AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“काकू म्हणजे फायर आहेत”; लग्नात ‘लैला मैं लैला’ गाण्यावर महिलेचा भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरीही थक्क

सोशल मीडियावर लग्नसंमारंभात एका महिलेनं 'लैला मैं लैला'वर केलेला डान्स हा प्रचंड व्हायरल होत आहे. डान्स करताना महिलेनं गाण्यावर केलेले डान्सस्टेप पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. नेटकऱ्यांनी व्हिडीओवर कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव करत महिलेचं कौतुक केलं आहे.

काकू म्हणजे फायर आहेत; लग्नात 'लैला मैं लैला' गाण्यावर महिलेचा भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरीही थक्क
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Feb 24, 2025 | 11:03 AM
Share

सोशल मीडियावर कधी काय आणि कोण व्हायरल होईल काही सांगता यायचं नाही. कोणाचं गाणं, तर कोणाचा डान्स. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका लग्नसंमारंभातला असून त्यासमारंभातील एका महिलेच्या डान्सचा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे.

‘लैला मैं लैला’वर महिलेचा भन्नाट डान्स

या व्हायरल व्हिडीओमध्ये एका लग्नसमारंभात महिलांचा ग्रुप धम्माल डान्स करताना दिसत आहे. त्यातील एका महिलेचा डान्स जबरदस्त व्हायरल झाला आहे. ‘लैला मैं लैला’ या गाण्यावर या सर्व महिला डान्स करताना दिसत आहेत. त्यातील व्हायरल झालेल्या महिलेनं भन्नाट डान्स केलेला दिसत आहे. तिने या गाण्यावर केलेले डान्सस्टेप पाहून तिच्यासोबत डान्स करणारेही अवाक होऊन तिच्याकडे पाहत राहतात.

काकूंचा डान्स पाहून इतर महिलाही शॉक

या महिलेचे डान्स मुव्हमेंट सर्वांचच लक्ष वेधून घेत आहेत. ती प्रचंड उत्साहात डान्स करताना दिसत आहेत. तिचा हा डान्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनीही तिच्या डान्स स्टेप आणि तिचा उत्साह पाहून आश्चर्य वाटलं आहे. तसेच ती करत असलेल्या डान्स स्टेप्स पाहून आसपासच्या इतर महिलाही शॉक होतात. तिचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

व्हिडीओवर 16 मिलियनहून अधिक व्ह्युज

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @dipesh5923 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत 16 मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून यावर आठ लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Dipesh Singh (@dipesh5923)

नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “हिच्यासारखी सासू मिळायला हवी”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “या काकूंनी त्यांचा काळ नक्कीच गाजवला असेल”, तर एकाने लिहिलंय की, “काकू खरंच भारी नाचताय”,तर काहींनी कमेंट केली आहे की, “छान नाचताय, पण जरा थांबा.”असं म्हणत नेटकऱ्यांनीही या महिलेचं कौतुक केलं आहे.

पण या व्हिडीओवरून एक गोष्ट लक्षात येते की महिला त्यांच्या संसारात, घर, मूलं सांभाळण्यात इतक्या व्यस्त असतात की त्यातून त्याना उसंत मिळत नाही.  अशा समारंभावेळी मात्र त्यांना मिळालेला हा वेळ त्यांच्या एन्जॉय करण्याचा असतो त्यामुळे या वेळेचा नक्कीच त्यांनी आनंद घ्यायला हवा.

Follow Us
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....
सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! अहिरांवर राऊतांचा संताप
Sanjay Raut Full Press | सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! विश्वासाला तडा देणाऱ्यांना जनता ओळखते; अहिरांवर राऊतांचा संताप
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील कराराचा भारतीयांना थेट फायदा; आता पेट्रोल...
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?
शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राऊतांचा अहिरांवर घणाघात
Sanjay Raut | शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राजकीय प्रवास कलंकित, राऊतांचा सचिन अहिरांवर घणाघात
नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात
Nashik | हरी मुखे म्हणा! नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले...