आयुष्य असं हवं, काय कमी आहे या कुत्र्याकडे? संपत्ती ऐकून व्हाल थक्क

The richest dog in the world : सर्वसामान्य माणूस फक्त स्वप्न पाहू शकतो, असं आयुष्य हा कुत्रा जगतोय. त्याच्या संपत्तीचे आकडे ऐकून डोळे विस्फारतील. बऱ्याच काळापासून तो श्रीमंतांसारख ऐशोआरामी आयुष्य जगतोय.

आयुष्य असं हवं, काय कमी आहे या कुत्र्याकडे? संपत्ती ऐकून व्हाल थक्क
Richest dog Gunthar
Follow us
| Updated on: Mar 05, 2024 | 1:34 PM

न्यू यॉर्क : सर्वसामान्य माणस फक्त कल्पना करु शकतात, पण हा कुत्रा प्रत्यक्षात असं ऐशोआरामी आयुष्य जगतोय. या कुत्र्याकडे कसली कमी आहे? बहामासमध्ये त्याचा स्वत:चा मालकीचा बंगला आहे. लग्जरी कार आहे. गुंथर VI असं या जर्मन शेफर्ड कुत्र्याच नाव आहे. मॅडोनाच्या जुन्या घरात सध्या गुंथर VI कुत्र्याच वास्तव्य आहे. बऱ्याच काळापासून तो श्रीमंतांसारख ऐशोआरामी आयुष्य जगतोय. सध्या तो 65 मिलियन पाऊंडच्या घरात राहतो.

या कुत्र्याच्या मालकीचा फुटबॉल क्लब आहे. अनेकदा तो जहाजामधून फिरायला जातो. द सनच्या रिपोर्ट्नुसार या कुत्र्याकडे जी संपत्ती आहे, त्यावर एका मध्यस्थामार्फत नियंत्रण ठेवलं जातं. इटलीतील उद्योजक मौरिजियो मियान मध्यस्थ आहेत. या कुत्र्याकडे इतका पैसा कुठून आला? ते जाणून घेऊया.

हा कुत्रा कोणाच्या मालकीचा?

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, कुत्र्याच्या मालकाने त्याच्या नावावर 277 मिलियन पाउंडची संपत्ती केलीय. त्यावर गुंथर कॉर्पोरेशनचे सीईओ लक्ष ठेवतात. या कुत्र्याची मूळ मालकी जर्मनीच्या कार्लोटा लीबेंस्टीन यांच्याकडे होती. कार्लोटा यांच्या कुटुंबात कोणी नव्हतं.

कुत्र्याला एवढी संपत्ती कशी मिळाली?

त्यामुळे त्यांनी सर्व संपत्ती आपल्या पाळीव कुत्र्याच्या नावावर केली. या कुत्र्याची एक पीआर सुद्धा आहे. “कार्लोटा लीबेंस्टीन यांचा मृत्यू झाला, त्यावेळी कोणी जवळच नातेवाईक नव्हतं. त्यामुळे त्यांनी आपली सर्व संपत्ती कुत्रा गुंथरच्या नावावर केली. कार्लोटा यांचा गुंथरवर खूप जीव होता” असं पीआर लुसी क्लार्कसन यांनी सांगितलं. त्यावेळी गुंथर ट्रस्टची स्थापना करण्यात आली. जेणेकरुन सर्व पैसा, संपत्ती गुंथरकडेच राहिल. त्याच्यानंतर त्याच्या मुलांना मिळेल. गुंथर एका श्रीमंत कुटुंबातून येतो. ती सर्व संपत्ती कुठल्या रहस्यमयी व्यक्तीची नाहीय.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.