Chque Bounce Rules : खबरदार! चेक बाऊन्स कराल तर आता मोठी शिक्षा, लवकरच नवीन नियम, असा बसेल फटका

Cheque Bounce Rules : धनादेश अनादरप्रकरणात आता कठोर नियमांचा मोठा फटका बसू शकतो.

Chque Bounce Rules : खबरदार! चेक बाऊन्स कराल तर आता मोठी शिक्षा, लवकरच नवीन नियम, असा बसेल फटका
Follow us
| Updated on: Jan 15, 2023 | 10:36 PM

नवी दिल्ली : बँक खाते (Bank Account) उघडताना ग्राहकाला अनेक सुविधा मिळतात. त्यांना डेबिट कार्ड (Debit Card), क्रेडिट कार्ड (Credit Card), चेकबुक(Cheque Book) अशा सुविधा मिळतात. जर तुम्ही धनादेशाद्वारे रक्कम अदा करत असाल तर आता खबरदार रहा. धनादेश अनादरप्रकरणात (cheque bounce) आता कठोर नियम करण्यात आले आहे. चेक बाऊन्स करणाऱ्यांना कायमचा धडा शिकवण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. त्यासाठी नियमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्टसनुसार, केंद्र सरकार चेक बाऊन्सचे नवीन नियम (Cheque Bounce New Rules) तयार करत आहे. यासंबंधी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयातील तज्ज्ञांची एक समिती तयार केली आहे. या समितीने केंद्र सरकारला काही शिफारशी केल्या आहेत.

तर अर्थमंत्रालयाने (Finance Ministry) पण एक उच्च स्तरीय बैठक घेतली. यादरम्यान चेक बाऊन्सच्या नियमात बदल (Cheque Bounce Rule Change) करण्याची सूचना करण्यात आली आहे. या सूचनांवर विचार करुन केंद्र सरकार लवकरच धनादेश अनादरप्रकरणात नवीन नियम (New Cheque Bounce Rules) लागू करणार आहे.

हे सुद्धा वाचा

अर्थमंत्रालयाने चेक बाऊन्सच्या नियमानुसार ग्राहकाच्या खात्यात किमान शिल्लक नसल्यास त्याच्या दुसऱ्या बँक खात्यातून ही रक्कम कपात करण्यात येणार आहे. तसेच धनादेशाद्वारे ग्राहक पेमेंट करणार असेल तर त्याच्या खात्यात शिल्लक रक्कम असणे अनिवार्य करण्यात येणार आहे .

धनादेशावरील रक्कमे इतकी रक्कम खात्यात नसेल तर संबंधित ग्राहकावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर बँक खाते बंद करण्यात येईल आणि नवीन बँक खाते उघडण्यासही मनाई करण्यात येणार आहे. अर्थात याविषयीच्या प्रस्तावावर चर्चा सुरु आहे.

पण हे नवीन नियम एवढ्या कठोरपणे लागू झाल्यास लोकांची फसवणुकीपासून कायमची मुक्तता होईल. फसवणूक करणाऱ्यांना बँका वाळीत टाकतील. अशा लोकांची ओळख ही पटेल आणि इतर लोकांची फसवणूक त्यामुळे टळेल. तसेच मोठा दंडही आकारण्यात येणार आहे.

सध्या चेक बाऊन्स प्रकरणात शिक्षेची तरतूद आहे. धनादेश अनादर प्रकरणात आरोपीविरोधात गुन्हा दाखल होतो. प्रकरणात दंडाची तरतूद आहे. तसेच ज्याची फसवणूक झाली, त्याला दुप्पट रक्कम परत करावी लागू शकते. अशा व्यक्तीला दोन वर्षांचा कारावास होऊ शकतो.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.