Viral Video | काळा आला धावून, भरधाव ट्रेनसमोर हा मूर्खपणा कशाला? दोनदा ट्रॅक क्रॉस करायला गेली महिला आणि काळजात झालं चर्र

Railway Track Crossing Viral Video | भरधाव ट्रेन समोरुन येत असताना महिलेने एकदा नव्हे दोनदा रेल्वे ट्रॅक क्रॉस करण्याचा प्रयत्न केला. या कृत्यावर नेटकरी चांगलेच संतापले.

Viral Video | काळा आला धावून, भरधाव ट्रेनसमोर हा मूर्खपणा कशाला? दोनदा ट्रॅक क्रॉस करायला गेली महिला आणि काळजात झालं चर्र
आता रेल्वे क्रॉसिंगवर अपघात घडणार नाहीतImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 6:34 PM

Railway Track Crossing Viral Video | मित्रांनो मृत्यू (death)कोणासाठी थांबतो का? कधी कधी आपला मूर्खपणाच (stupidity) अशा गोष्टींना कारणीभूत ठरतो. थोडासा निष्काळजीपणाच जीवावर किती बेतू शकतो, हे एका भयंकर व्हिडीओतून समोर आले आहे. जीवापेक्षा सामान महागामोलाचे आहे का? पण रेल्वे क्रॉसिंग (Railway track Crossing) करताना आपण का विसरुन जातो हेच अनेकांना कळत नाही. हा व्हिडिओ (Viral Video) कुठला आहे हे माहिती नाही. पण या व्हिडीओतील महिलेची कृती अत्यंत धक्कादायक आहे. रेल्वे क्रॉसिंग करताना भरधाव ट्रेनसमोर असताना या महिलेचा जीव कसाबसा वाचला. पण तरीही तिने दुसऱ्यांदा रिस्क घेतलीच, तिच्या या कृतीने सगळ्यांचाच मनात धस्स झालं. प्रत्येकाच्या काळजाचा थरकाप उडाला. दणदण करत येणारी ट्रेन आणि या महिलेने पुन्हा जीव धोक्यात घातल्याने (endangering lives)नेटकऱ्यांनी संताप संताप व्यक्त केला. काळजात धडकी भरवणारा हा व्हिडीओ एकाद पहाच.

भरधाव ट्रेन येत असताना अथवा रेल्वे स्थानकावर ट्रॅक क्रॉस करु नये, अशा सूचना वारंवार आपण एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानानं सोडून देतो. वेळ वाचवण्याच्या नादात हा शॉर्टकट केव्हा जीवघेणा ठरतो हे त्यांचं त्यांना कळत नाही. थोड्या काळाकरीता संयम ठेवला असता तर, असं मनाला चटका लावणारं वाक्य आपोआप आपल्या तोंडी येते, पण तोपर्यंत सारं काही संपलेलं असतं. असं जीव धोक्यात घालून खरंच आपल्या हाती काय लागतं.

हे सुद्धा वाचा

या व्हिडिओत ही असंच काळजाचा थरकाप उडवणारी घटना चित्रबद्ध झाली आहे. एक छोटासा हलगर्जीपणा ही तुमच्या जीवावर बेतू शकतो हे आपण प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे. रेल्वे धडधड करत समोरुन येत असताना असं धाडस करण्यात काय हाशील होत असेल बरं याचा आपल्याला विचारा करायला लावणारा हा व्हिडीओ आपल्याला धडा देणाराच आहे.

काय आहे व्हिडीओत

या व्हिडीओत एक ट्रेन मध्येच थांबलेली असताना जवळच्याच गावचे बरेच जण ट्रेनमधून उतरतात आणि त्यातील काही जण विरुद्ध दिशेने येणाऱ्या रेल्वे आधीच ट्रॅक क्रॉस करतात. तर काही जण सामान दुसऱ्या बाजुला फेकतात. हा व्हिडीओ रेल्वेतीलच एक व्यक्ती शूट करत आहे. त्यातच या महिलेचे या भयावह दृश्य कैद झालं आहे.

जेव्हा काही लोक रेल्वे ट्रॅक क्रॉस करु लागतात. तेव्हाच काही लोक ट्रॅक क्रॉस करताना दिसतात. तेवढ्यात ही महिला रेल्वे ट्रॅक क्रॉस करुन सामान ठेवते आणि भरधाव रेल्वे धडधड करत समोरुन येत असतानाच दुसऱ्यांदा तिच्यासमोरुन पुन्हा मागे येते. यावेळी लोक तिला थांबण्याचा सल्ला देतात पण ती जीव धोक्यात घालून नाहक रेल्वे ट्रॅक क्रॉस करते आणि सगळ्यांचाच श्वास रोखल्या जातो.

जेव्हा हे लोक रेल्वे ट्रॅक क्रॉस करायला गेले तेव्हाच समोरून भरधाव ट्रेन येत होती. एका व्यक्ती या व्हिडीओत ट्रेन येत असल्याचं त्यांना सांगतानाही दिसतो. तरी हे लोक सामान घेऊन ट्रॅकवरून जातात. सुदैवाने सर्वजण ट्रेन यायच्या आधी पलीकडे पोहोचतात. पण एक महिला मात्र ट्रॅकवरच असते. ट्रकवरच उभं राहून ती सामान दुसऱ्या बाजूला फेकते आणि स्वतः पुन्हा मागे येते. त्यावेळी ट्रेन तिच्यापासून काही अंतरावरच असते.

काळ धावून येतो पण

काळजाचा थरकाप उडवणारा हा व्हिडीओ पाहताना धस्स होतं. ही महिला ट्रॅक क्रॉस करुन झटपट सामान फेकते. तेवढ्यात रेल्वे धडधड समोरुन येत असताना ती माघारी फिरते आणि तिथेच सर्वांच्या श्वास रोखल्या जातो. इतक्या भरधाव वेगाने रेल्वे येत असताना या माऊलीला ही कुठली दुर्बुद्धी सुचली अशी आपसूकच प्रतिक्रिया उमटते. अवघ्या काही सेकंदानं ही महिला ट्रॅकवरुन झेपावते आणि धडधड करत रेल्वे मार्गस्थ होते. मृत्यू समोरुन निघून जातो. नशीब बलवत्तर म्हणून ही महिला वाचते. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आयएफएस अधिकारी अवनीश शरण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा धक्कादायक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘आयुष्य तुमचं, निर्णय तुमचा’ असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.