AC Sales : उन्हाळ्यात थंडा थंडा कूल कूल; ACची विक्रमी विक्री, यंदा विक्रीत 100 टक्के अधिक वाढ

एप्रिलमध्ये प्रमुख एसी कंपन्यांची विक्री विक्रमी पातळीवर पोहोचली असून संपूर्ण मे महिना अजून बाकी असल्याने मागणी कायम राहण्याची अपेक्षा आहे.

AC Sales : उन्हाळ्यात थंडा थंडा कूल कूल; ACची विक्रमी विक्री, यंदा विक्रीत 100 टक्के अधिक वाढ
उन्हाळ्यात थंडा थंडा कूल कूलImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 9:20 AM

मुंबई :  यंदा उन्हाळ्याने अंगाची लाही लाही होत आहे. तापमापकाचे ही डोके गरगरायला लावणा-या उष्णतेमुळे घर थंडा थंडा कूल कूल करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. उन्हाळा (Heatwave)सुरू होताच घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एअर कंडिशनरची (AC) मागणी वाढली आहे. यंदाच्या एप्रिल महिन्यात प्रमुख एसी कंपन्यांची(AC Companies) विक्री (AC Sales) विक्रमी पातळीवर पोहोचली असून, ती कायम राहण्याची शक्यता आहे.व्होल्टास, पॅनासोनिक, हिताची, एलजी आणि हायर या कंपन्यांनी गेल्या महिन्यात एसी विक्रीत विक्रमी वाढ नोंदवली आहे. या उद्योगातील व्यापाऱ्यांच्या मते, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये कोविड -19 साथीच्या दुस-या लाटेमुळे(Covid – 19 Pandemic) मुळे विक्रीमध्ये कमालीची घसरण झाली होती. त्यावेळी प्रदुषण कमी असल्याने आणि बाहेर पडणे धोक्याचे असल्याने घरात एसीची एवढ्या प्रमाणात आवश्यकता जाणवली नाही. परंतू, कोरोनाची भीती कमी होताच, यंदा एप्रिलमध्ये एसीच्या विक्रीने एप्रिल 2019 च्या पूर्वी जो विक्रीचा आकडा होता तो गाठला आहे.

यंदा विक्रीत 100 टक्के अधिक वाढ

व्होल्टासचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) प्रदीप बक्षी यांनी सांगितले की, एप्रिल 2022 मध्ये एसी उद्योगात विक्रीच्या बाबतीत गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत विलक्षण वाढ झाली आहे. गेल्या वर्षी तसा उन्हाळा फार जाणवला नाही. त्यामुळे विक्रीवर त्याचा थेट परिणाम दिसून आला. विक्रीत घट नोंदवण्यात आली होती. यंदा मात्र उलट स्थिती आहे. यंदा उन्हाळ्याने सर्वसामान्यांचा घामाटा काढला आहे. तर या वाढत्या तापमानामुळे एसी कंपन्यांच्या विक्रीतही प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तापमानात झालेली ही वाढ कंपन्यांच्या पथ्यावर पडली आहे. परिणामी यंदा विक्रीत 100 टक्के अधिक वाढ झाली आहे.

पॅनासॉनिक कंपनीने विकले 1 लाख एसी

पॅनासॉनिक इंडियाचे बिझनेस हेड गौरव साहा यांनी सांगितले की, कंपनीने यंदा विक्रमी मागणी नोंदवली असून एप्रिल महिन्यात एक लाखांहून अधिक एसीची विक्री केली आहे. एअर कंडिशनरची यंदा विक्रमी मागणी आहे. पॅनासॉनिक इंडियाने या एप्रिलमध्ये 1 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री केली, जी एप्रिल 2021 च्या तुलनेत 83 टक्क्यांनी वाढली आहे आणि एप्रिल 2019 च्या तुलनेत 67 टक्क्यांनी जास्त आहे.

हे सुद्धा वाचा

1500 कोटी रुपयांची विक्री

याशिवाय हिताची ब्रँड नावाने एसीची विक्री करणाऱ्या जॉन्सन कंट्रोल्स-हिताची एअर कंडिशनिंग इंडियाची विक्री एप्रिल 2021च्या तुलनेत गेल्या महिन्यात जवळपास दुप्पट झाली आहे. या श्रेणीत जास्तीत जास्त उन्हाळ्याच्या हंगामात विक्रमी 1500 कोटी रुपयांची विक्री होण्याची कंपनीला अपेक्षा आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.