म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास किती टॅक्स लागतो; जाणून घ्या परताव्यावरील टॅक्सचे संपूर्ण गणित

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास किती टॅक्स लागतो; जाणून घ्या परताव्यावरील टॅक्सचे संपूर्ण गणित
म्युच्युअल फंडावर किती टॅक्स लागतो?

म्युच्युअल फंडमधील (Mutual funds) गुंतवणूक कर (tax) वाचवण्यासाठी खूप प्रभावी पर्याय आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना किती कर भरावा लागतो ? हे समजून घ्या.

अजय देशपांडे

|

Mar 26, 2022 | 5:30 AM

मुंबईतील समीर शाह हे एक अत्यंत शिस्तप्रिय गुंतवणूकदार (Investors) आहेत. त्यांची बहुतांश गुंतवणूक (Investment) म्युच्युअल फंडमध्ये (Mutual funds) आहे. मात्र, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यानंतर टॅक्स किती भरावा लागतो याची त्यांना काहीच माहिती नाही. म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक कर वाचवण्यासाठी खूप प्रभावी पर्याय आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना किती कर भरावा लागतो ? हे समजून घ्या. ज्यावेळी तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडच्या योजनेतील युनिट विकता त्याच वेळेस टॅक्स भरावा लागतो. इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक केल्यानंतर समीर यांना किती टॅक्स द्यावा लागणार? हे आता पाहूयात. फंड गुंतवणकीमधील 65 टक्के रक्कम शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास त्याला इक्विटी फंड असे म्हणतात. या फंडमधील युनिट एका वर्षाच्या आत विकल्यास मिळणाऱ्या परताव्याला अल्पकालीन भांडवली नफा म्हणजेच STCG म्हणतात. या परताव्यावर 15 टक्के टॅक्स आणि 4 टक्के सेस लागतो. सेस म्हणजे टॅक्सवर लागणारा अतिरिक्त टॅक्स होय.याचप्रकारे एखाद्या इक्विटी म्युच्युअल फंडच्या युनिट्सची विक्री एका वर्षानंतर केल्यास त्याला दीर्घकालीन भांडवली नफा म्हणतात. यावेळी परताव्यावर 10 टक्के टॅक्स आणि 4 टक्के सेस द्यावा लागतो.

…तरच द्यावा लागतो टॅक्स

मात्र, यातील एक दिलासादायक बाब म्हणजे गुंतवणुकदारांना एका आर्थिक वर्षात एक लाख रुपयांपेक्षा जास्त परतावा मिळाल्यासच टॅक्स द्यावा लागतो. हा परतावा एक लाखांपेक्षा कमी असल्यास कोणताही टॅक्स लागत नाही. एखाद्या डेट फंडच्या युनिट्सची विक्री 3 वर्षापेक्षा कमी कालावधीत करण्यात आल्यास अल्पकालीन भांडवली नफ्यावर टॅक्स द्यावा लागतो. हा टॅक्स गुंतवणुकीच्या प्रमाणात द्यावा लागतो. तसेच डेट फंड्सच्या युनिट्सची विक्री तीन वर्षानंतर केल्यास दीर्घकालीन भांडवली नफ्यावर टॅक्स द्यावा लागतोयात इंडक्सेशनचा फायदाही मिळतो. म्हणजेच महागाईच्या दराच्या तुलनेत टॅक्समध्ये बदल केला जातो.

हायब्रिड फंडावर टॅक्स

आता हायब्रिड फंडावर टॅक्स कसा लागतो ते पाहूयात. हायब्रिड फंडात गुंतवणूकदारानं किती रक्कम इक्विटीमध्ये गुंतवली आहे, त्याप्रमाणात टॅक्स लागतो. पोर्टफोलिओमधील 65 टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक केली असल्यास इक्विटी फंडप्रमाणे टॅक्स लागतो. गुंतवणूक 65 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास डेट फंडासारखा टॅक्स द्यावा लागतो. या अगोदर कंपन्या लाभांशावर टॅक्स देत असल्यानं गुंतवणुकदारांना मिळणाऱ्या लाभांशावर टॅक्स लागत नव्हता. 2021-22 च्या बजेटनंतर म्युच्युअल फंड्समधून मिळणाऱ्या लाभांशावर गुंतवणूकदारांना टॅक्स भरावा लागत आहे.म्हणजेच गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न करप्राप्त उत्पन्नात गृहित धरले जाते. त्यानंतर कर रचनेनुसार टॅक्स द्यावा लागतो. तसेच SIP द्वारे इक्विटी फंड्समध्ये गुंतवणूक केल्यास देखील टॅक्स द्यावा लागतो. इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक केली नसल्यास निर्धारित दरानुसार टॅक्स द्यावा लागतो. कर रचनेनुसार प्रत्येक SIP ला नवीन गुंतवणूक समजली जाते. अशाप्रकारे एका आर्थिक वर्षातील SIP वर टॅक्स द्यावा लागतो.

संबंधित बातम्या

भविष्यात पेट्रोल, डिझेल आणखी महागणार ; पेट्रोलियम कंपन्यांना तीन महिन्यात 19 हजार कोटी रुपयांचा तोटा

चालू आर्थिक वर्षात 2.26 कोटी करदात्यांना मिळाला Tax Refund, घरी बसल्या ‘असे’ चेक करा आपल्या आयकर परताव्याचे स्टेटस

मारुती सुझुकीला मिळाले नवीन सीईओ; हिसाशी ताकेऊची एप्रिलपासून पदभार स्विकारणार, तीन वर्षासाठी नियुक्ती

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें