AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हेल्थ इन्शुरन्स काढताय, अगोदर या 5 गोष्टी तपासा, अन्यथा क्लेम रिजेक्ट होणार; पैसे जातील वाया!

हेल्थ इन्शुरन्स आता काळाजी गरज झाली आहे. कारण रुग्णालयात दाखल झालं की खर्च करणं परवडत नाही. पण हेल्थ इन्शुरन्स घेताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अपेक्षित झालेला खर्च मिळणं कठीण होतं.

हेल्थ इन्शुरन्स काढताय, अगोदर या 5 गोष्टी तपासा, अन्यथा क्लेम रिजेक्ट होणार; पैसे जातील वाया!
हेल्थ इन्शुरन्स काढताय, अगोदर या 5 गोष्टी तपासा, अन्यथा क्लेम रिजेक्ट होणार; पैसे जातील वाया!Image Credit source: TV9 Network
| Updated on: Aug 29, 2026 | 8:50 PM
Share

आपल्या कुटुंबाला काहीही होऊ नये यासाठी प्रत्येक जण काळजी घेत असतो.  भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी काळजी घेतली जाते.  काळजीपोटी सर्वात प्रथम हेल्थ इन्शुरन्स काढला जातो. कारण जवळची व्यक्ती रुग्णालयात भरती झाली की जीव कासावीस होतो. उपचार आणि खर्च याची सांगड घालणं कठीण होतं. त्यामुळे जवळ हेल्थ इन्शुरन्स असेल तर काळजी नसते. पण हेल्थ इन्शुरन्स नसेल आणि व्यक्ती रुग्णालयात दाखल झाली की सर्व जमापुंजी संपून जाते. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स असणं कधीही चांगलं असतं. आता तर ऑनलाईन हेल्थ इन्शुरन्स काढणंही सोपं झालं आहे. एका क्लिकवर मोबाईल एपच्या माध्यमातून तुम्ही काढू शकता. पण असं असताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. पॉलिसीचे नियम जाणून घेणं आवश्यक आहे. अन्यथा छोटीशी अटही आपल्याला गोत्यात आणू शकते.

पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी या पाच गोष्टी लक्षात ठेवा

कॅशलेस म्हणजे पैसे द्यायचेच नाही असं नाही : अनेकांना वाटतं की हेल्थ इन्शुरन्स काढलं की झालं. आता काही टेन्शन नाही. रुग्णालयात दाखल झालं की खिशातून काहीच द्यावं लागणार नाही. पण तसं नाही. कॅशलेस म्हणजे पॉलिसीत कवर होणाऱ्या खर्चाचा तालमेल विमा कंपनी आणि रुग्णालय यांच्यात असतो. त्यामुळे विमा कंपनी प्रत्येक खर्च देईलच असं नाही. उदाहरण द्यायचं झालं तर हातमोजे, सिरिंज, मास्क, पीपीई किट यांचा खर्च पॉलिसीत नसतो. पॉलिसीच्या अटीनुसार हा खर्च वाजवी मानला जातो.

रूम भाड्याची मर्यादा नक्की तपासा: पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला रुमचं भाडं किती आहे हे नक्की तपासा. कारण तुमच्या दाव्यावर त्याचा परिणाम नक्कीच होतो. कारण तुमच्या पॉलिसीत खोलीचे भाडे निश्चित असतं. पण तुम्ही महागडी खोली निवडली तर निर्धारित रक्कमेच्या वरचे पैसे तुम्हाला द्यावे लागतील.

एजेंटचं म्हणणं शेवटचं असं करू नका: एजेंट पॉलिसी खपवण्यासाठी आणि त्याच्या कमाईसाठी बरंच काही सांगतात. पण पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी तसंच आहे का एकदा तपासून घ्या. एजेंटने सांगितलेल्या सर्व गोष्टी पॉलिसीत आहेत की नाही तपासा.

जुना आजार लपवू नका : अनेकदा पॉलिसी घेताना जुना आजार लपवला जातो. जसं की बीपी, डायबिटीज, थायरॉइड या सारख्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत. काही जण प्रीमियर वाढेल या भीतीपोटी सांगत नाहीत. पण त्यानंतर रुग्णालयाच्या रेकॉर्डमध्ये जुन्या आजाराची माहिती मिळते आणि क्लेम वादात अडकतो. त्यामुळे मेडिकल हिस्ट्री सांगणं सुरक्षित मानलं जातं.

फक्त प्रीमियर पाहून पॉलिसी घेऊ नका: अनेकदा स्वस्त पॉलिसी म्हणून लगेच खरेदी करण्याचा मोह होतो. पण स्वस्त पॉलिसीत मर्यादाही असतात हे विसरू नका. काही आजारपण त्या पॉलिसीत कवर होत नाहीत. त्यामुळे पॉलिसी खरेदी करताना स्वस्त महाग न पाहता. त्यातील अटी आणि शर्थी काय आहेत ते पाहा.

Follow Us
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; राऊतांना...
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; बड्या नेत्याचा राऊतांना इशारा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी, पहा खास क्षणाचा व्हिडीओ
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात...नेमकं प्रकरण काय?
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात... नेमकं प्रकरण काय?
परभणीत एकनाथ शिंदे यांचा भव्य शेतकरी मेळावा; महाराष्ट्राच्या राजकारणात
परभणीत एकनाथ शिंदे यांचा भव्य शेतकरी मेळावा; महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं ठरणार
वैजापुरातील पानटपरीवर एफडीएची कारवाई, मुदत बाह्य पदार्थ जप्त
छत्रपती संभाजीनगर: वैजापुरातील पानटपरीवर एफडीएची कारवाई, मुदत बाह्य पदार्थ जप्त
लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही; विद्यार्थ्यांचा...
लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही; आदिवासी विद्यार्थ्यांचा मोठा निर्णय
मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द,
मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द, अचानक काय घडलं?
45 लाख गाड्या, 5 टप्प्यात 6 कोटी मराठे... मनोज जरांगेंनी सांगितलं...
45 लाख गाड्या, 5 टप्प्यात 6 कोटी मराठे... मनोज जरांगेंनी सांगितला मोठा प्लॅन