Amul Milk Price : अमूल दूध महागले; प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ, नवे दर 1 जुलैपासून लागू होणार

प्राप्त माहितीनुसार अमूल सहकारी संस्थेने वाढत्या खर्चामुळे दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या सर्व ब्रँडमध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली आहे. (Amul milk expensive; The hike of Rs 2 per liter will be effective from July 1)

Amul Milk Price : अमूल दूध महागले; प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ, नवे दर 1 जुलैपासून लागू होणार
अमूल दूध महागले; प्रति लिटर 2 रुपयांनी दरवाढ
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 4:25 PM

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या दरम्यान तेलासह इतर खाद्यपदार्थाच्या किंमती वाढत आहेत. आता सर्वसामान्यांना दुधासाठीही जास्त खर्च करावा लागणार आहे. अमूलने दुधाची किंमत प्रति लिटर 2 रुपयांपर्यंत वाढविली आहे. नवीन किंमती 1 जुलै 2021 पासून लागू होतील. याचा परिणाम गुजरात, दिल्ली, पंजाबच्या ग्राहकांवर होणार आहे. गुजरात मिल्क को-कोपरेटिव्ह मार्केटिंग लिमिटेड (जीसीएमएमएफ) अर्थात अमूलचे एमडी डॉ. आरएस सोधी यांनी टीव्ही 9 शी बोलताना सांगितले की, देशात अमूल दुधाच्या किंमतीत प्रति लिटर 2 रुपये वाढ झाली आहे. (Amul milk expensive; The hike of Rs 2 per liter will be effective from July 1)

प्राप्त माहितीनुसार अमूल सहकारी संस्थेने वाढत्या खर्चामुळे दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या सर्व ब्रँडमध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली आहे. आजच्या वाढीसह, आता अमूल गोल्डचा दर 58 रुपये प्रति लिटरपर्यंत गेला आहे. याशिवाय अमूल शक्ती, अमूल ताजा, अमूल टी स्पेशल, अमूल स्लिम अँड ट्रिम दुधाच्या किंमतीही प्रति लिटर 2 रुपयांनी वाढविण्यात आल्या आहेत.

इतर कंपन्याही किंमती वाढवणार?

अमूल ही देशातील सर्वात मोठी दूध उत्पादक कंपनी आहे. आता अमूलच्या या निर्णयानंतर मदर डेअरीसह इतर कंपन्याही दुधाच्या किंमती वाढवू शकतात. वास्तविक दूध कंपन्यांचा खर्च वाढला आहे.

दुग्धजन्य पदार्थ महाग होणार

दुधाच्या किंमतीत वाढ झाल्याने अन्य दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीही वाढतील. आता दूध महाग झाल्यामुळे चहा, कॉफी, मिठाई आणि चॉकलेटशिवाय तूप, पनीर, लोणी, चीज, लस्सी, आईस्क्रीम आणि ताक यांचे भावही वाढतील. अशा परिस्थितीत दुधाच्या वाढत्या किंमतींबरोबरच सर्वसामान्यांच्या अर्थिक बजेटला आणखी एक झटका बसला आहे.

अमूलचे देशभराच 31 प्लान्ट्स

अमूलचे देशभरात 31 प्लान्ट्स आहेत. त्यापैकी 13 प्लान्ट्स केवळ गुजरातमध्ये आहेत. याशिवाय दिल्ली एनसीआरमध्ये 4 प्लान्ट्स, उत्तर प्रदेशात 2, महाराष्ट्रात 4, राजस्थानमध्ये 3 प्लान्ट्स आहेत. याशिवाय छत्तीसगड, आसाम, मध्य प्रदेश, झारखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये प्रत्येकी एक-एक प्लांट आहे. (Amul milk expensive; The hike of Rs 2 per liter will be effective from July 1)

इतर बातम्या

काय आहे अमेझॉन पे लेटर सर्व्हिस? जी क्रेडिट कार्डशिवाय लोकांना देतेय उधार सामान

चंद्रपुरात 20 दिवसांना बरसला मुसळधार पाऊस

Non Stop LIVE Update
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.