1 October 2021: आजपासून आर्थिक व्यवहाराशी संबंधित ‘हे’ पाच नियम बदलणार

अलीकडच्या काळात अगदी दर महिन्याला आर्थिक व्यवहारांशी संबंधित कोणत्या ना कोणत्या नियमांत बदल होत असतो. येत्या 1 ऑक्टोबरपासून आर्थिक व्यवहारांबाबत असेच काही बदल होऊ घातले आहेत. | Changes form 1 October 2021

1 October 2021: आजपासून आर्थिक व्यवहाराशी संबंधित 'हे' पाच नियम बदलणार

मुंबई: आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी सरकार आणि बँकांकडून सातत्याने नियमांमध्ये बदल केले जात असतात. त्यामुळे अलीकडच्या काळात अगदी दर महिन्याला आर्थिक व्यवहारांशी संबंधित कोणत्या ना कोणत्या नियमांत बदल होत असतो. येत्या 1 ऑक्टोबरपासून आर्थिक व्यवहारांबाबत असेच काही बदल होऊ घातले आहेत.

1. तीन बँकांची चेकबुक्स रद्द

आजपासून तीन बँकांची चेकबुक निरुपयोगी झाली. या बँका अन्य बँकांमध्ये विलीन करण्यात आल्या आहेत आहेत. या तीन बँकांमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC), अलाहाबाद बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (UBI) यांचा समावेश आहे. ओबीसी आणि यूबीआय बँक पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) विलीन झाल्या आहेत. परिणामी या तिन्ही बँकांची चेकबुक्स आजपासून ग्राहकांना वापरता येणार नाहीत.

2. ऑटो डेबिटच्या नियमांत बदल

ऑटो डेबिटचा नवा नियम 1 ऑक्टोबरपासून लागू झाला आहे. त्यानुसार बँका आणि इतर वित्तीय संस्थांना प्रत्येक वेळी 5000 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचा हप्ता किंवा बिल भरण्यासाठी ग्राहक किंवा वापरकर्त्यांकडून मान्यता घ्यावी लागेल. यापूर्वी विशिष्ट तारखेला बँक किंवा मोबाईल वॉलेट तुमच्या खात्यातून आपोआप पैसे वळते करुन घेत असे. मात्र, आता त्यासाठी ग्राहकांची परवानगी लागेल.

3. म्युच्युअल फंडाच्या नियमांत बदल

सेबीने म्युच्युअल फंडाशी संबंधित कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम जारी केला आहे. या नियमानुसार, म्युच्युअल फंड कंपन्यांच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या 10 टक्के रक्कम म्युच्युअल फंड युनिटमध्ये गुंतवली जाईल. हा नियम टप्प्याटप्प्याने अंमलात आणला जात आहे. 1 ऑक्टोबर 2023 पासून गुंतवणूकीची मर्यादा 20 टक्क्यापर्यंत वाढवण्यात येईल.

4. पेन्शनच्या नियमात बदल

डिजिटल लाइफ सर्टिफिकेटशी संबंधित नियम आजपासून लागू होतील. आता देशातील सर्व वृद्ध निवृत्तीवेतनधारक ज्यांचे वय 80 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, ते देशाच्या सर्व मुख्य कार्यालयांच्या जीवनप्रदान केंद्रात डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

5. डीमॅट अकाऊंटच्या नियमांत बदल

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या डीमॅट आणि ट्रेडिंग खात्याचे केवायसी अपडेट करण्यासाठी 30 सप्टेंबरची अंतिम मुदत होती. शेअर बाजारात व्यापार करण्यासाठी खातेधारकांना त्यांचे नाव, पत्ता, पॅन, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि उत्पन्नाची मर्यादा केवायसी अंतर्गत वैध आयडी पुराव्यासह पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. जर कोणत्याही खातेधारकाने केवायसी अपडेट केले नाही, तर त्याचे डीमॅट आणि ट्रेंडिंग खाते आजपासून बंद केले जाईल.

संबंधित बातम्या:

1 ऑक्टोबरपासून पोस्टातील आर्थिक व्यवहाराशी संबंधित ‘या’ सहा गोष्टी बदलणार

1 ऑक्टोबरपासून हॉटेल्स, रेस्टाँरंटसच्या बिलांसाठी नवा नियम, उल्लंघन झाल्यास कारवाई

आजपासून या बँकेची ATM सेंटर्स बंद, ग्राहकांना पैसे कसे मिळणार?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI