BOB चा मोठा लिलाव, घरं स्वस्तात विकणार, जाणून घ्या लिलाव प्रक्रिया कधीपासून सुरू होणार?

Bank of Baroda | बँक ऑफ बडोदा (BOB) ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. बँकेने एका ट्विटमध्ये लिहिले आहे की मेगा ई-लिलाव 08 ऑक्टोबर 2021 रोजी केला जाईल.

BOB चा मोठा लिलाव,  घरं स्वस्तात विकणार, जाणून घ्या लिलाव प्रक्रिया कधीपासून सुरू होणार?
घरांचा लिलाव

नवी दिल्ली: जर तुम्हालाही महागडं घर, दुकान किंवा जमीन स्वस्तात खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. सरकारी बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) कोणत्याही ब्रोकरेजशिवाय स्वस्तात घर, जमीन, दुकान खरेदी करण्याची संधी उपलब्ध करुन देत आहे. BoB अर्थात बँक ऑफ बडोदाने डिफॉल्ट लिस्टमधील मालमत्तांची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये रहिवासी, व्यावसायिक, औद्योगिक अशा सर्व प्रकारच्या प्रॉपर्टीचा समावेश आहे. या लिलावात तुम्हाला स्वस्तात घर खरेदी करता येऊ शकते. येत्या 8 ऑक्टोबरपासून या लिलाव प्रक्रियेला सुरुवात होत आहे.

लिलाव कधी पार पडणार?

बँक ऑफ बडोदा (BOB) ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. बँकेने एका ट्विटमध्ये लिहिले आहे की मेगा ई-लिलाव 08 ऑक्टोबर 2021 रोजी केला जाईल. यामध्ये निवासी आणि व्यावसायिक मालमत्तेचा ई-लिलाव केला जाईल. आपण येथे वाजवी किंमतीत मालमत्ता खरेदी करू शकता.

लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी काय कराल?

इच्छुक बोलीदारांना बँक ऑफ बडोदा मेगा ई-लिलावासाठी https://ibapi.in/ e bkray पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. या पोर्टलवर ‘बिडर्स रजिस्ट्रेशन’ वर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे नोंदणी करावी लागेल. बँक कुठल्या मालमत्तांचा लिलाव करत आहे, याचा संपूर्ण तपशील https://ibapi.in/https://www.bankofbaroda.in/e auction.htm?utm_source=SM&utm_medium=Post&utm_campaign=MegaAuction_km या लिंकवर उपलब्ध आहे.

बँक कोणत्या मालमत्तेचा लिलाव करते?

ज्या लोकांना कर्जाच्या रूपात पैसे देते, त्याकरिता हमी म्हणून त्यांची निवासी मालमत्ता किंवा व्यावसायिक मालमत्ता इत्यादी तारण ठेवते. जर कर्जदार कर्ज परतफेड करण्यास असमर्थ असेल तर अशा परिस्थितीत बँक दिलेली कर्जे वसूल करण्यासाठी त्याच्या तारण मालमत्तेचा लिलाव करते. याबाबत बँकेच्या संबंधित शाखा वर्तमानपत्र आणि अन्य माध्यमांद्वारे जाहिराती प्रसिद्ध करतात.

e-Auction मध्ये सहभागी कसं व्हायचं?

ई लिलावात सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित प्रॉपर्टीची अनामत रक्कम जमा करावी लागेल. संबंधित बँक शाखेत ‘KYC डॉक्युमेंट्स’ दाखवावे लागतील.

लिलावात सहभागी होणाऱ्या व्यक्तीकडे डिजीटल सिग्नेचर आवश्यक आहे. तुम्हाला ई लिलावामध्ये अन्य अधिकृत एजन्सीद्वारेही सहभागी होता येईल.

संबंधित बँक शाखेत रक्कम जमा करुन, तुमची कागदपत्र दाखवल्यानंतर, तुमच्या अधिकृत ई मेल आयडीवर लॉग इन आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल. नियमावली पाळून तुम्ही या लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकता.

संबंधित बातम्या:

घर खरेदीची मोठी संधी, सणासुदीच्या काळात ‘या’ 4 बँकांनी गृहकर्जाचे दर केले कमी, पटापट तपासा

कर वाचवण्यासाठी म्युच्युअल फंडाचे पैसे फ्लॅट खरेदीसाठी गुंतवू शकतो का? नियम काय?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI