AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

याला म्हणतात दानत… केअरटेकरला 45 कोटीची संपत्ती दान; नातेवाईक छातीपिटत बसले

इटलीतील एक बुजुर्ग महिला सध्या प्रचंड चर्चेत आहे. या महिलेने तिची कोट्यवधीची संपत्ती नातेवाईकांच्या नावे करण्याऐवजी केअरटेकरच्या नावे केल्याने महिला चर्चेत आली आहे. या महिलेकडे सुमारे 45 कोटींची संपत्ती होती. ही महिला प्रसिद्ध घराण्यातील होती. तिने लग्न केलेलं नव्हतं. त्यामुळे तिला वारस नव्हता. ती एकटीच राहत होती. नातेवाईकही तिला कधी भेटायला येत नसत.

याला म्हणतात दानत... केअरटेकरला 45 कोटीची संपत्ती दान; नातेवाईक छातीपिटत बसले
Old LadyImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 05, 2024 | 8:35 PM
Share

कुटुंबाचा अर्थ होतो एकमेकांसोबत राहणं. एकमेकांना साथ देणं. एकमेकांच्या सुख-दु:खात सामील होणं. पण आज काल विभक्त कुटुंब पद्धती पाहायला मिळत आहे. लग्न झाल्याबरोबर प्रत्येकाला प्रायव्हसीच्या नावाखाली वेगळा संसार थाटायचा असतो. कुटुंबाचा विचार करण्याऐवजी स्वत:चा विचार करत असतात. अनेकदा तर मुलांनी आई वडिलांना घरातून बाहेर काढल्याच्या गोष्टीही कानावर येत असतात. अशावेळी मग आई वडिलांनीही आपली संपत्ती इतरांच्या नावावर केली किंवा कुणाला तरी दान केली तर आश्चर्य वाटायला नको. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

इटलीच्या एका महिलेने आपली कोट्यवधीची संपत्ती तिच्या केअरटेकरच्या नावावर केली आहे. जेव्हा तिच्या नातेवाईकांना ही माहिती मिळाली तेव्हा त्यांना धक्काच बसला. ही महिला असं काही करेल अशी त्यांना कल्पनाच नव्हती. या महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या संपत्तीचे आपणच उत्तराधिकारी होऊ असं या नातेवाईकांना वाटत होतं. पण झालं भलतंच. एका संकेतस्थळाने ही माहिती दिली आहे. या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, महिलेचा कोणीही प्रत्यक्ष उत्तराधिकारी नव्हता. त्यामुळे तिने तिची 5.4 मिलियन डॉलर म्हणजे 45 कोटीची संपत्ती तिच्या केअरटेकरच्या नावावर केली. हा केअरटेकर अल्बानिया येथे राहतो.

80 व्या वर्षी मृत्यू

इटली येथे राहणारी ही महिला ट्रेंटो प्रांताच्या एका गावातील रोवरेटो येथील प्रसिद्ध घराण्यातील होती. मारिया मालफट्टी असं या महिलेचं नाव होतं. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये वयाच्या 80 व्या वर्षी या महिलेचा मृत्यू झाला. रोवरेटोचे माजी महापौर आणि व्हियनाच्या संसदेचे उपाध्यक्ष वेलेरियानो मालफट्टीची वंशज मारियाकडे प्रचंड संपत्ती होती. त्यात अपार्टमेंट, शहराच्या मध्यवर्ती भागात ऐतिहासिक इमारत आणि बँकेतील कोट्यवधीचा समावेश आहे.

भाच्यांना बेदखल केलं

या महिलेने लग्न केलेलं नव्हतं. त्यामुळे तिच्या संपत्तीचा कोणी प्रत्यक्ष वारस नव्हता. पण तिला अनेक भाचे होते. मारियाची संपत्ती आपल्याला मिळेल असं तिच्या भाच्यांना वाटत होतं. पण गेल्या काही वर्षापासून देखभाल करणाऱ्या केअरटेकरलाच मारियाने आपली सर्व संपत्ती देऊन टाकली.

फसवणुकीचा आरोप

मारियाने तिची सर्व संपत्ती केअरटेकरच्या नावावर केल्याचं जेव्हा तिच्या भाच्यांना कळलं तेव्हा त्यांनी एका वकिलाशी संपर्क साधला. तसेच मारियाची संपत्ती जप्त केल्याचा तिला फसवल्याचा दावा केअरटेकर विरोधात केला. वय जास्त झाल्याने मारियाची विचारशक्ती क्षीण झाली होती. त्याचा केअरटेकरने फायदा उचलला. त्याने सर्व संपत्ती आपल्या नावे केली, असा याचिकेत आरोप करण्यात आला आहे. सध्या हे प्रकरण कोर्टात आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.