भविष्यात पेट्रोल, डिझेल आणखी महागणार ; पेट्रोलियम कंपन्यांना तीन महिन्यात 19 हजार कोटी रुपयांचा तोटा

पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये भविष्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र ही वाढ एका ठराविक अंतराने केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मंगळवारी आणि बुधवारी इंधनाच्या दरामध्ये लिटर मागे प्रत्येकी 80 पैशांची वाढ करण्यात आल्याने गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर आहेत.

भविष्यात पेट्रोल, डिझेल आणखी महागणार ; पेट्रोलियम कंपन्यांना तीन महिन्यात 19 हजार कोटी रुपयांचा तोटा
Petrol-Diesel Price
Image Credit source: twitter
अजय देशपांडे

|

Mar 25, 2022 | 7:26 AM

नवी दिल्ली : चार नोव्हेंबर 2021 ला केंद्र सरकारने इंधनावरील टॅक्स (tax) कमी करण्याचा निर्णय घेतल्याने पेट्रोल (Petrol) पाच रुपयांनी तर डिझेल (Diesel) दहा रुपयांनी स्वस्त झाले होते. तेव्हापासून देशात इंधनाच्या किमती स्थिर होत्या त्यामध्ये अखेर गेल्या मंगळवारी वाढ करण्यात आली. या काळात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत राहिल्याने त्याचा मोठा फटका हा पेट्रोलियम कंपन्यांना बसला आहे. त्यामुळे आता पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये भविष्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र ही वाढ एका ठराविक अंतराने केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मंगळवारी आणि बुधवारी इंधनाच्या दरामध्ये लिटर मागे प्रत्येकी 80 पैशांची वाढ करण्यात आल्याने गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर किती रुपयांनी वाढवायचे व ते कधी वाढवायचे याचा निर्णय आता पेट्रोलियम कंपन्यांकडून घेण्यात येणार आहे.

तीन महिन्यांमध्ये 19 हजार कोटी रुपयांचा तोटा

आंतरराष्ट्रीय रेटिंग संस्था मूडीजच्या रिपोर्टनुसार गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मात्र भारतात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आल्याने गेल्या तीन महिन्यांमध्ये इंधन कंपन्या इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्याना तब्बल 19,000 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. सरकारी आकड्यानुसार चार नोव्हेंबर 2021 रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 89.34 डॉलर होती. डिसेंबरमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण झाली कच्चे तेल 83.45 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. तर जानेवारी 2022 मध्ये कच्च्या तेलाच्या दरात वाढ होऊन कच्च्या तेलाचे भाव 97.09 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. फेब्रुवारी महिन्यात त्यामध्ये आणखी वाढ होऊन कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 108.70 डॉलरवर तर मार्चच्या पहिल्या पंधरवाड्यात कच्च्या तेलाचे दर तब्बल 139 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले होते. मात्र या काळात पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर असल्याने इंधन कंपन्यांना मोठा फटका बसला.

रशिया युक्रेन युद्धाचा फटका

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. या युद्धाचा जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मार्चच्या पहिल्या पंधरवाड्यात तर कच्च्या तेलाच्या किमती गेल्या चौदा वर्षातील सर्वोच्च पातळीवर म्हणजेच 139 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या होत्या. मात्र त्यानंतर त्यात काही प्रमाणात घट झाली. कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने चढ उतार सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर भारतात इंधन दरवाढ अपेक्षीत होती. मात्र चार नोव्हेंबर 2021 पासून 22 मार्च 2022 पर्यंत इंधनाच्या किमतीत कोणताही बदल न करण्यात आल्याने त्याचा मोठा फटका हा ईंधन कंपन्यांना बसला आहे.

संबंधित बातम्या

चालू आर्थिक वर्षात 2.26 कोटी करदात्यांना मिळाला Tax Refund, घरी बसल्या ‘असे’ चेक करा आपल्या आयकर परताव्याचे स्टेटस

मारुती सुझुकीला मिळाले नवीन सीईओ; हिसाशी ताकेऊची एप्रिलपासून पदभार स्विकारणार, तीन वर्षासाठी नियुक्ती

Discount मिळालेल्या Russian Crude Oil दरापेक्षा पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार ? Indian Oilने नेमकं काय केलं?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें