AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zomato Case : झोमॅटोच्या डिलिव्हरीबॉयसोबत भांडण, महिलेनं खरंच शहर सोडलं? वाचा ती काय म्हणतेय…

हितेशाने इन्स्टाग्रामवर सविस्तर पोस्ट टाकत आपली भूमिका मांडली आहे (Zomato case hitesha chandranee confirmed that she did not leave Bengaluru).

Zomato Case : झोमॅटोच्या डिलिव्हरीबॉयसोबत भांडण, महिलेनं खरंच शहर सोडलं? वाचा ती काय म्हणतेय...
| Updated on: Mar 19, 2021 | 4:53 PM
Share

बंगळुरु : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका महिलेचं झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयसोबतच्या वादाचं प्रकरण प्रचंड चर्चेत आहे. सोशल मीडियावर आधी संबंधित महिलेचा नाकातून रक्त येणारा व्हिडीओ तर नंतर झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचा रडण्याचा व्हिडीओ समोर आला. लोकांनी सुरुवातीला महिलेला सपोर्ट केला. पण डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी त्याला सपोर्ट केला. त्यानंतर काहिंनी महिलेला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रकरणानंतर संबंधित महिला ही बंगळुरु शहर सोडून कुठेतरी दुसरीकडे राहायला गेली, अशी चर्चा सुरु होती. यावर महिलेने आपली भूमिका मांडत या चर्चेला पूर्णविराम दिला (Zomato case hitesha chandranee confirmed that she did not leave Bengaluru).

महिला इन्स्टाग्रामवर काय म्हणाली?

संबंधित महिलेचं नाव हितेशा चंद्रानी असं आहे. ती इन्स्टाग्रामवर कंटेट क्रिएटर आहे. तिचा झोमॅटोचा डिलिव्हरीबॉय कामराज याच्यासोबत वाद झाल्यानंतर ती बंगळुरु सोडून गेली, अशी चर्चा होती. मात्र, ही चर्चा वायफळ असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. हितेशाने इन्स्टाग्रामवर सविस्तर पोस्ट टाकत आपली भूमिका मांडली आहे (Zomato case hitesha chandranee confirmed that she did not leave Bengaluru).

बंगळुरु हे माझं घर आहे. मी शहर सोडून कुठेच गेलेली नाही, असं महिलेने सांगिंतलं. त्याचबरोबर मला त्रास देण्यात आला. माझ्यासोबत गैरवर्तन केलं गेलं. त्यानंतर धमकी देण्यात आली. माझं नाक फ्रॅक्चर झालं. मी त्याच्यावर उपचार केला. मला अनेकांची धमकीचे आणि अपमानास्पद शब्दांमध्ये बातचित करणारे फोन आले, असं देखील हितेशाने इन्स्टाग्रामवर सांगितलं आहे.

नेमकं प्रकरण काय? 

ऑर्डर कॅन्सल केली म्हणून एका झोमॅटो डिलेव्हरी बॉयने हल्ला करत नाकावर मारून जखमी केल्याचा आरोप बंगळुरु येथील एका महिलेने चार दिवसांपूर्वी केला. हा आरोप करताना तिने नाकातून रक्त येत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. तसेच या व्हिडीओत महिलेने तिच्यावर डिलिव्हरी बॉयने हल्ला करून तिला मारण्याचा तसेच जखमी केल्याचा गंभीर आरोप केला. हा व्हिडीओ काही क्षणांत प्रचंड व्हायरल झाला. महिलेच्या नाकातून रक्त वाहत असल्यामुळे साहजिकच तिला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद लाभला. डिलिव्हरी बॉयवर कडक कारवाई केली जावी, अशी जोरदार मागणी होऊ लागली. या प्रकरणाची दखल थेट झोमॅटो प्रशासनाने घेत जखमी महिलेला वैद्यकीय मदत देण्याची तयारी दाखवली.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.