Video: 15 सेकंदात मुलीची वेणी घातली, सुपरडॅडचं नेटकऱ्यांकडून कौतुक, नेटकरी म्हणाले, ही आयडिया चांगली आहे!

मुलीची वेणी घालण्यासाठी तिच्या वडिलांनी वापरलेली युक्ती पाहिल्यानंतर तुम्हीही या व्यक्तीचे कौतुक कराल. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी आरशासमोर उभी असल्याचे दिसते. तिचे वडील तिचे केस धरून आहेत.

Video: 15 सेकंदात मुलीची वेणी घातली, सुपरडॅडचं नेटकऱ्यांकडून कौतुक, नेटकरी म्हणाले, ही आयडिया चांगली आहे!
वडिलांनी अवघ्या 15 सेकंदात आपल्या मुलीची वेणी घातली.

सोशल मीडियाच्या जगात तुम्हाला वडील आणि मुलीचं नातं उलगडणारे अनेक व्हिडीओ दिसतील. असे व्हिडीओ लगेच व्हायरलही होत असतात. तर काही व्हिडीओ इतके क्युट असतात, की त्याची कशाची तुलना होऊ शकत नाही. बऱ्याचदा वडिलांना घरातील काही कामं करता येत नसतात, त्यामुळे वडिलांच्या भरवशावर घरात राहु नका असा सल्ला बरेच नेटकरी या व्हिडीओंवर देत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये पिता आपल्या मुलीची वेणी अवघ्या 15 सेकंदात घालतो आहे. 15 सेकंदात वेणी घालतो म्हणजे हा पिता काही एक्स्पर्ट नाही तर हा एक जुगाड आहे. या जुगाडामुळे नेटकरी या सुपर डॅडचं कौतुक करत आहेत. (viral video shows dads unique way of tying daughters bun leaves netizens amazed)

मुलीची वेणी घालण्यासाठी तिच्या वडिलांनी वापरलेली युक्ती पाहिल्यानंतर तुम्हीही या व्यक्तीचे कौतुक कराल. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी आरशासमोर उभी असल्याचे दिसते. तिचे वडील तिचे केस धरून आहेत. मग वडील आपल्या मुलीला फिरायला जाण्यास सांगतात. मुलीची वेणी घालण्याची ही युक्ती खरोखर भारी आहे. जेव्हा मुलाची वेणी तयार होते, तेव्हा वडील त्याला रबर बँडही बांधतात. अशाप्रकारे वडिलांनी अवघ्या 15 सेकंदात आपल्या मुलीची वेणी घातली.

पाहा व्हिडीओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by collins grigsby (@collins_grigsby)

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर collins_grigsby नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया युजर्सना खूप आवडत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केल्यापासून आतापर्यंत 3 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर, अनेकजण त्यावर सतत मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. प्रत्येकाला हा वेणी जुगाड खूप आवडला आहे.

एका नेटकऱ्याने कमेंट केली की, खूप गोंडस, मुलगी आधी किती अस्वस्थ होती पण तिच्या वडिलांनी तिला वेणी घालून देऊन तिला आनंदी केले. त्याचवेळी, दुसर्‍याने लिहिले आहे, ही युक्ती खरंच भन्नाट आहे, मी पण प्रयत्न करेन. बहुतेक जण इमोजी वापरुन आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

हेही पाहा:

Video: पाठीवर झाडाची पानं बांधली, आणि उंच झेप घेतली, चिमुरड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video: 5 वाघांच्या तावडीत सापडला कुत्रा, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, निसर्गात काहीही होऊ शकतं!

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI