AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“या” राज्यांसाठी वीज कनेक्शन करण्याची कटकट आता संपली! ई-मित्रवर मिळणार सोपी सेवा

सरकारी कार्यालयांच्या रांगेत उभं राहून वेळ वाया घालवतोय? आता गरज नाही! वीज कनेक्शनसाठी सुरू झाली एक अशी स्मार्ट सेवा, जी तुमचं काम घरी बसून, एका क्लिकमध्ये उरकून टाकेल. काय आहे ही डिजिटल यंत्रणा? आणि कशी वाचवेल तुमचा वेळ? चला, जाणून घेऊया

या राज्यांसाठी वीज कनेक्शन करण्याची कटकट आता संपली! ई-मित्रवर मिळणार सोपी सेवा
फाईल फोटो
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Apr 11, 2025 | 4:19 PM
Share

नागरिकांसाठी आता नवीन वीज कनेक्शन घेणं खूपच सोपं आणि झटपट होणार आहे. यापूर्वी नागरिकांना वीज कनेक्शनसाठी अर्ज, कागदपत्रे, वीज कार्यालयाच्या चकरा, आणि अनेक पायऱ्यांतून जावं लागत होतं. मात्र, आता हे सगळं टाळता येणार आहे. कारण राजस्थान सरकारने ‘ई-मित्र’ प्लॅटफॉर्मवर नवीन सुविधा सुरू केली आहे.

राज्यातील जयपूर, जोधपूर आणि अजमेर वीज वितरण कंपन्यांनी मिळून ही राजस्थान नागरिकांसाठी नवी प्रणाली सुरू केली असून, यामध्ये ‘न्यू कनेक्शन मॅनेजमेंट सिस्टम’ (NCMS) हे मॉड्यूल ‘ई-मित्र’शी जोडण्यात आलं आहे. यामुळे वीज जोडणीसाठी आवश्यक असलेली प्रत्येक प्रक्रिया आता ऑनलाईन केली जाणार आहे.

कागदपत्रं कमी, वेळेची बचत

‘ई-मित्र’वरून नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज करता येईल, त्यानंतर डिस्कॉमच्या कर्मचाऱ्यांकडून आवश्यक ती माहिती, डिमांड नोट तयार करणे, फाईल तयार करणे यासारख्या गोष्टी सगळ्या ऑनलाईन पार पडतील. यामुळे ग्राहकांना उपविभागीय कार्यालयात वेळ वाया घालवण्याची गरज भासत नाही. हे सगळं ‘पेपरलेस’ पद्धतीने होणार असल्याने सिस्टीम अधिक पारदर्शक आणि जलद बनणार आहे.

साईट तपासणी सुद्धा डिजिटल

नवीन कनेक्शन मिळवण्यासाठी जागेची तपासणी करणे आवश्यक असते. यासाठी ‘साईट व्हेरिफिकेशन मोबाइल अ‍ॅप’ वापरून JEN (Junior Engineer) थेट जागेवर जाऊन मोबाईल अ‍ॅपमधून तपासणी नोंदवू शकतात. ही अ‍ॅप्लिकेशनदेखील NCMS प्रणालीशी जोडलेली आहे, त्यामुळे तपासणीसुद्धा आता पारदर्शकतेने आणि कमी वेळात पूर्ण होऊ शकते.

डिस्कॉम कार्यालयांची गरज संपली

डिस्कॉमच्या अध्यक्षा आरती डोगरा यांनी सांगितले की, ‘ई-मित्र’द्वारे अर्ज करणाऱ्या ग्राहकांना आता डिस्कॉमच्या कार्यालयात प्रत्यक्ष जावं लागणार नाही. सगळी प्रक्रिया डिजिटल झाल्याने ग्राहकांना विश्वासार्ह सेवा मिळेल आणि कोणतीही माहिती दडवली जाणार नाही.

पुढील टप्पे अधिक प्रगत

डिस्कॉम प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच इतर सेवा जसं की – कनेक्शनवरील नाव बदलणे, श्रेणी बदलणे, विद्युत भार वाढवणे किंवा कमी करणे हे देखील ‘ई-मित्र’वरून करता येईल. या बदलामुळे पेपरलेस सिस्टम अधिक मजबूत होईल, आणि प्रत्येक अर्जासाठी वेगळी फाईल तयार करण्याची गरज उरणार नाही.

थोडक्यात काय?

राज्य सरकारचा हा निर्णय नागरिकांसाठी मोठा दिलासा आहे. नवीन वीज कनेक्शनची पूर्वी जिथे त्रासदायक प्रक्रिया होती, ती आता सुलभ आणि पारदर्शक झाली आहे. एक अ‍ॅप किंवा ई-मित्र केंद्रावर जाऊन अर्ज करा आणि घरबसल्या वीज कनेक्शन मिळवा, तेही कुठल्याही अतिरिक्त धावपळीशिवाय!

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...