हार्ट इमोजी पाठवाल तर होईल 5 वर्षांची शिक्षा, कोणत्या देशात बॅन? नियम जाणून व्हाल थक्क
World Emoji Day 2025: : दूर राहून मनातील भावना व्यक्त करण्यासाठी इमोजी उत्तम पर्याय, पण काही देशात 'हे' इमोजी पाठवणं म्हणजे गुन्हा ! होते 5 वर्षांची शिक्षा... नियम जाणून व्हाल हैराण

असं म्हणतात की एक फोटो हजार शब्दांचं काम करतो. इमोजीबद्दल देखील असंच काही आहे. एक इमोजी माणसाचा मूड आणि आवड – निवडीबद्दल खूप काही सांगतो. इमोजी असं एक आयकॉन आहे जो माणसाच्या भावना पूर्णपणे समजतो. इमोजी म्हणजे आजच्या पीढीची भाषा आहे. आज 17 जुलै म्हणजे वर्ल्ड इमोजी डे… पहिल्यांदा 2014 मध्ये हा दिवस साजरा करण्यात आला होता. इमोजीपीडियाचे संस्थापक जेरेमी बर्ग यांनी 2014 मध्ये हा दिवस सुरू केला होता. हा खास दिवस साजरा करण्याचा उद्देश इमोजींना प्रोत्साहन देणे हा होता.
इमोजीची निर्मिती एका जापानी व्यक्तीने केली. त्या व्यक्तीचं नाव शिगेताका कुरीता असं आहे. , शिगेताका कुरीता यांनी वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी इमोजी तयार केल्या. त्यांनी 1999 मध्ये पहिल्यांदा 176 इमोजींचा संच तयार केला. त्या संचाने इतिहास रचला आता प्रश्न असा उद्भवतो की शब्दांच्या जगात इमोजी कसे अस्तित्वात आले?
शब्दांच्या जगात इमोजीची गरज काय?
शिगेताका कुरिता यांच्याबद्दल खास गोष्ट म्हणजे त्यांनी इंजीनियरिंग किंवा डिझायनिंगमध्ये अधिकृत पदवी मिळवली नाही. अर्थशास्त्राचा अभ्यास करणारे शिगेताका कुरिता एका मोबाईल इंटरनेट सेवा कंपनीत काम करायचे. तंत्रज्ञानाच्या सुरुवातीच्या काळात मेसेज पाठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दांची संख्या मर्यादित होती आणि येथूनच त्यांना ही कल्पना सुचली.
शिगेताका कुरीता यांना असं वाटलं की शब्दांच्या जागी खास आयकॉन पाठवले कर समोरच्या व्यक्तीला जे सांगायचं आहे, ते पूर्ण भावत्मक रुपात सांगता येईल. हे लक्षात घेऊन त्यांनी ईमेलमध्ये इमोजी हा शब्द वापरला. पहिल्यांदाच त्यांनी 176 इमोजींचा संच तयार केला. तो लोकप्रिय झाला. इंटरनेट क्रांतीने इमोजींना एका प्रकारच्या भाषेत रूपांतरित केलं आणि तरुणांनी स्वतःला व्यक्त करण्यासाठी शब्दांऐवजी इमोजी वापरण्यास सुरुवात केली.
कोण पाहतं इमोजीचं काम?
कोणता नवीन इमोजी जन्माला येईल, तो कसा असेल आणि त्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील द्यायचा की नाही, ही सर्व कामे युनिकॉर्ड कन्सोर्टियमद्वारे केली जातात. कोणीही नवीन इमोजी तयार करण्याचा प्रस्ताव देऊ शकतो, परंतु याचा निर्णय कन्सोर्टियमद्वारे घेतला जातो. गुगल, अॅपल, आयबीएम सारख्या जगातील अनेक मोठ्या कंपन्या कन्सोर्टियमचे सदस्य आहेत. दरवर्षी नवीन इमोजीसाठी हजारो अर्ज येतात असे या संघाचं म्हणणं आहे.
कोणत्या देशात इमोजीवर आहे बॅन आणि होते शिक्षा?
प्रत्येकाला इमोजी अवडतात असं काहीही नाही. जगातली असे देखील काही देश आहेत, जेथे इमोजी बॅन आहेत. सौदी अरेबिया सरकारने LGBTQ+ संबंधित इमोजीजवर बंदी घातली आहे. येथे, एखाद्याला हार्टचा इमोजी पाठवल्यास 3 ते 3 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.
त्याच वेळी, इराणमध्ये लव्ह, किस, LGBTQ+, नृत्य किंवा पाश्चात्य संस्कृतीशी संबंधित इमोजींवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, रशियामध्ये LGBTQ+ शी संबंधित इमोजी आणि कंटेंटवरही बंदी आहे.
