AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जर हिमालय आपल्या जागेवरून सरकला, तर काय होईल? जाणून घ्या सविस्तर विश्लेषण

हिमालय भारतासाठी एक रक्षक आहे त्याचं अस्तित्व टिकवणं आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे.मग जर तोच नसेल तर भारताच काय होईल ? चला जाणून घेऊया....

जर हिमालय आपल्या जागेवरून सरकला, तर काय होईल? जाणून घ्या सविस्तर विश्लेषण
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Jul 08, 2025 | 3:43 PM
Share

हिमालय हा भारतासाठी एक सामान्य डोंगरसाखळी नाही, तर आपल्या हवामान, नद्या, शेती, आणि जैवविविधतेचा आधारस्तंभ आहे. यालाच पृथ्वीचं छत म्हणतात, कारण हा जगातला सर्वात उंच पर्वत आहे. उत्तर भारताचं हवामान समतोल ठेवण्यात हिमालयाची खूप मोठी भूमिका आहे. पण कधी तुम्ही विचार केला आहे का, की जर हिमालय आपल्या जागेवरून हलला किंवा अस्तित्वातच राहिला नाही, तर काय होईल? याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात

थंडीचा कहर आणि हवामान बिघडेल

हिमालय उत्तरेकडून येणाऱ्या थंड, बर्फाळ वाऱ्यांना अडवतो. जर तो नसता, तर हे वारे थेट भारतात शिरले असते आणि उत्तर भारत बर्फात गाडला गेला असता. इतकी थंडी वाढली असती की सामान्य जीवन जगणंही अवघड झालं असतं. पिकं उगम पावायला हवामान अनुकूल राहिलं नसतं, त्यामुळे अन्नसुरक्षा धोक्यात आली असती.

पावसावर नियंत्रण राहणार नाही

हिमालय पावसाळी वाऱ्यांना अडवून त्यांना भारतात वळवतो. त्यामुळे देशात चांगला पाऊस पडतो. पण जर हिमालय नसेल, तर पावसाचं प्रमाण कमी होईल किंवा अनियमित होईल. यामुळे काही भागात दुष्काळ तर काही ठिकाणी पूर येण्याची शक्यता वाढेल.

नद्या कोरड्या पडतील

गंगा, यमुना, ब्रह्मपुत्र यांसारख्या मोठ्या नद्या हिमालयातील बर्फ वितळून निर्माण होतात. जर हिमालय नसेल, तर या नद्यांमध्ये पाणीच राहणार नाही. याचा परिणाम पिण्याच्या पाण्यावर, शेतीसाठीच्या सिंचनावर आणि विजेच्या निर्मितीवर होईल. देशात पाणीटंचाई निर्माण होईल आणि शेतकऱ्यांचे हाल होतील.

वनस्पती आणि प्राणी नष्ट होतील

हिमालयात अनेक दुर्मिळ प्राणी आणि वनस्पती आढळतात. जर हे डोंगरच राहिले नाहीत, तर ही सगळी जैवविविधता नष्ट होईल. यामुळे पर्यावरणाची साखळी विस्कळीत होईल आणि निसर्गात असंतुलन निर्माण होईल.

भूकंप आणि देशाच्या सुरक्षेवर परिणाम

हिमालय ज्या जागेवर आहे, तिथे भूगर्भात प्लेट्स एकमेकांवर ढकलल्या जातात. हिमालय त्याचा काही प्रमाणात तोल सांभाळतो. जर तो नसेल, तर भूकंपांचं प्रमाण वाढेल. शिवाय, हिमालय उत्तर भारताच्या सीमेवर नैसर्गिक संरक्षण देतो. तो नसेल, तर देशाच्या सीमावर्ती सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.