AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिप्टोकरन्सीत येऊ देत चढ-उताराच्या लाटा, SIP ची जादू आणले गुंतवणुकीत बहार

क्रिप्टोकरन्सीची क्रेझ सतत वाढत आहे.क्रिप्टोकरन्सीमध्ये बरीच अस्थिरता आहे. पद्धतशीर गुंतवणूक योजनेच्या मदतीने अर्थात SIPद्वारे क्रिप्टोकरन्सीच्या अस्थिरतेवर उतारा काढता येईल.

क्रिप्टोकरन्सीत येऊ देत चढ-उताराच्या लाटा, SIP ची जादू आणले गुंतवणुकीत बहार
cypto currency
| Updated on: Mar 26, 2022 | 10:04 AM
Share

मुंबई : देशात मान्यता मिळाली नसली तरी क्रिप्टोकरन्सीची (Crypto) क्रेझ सतत वाढत आहे. आतापर्यंत देशात या चलनाला कायदेशीर दर्जा (Legal Aproval) देण्यात आलेला नाही, पण क्रिप्टोवर कर आकारुन सरकारने आपला हेतू स्पष्ट केला आहे. 2022 च्या अर्थसंकल्पात सरकारने क्रिप्टोकरन्सीवरील नफ्यावर 30% कर (Tax) लावण्याची घोषणा केली. क्रिप्टोकरन्सीमध्ये बरीच अस्थिरता आहे. त्याची किंमत खूप वेगाने कमी जास्त होते. काही दिवसांतच तुमची गुंतवणूक अनेक पटींनी वाढू आणि कमी होऊ शकते. सध्या, क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीबाबत असा डेटा उपलब्ध नाही. गुंतवणुकदारांनी नेहमीच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्यामुळेच वित्तीय तज्ज्ञ त्यात कमी गुंतवणूक (Crypto currency Investment) करण्याची शिफारस करतात. जर तुम्हाला क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर जाणून घ्या गुंतवणूक कशी करायची

जर तुम्हाला क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर SIP करा, असं अर्थ तज्ज्ञांचे म्हणणं आहे. पद्धतशीर गुंतवणूक योजनेच्या मदतीने (SIP) क्रिप्टोकरन्सीच्या अस्थिरतेचा प्रभाव कमी करता येईल. एसआयपी किंवा रिकरिंग बाय प्लॅनच्या मदतीने डिजिटल मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय शहाणपणाचे ठरेल.

एसआयपीच्या मदतीने क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक स्टार्टअप्स पुढे आले आहेत. एसआयपीच्या मदतीने अस्थिरता कमी करता येईल, असं त्यांचं म्हणणं आहे. दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकीत तुमचा डिजिटल पोर्टफोलिओ चमकेल आणि तुम्ही जोखीम घेऊन ही मालदार व्हाल. हा प्रकार म्युच्युअल फंडात एसआयपी करण्यासारखा आहे.

नेहमीच सतर्क राहा 

परंतु, एक खूणगाठ मनाशी पक्की बांधा. इतर पर्यायांमध्ये गुंतवणुकीविषयीची अनेक वर्षांपासून ची माहिती उपलब्ध आहे. त्याचा अभ्यास करून गुंतवणुकदार ठोकताळे वापरून यामध्ये दीर्घ काळापासून गुंतवणूक करत आहेत, ज्यामुळे त्यांना गुंतवणुकीवर कधी काय परिणाम होतो हे सहज कळू शकतं. सध्या, क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीबाबत असा डेटा उपलब्ध नाही. गुंतवणुकदारांनी नेहमीच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये 24 तास व्यापार होतो. जगातील कोणत्याही घटनेचा थेट परिणाम त्यावर होत असतो. अशा परिस्थितीत गुंतवणुकदारांना नेहमीच सतर्क राहावे लागणार आहे.

आर्थिक तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये जोखीम नको असेल तर क्रिप्टोकरन्सीपासून दूर राहा. कारण यात वेगाने उलाढाल होते. काही दिवसांतच तुमची गुंतवणूक अनेक पटींनी वाढू आणि कमी होऊ शकते. तरीही त्याची स्वीकारार्हता खूप वेगाने वाढत आहे, जी नाकारता येत नाही. पोर्टफोलिओच्या केवळ 5-10% क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

संबंधित बातम्या

Post Office Saving Schemes : गुंतवणूक करायचीये? मग पोस्टाच्या ‘या’ योजनेबद्दल जाणून घ्या, चांगल्या परताव्याची हमखास गॅरंटी

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास किती टॅक्स लागतो; जाणून घ्या परताव्यावरील टॅक्सचे संपूर्ण गणित

Ramdev Baba यांची कंपनी देतेय कमाईची संधी, संधीचे करा सोने; 28 मार्चपर्यंत गुंतवणुकीची संधी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.