गॅस सिलेंडर बुक करा आणि 10 हजार रुपयांचं सोनं जिंकण्याची संधी मिळवा, जाणून घ्या ऑफर

कंपनीने आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती दिली आणि सांगितले की, नवरात्रीच्या निमित्ताने ग्राहकांना गॅस सिलिंडरच्या खरेदीवर 10 हजार रुपयांपर्यंत सोने जिंकण्याची संधी दिली जात आहे. जरी ही ऑफर फक्त काही काळासाठी आहे. |LPG gas Booking

गॅस सिलेंडर बुक करा आणि 10 हजार रुपयांचं सोनं जिंकण्याची संधी मिळवा, जाणून घ्या ऑफर
एलपीजी

नवी दिल्ली: वाढत्या सिलेंडरच्या किमतींमुळे सामान्य घरांमधील किचन बजेट बिघडले आहे. परंतु अशा परिस्थितीत जर तुम्हाला महागड्या गॅस सिलिंडरच्या बुकिंगवर 10000 रुपयांचे सोने जिंकण्याची संधी मिळाली तर यापेक्षा चांगली संधी काय असू शकते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की तुम्ही गॅस सिलेंडर बुक केल्यावर 10000 रुपयांपर्यंतचा लाभ घेऊ शकता. नवरात्रीच्या दिवसात एलपीजी कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस लिमिटेड (एचपीसीएल) ने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे.

कंपनीने आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती दिली आणि सांगितले की, नवरात्रीच्या निमित्ताने ग्राहकांना गॅस सिलिंडरच्या खरेदीवर 10 हजार रुपयांपर्यंत सोने जिंकण्याची संधी दिली जात आहे. जरी ही ऑफर फक्त काही काळासाठी आहे.

काय आहे ऑफर?

तुम्ही पेटीएमद्वारे गॅस बुक केलात, तर 10 हजार रुपयांपर्यंतचे सोने जिंकण्याची संधी मिळेल. ही ऑफर 7 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर पर्यंत वैध आहे. म्हणजेच, तुमच्याकडे या ऑफरचा लाभ घेण्यासाठी फक्त 2 दिवस शिल्लक आहेत. नवरात्री सुवर्ण ऑफर अंतर्गत दररोज 5 भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाईल. यानंतर, विजेत्यांना पेटीएम कडून 10,001 रुपये किमतीचे 24 कॅरेट सोने दिले जाईल.

ही ऑफर फक्त गॅस सिलिंडरच्या बुकिंग आणि पेमेंटवर लागू होईल. तथापि, जर वापरकर्त्यांनी पेटीएममधून गॅस सिलेंडर बुक केले तर त्यांना इतर अनेक फायदे देखील मिळतील. प्रत्येक सिलेंडर बुकिंगवर वापरकर्त्यांना 1000 कॅशबॅक पॉइंट दिले जात आहेत.

एलपीजी कसा बुक कराल?

* गॅस बुक करण्यासाठी प्रथम तुम्हाला बुक गॅस सिलेंडरवर क्लिक करावे लागेल.
* यानंतर तुमचा गॅस पुरवठादार निवडा.
* आता मोबाईल नंबर, एलपीजी आयडी आणि ग्राहक क्रमांक टाका.
* आता तुमचा पेमेंट मोड निवडून तुम्ही पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय, कार्ड्स, नेट बँकिंग निवडू शकता.
* याशिवाय, तुम्ही पेटीएम पोस्टपेड पर्याय देखील निवडू शकता.
* पेमेंट झाल्यानंतर तुमचा सिलेंडर बुक होईल.

मुंबईत CNG आणि PNGच्या दरात वाढ

दिल्लीपाठोपाठ आता मुंबईत CNG आणि PNGच्या दरात वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यातील ही दुसरी दरवाढ आहे. महानगर गॅसने सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती अनुक्रमे 2.97 आणि 1.29 रुपये प्रति किलो वाढवल्या आहेत. 13 ऑक्टोबर 2021 च्या मध्यरात्रीपासून नवीन दर लागू झाले आहेत. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने मंगळवारी सीएनजीच्या किंमतीत 2.28 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत सीएनजीची किंमत 57.54 रुपये प्रतिकिलो इतकी झाली. तर PNGचा भाव 33.93/SCM इतका झाला.

दोन आठवड्यांपूर्वीच महानगर गॅसने सीएनजीच्या किमतीत 5.56 रुपये प्रति किलो (10.7%) आणि पीएनजीची किंमत 3.53 रुपये प्रति एससीएम (11.6%) ने वाढवली होती. सीएनजीच्या या वाढलेल्या दरामुळे मुंबईतील लाखो ऑटो आणि टॅक्सी चालकांवर खर्चाचा बोजा वाढला आहे. घरगुती पाइपलाइन गॅसच्या किमती वाढल्याने गृहिणींचे बजेट बिघडणार आहे.

संबंधित बातम्या:

Petrol Diesel Price Today: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ, जाणून घ्या आजचा दर

कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ अटळ?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI