगळा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. लोक यावर भरभरुन कमेंट्स करत आहेत.

हा व्हिडिओ पाहा:

हा व्हिडिओ पाहून नक्कीच म्हणता येईल की कोणत्याही प्राण्याला त्रास होऊ नये. भारतात प्राण्यांवर अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. गेल्या वर्षी केरळमध्ये काही खोडकर लोकांनी फटाक्यांनी भरलेले अननस गर्भवती हत्तीणीला खाऊ घातलं, त्यानंतर हत्तीणीचा मृत्यू अत्यंत वेदनादायक पद्धतीने झाला होता.

हेही पाहा:

Video: ‘माकडाला कळतं, कसं खायचं, तुला नाही!’, माकडाचा व्हिडीओ पाहून मित्रांना टॅग करणं सुरु!

Pushpa The Rise : फुल्ल चर्चा! एका क्लिकवर ऐका पुष्पा चित्रपटातल्या ‘या’ गाण्याचे व्हर्जन

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें