Family Pension : ‘यांनाही’ मिळणार फॅमेली पेन्शनचा फायदा, केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय

मानसिक आजारी किंवा शारीरिक दुर्बल असणाऱ्या मुलांना आपल्या मृत आई-वडिलांची पेन्शन मिळणार आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मोदी सरकारकडून कुटुंबियांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.

Family Pension : ‘यांनाही’ मिळणार फॅमेली पेन्शनचा फायदा, केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 12:10 PM

नवी दिल्ली:  मानसिक रुग्ण किंवा शारीरिक दुर्बल मुलांना (Mental disorder) यापूर्वी फॅमेली पेन्शनचा (Family pension)लाभ मिळत नव्हता. अशावेळी ते पहिलेच आपले पालनपोषण करु शकत नाही. अशात ते फॅमेली पेन्शनसाठी पात्र नसल्याने त्यांना अनेक अडचणीला समोरे जावं लागत होते. मात्र आता मोदी सरकराने फॅमेली पेन्शनसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मृत सरकारी कर्मचाऱ्यांच्या(Deceased government employee) मानसिकदृष्ट्या अपंग किंवा शारीरिक दुर्बल मुलांनाही कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ घेता येणार आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली आहे. निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी फॅमिली पेन्शनसंदर्भात लोकांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांचा लक्षात आलं पेन्शन देणाऱ्या बँका या शारीरिक दुर्बल किंवा मानसिक आजारी मुलांना या पेन्शनपासून वंचित ठेवतात. अशा मुलांना पेन्शन देण्यासाठी बँका मुलांना कोर्टाने दिलेले पालकत्व प्रमाणपत्र मागतात. त्यामुळे या मुलांना पेन्शनसाठी खूप झगडावं लागतं. त्यामुळे मोदी सरकार सामान्य लोकांचे जीवन अधिक सुकर करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं, जितेंद्र सिंह म्हणाले.

मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

शारीरिक दुर्बल, अपंग किंवा मानसिक आजारग्रस्त मुलांना आपली देखभाल करणे कठिण असतं. अशात जर त्यांचे आई किंवा वडिल हे सरकार कर्मचारी असेल तर त्यांना फॅमेली पेन्शनसाठी लढावं लागतं. त्यामुळे मोदी सरकारने या मुलांना त्रास होऊ नये आणि त्यांना न्याय मिळावा म्हणून कुटुंब पेन्शनच्या नामांकनामध्ये तरदूर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता अशा मुलांनाही मृत आई किंवा वडिलांनाची पेन्शन सहज मिळणार आहे. या मुलांना पालकत्व प्रमाणपत्र न्यायालयाकडून मिळावं ही प्रक्रिया पण आता सोपी करण्यात येणार आहे. जेणे करुन या मुलांना हे प्रमाणपत्र लवकर मिळावं. कारण या प्रमाणपत्राच्या आधारावर बँकेतून पेन्शन मिळत असते. विशेष म्हणजे हे प्रमाणपत्र नसल्यास बँका पेन्शन लाभार्थी मुलांना पेन्शन नाकारु शकत नाही, असंही जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.

काय आहे बँकांसाठी नियम

मोदी सरकारने बँकांसाठी कुटुंब निवृत्ती पेन्शनसंदर्भात आदेश जारी केले आहेत. त्यानुसार जर एखाद्या अपंग मुलाकडे कोर्टाने दिलेले पालकत्व प्रमाणपत्र नसेल तरीही त्याला पेन्शन देण्यात यावी. जर बँकांनी या आदेशाचं पालन न केल्यास बँकेकडून केंद्रीय नागरी सेवा नियम 2021 वैधानिक तरतुदींचं उल्लंघन होईल. तसंच जर मुलांचं नाव पालकांच्या पेन्शन योजनेत नसेल तर तरीही बँकेने कोर्टाचे प्रमाणपत्र मागितले तरीही हे चुकीचं असणार. दरम्यान यासंदर्भात पेन्शन विभागाकडे अनेक तक्रारी आल्या आहेत म्हणून खास करुन पेन्शन विभाग आता फॅमेली पेन्शनच्या नॉमिनी नियमासंदर्भात विशेष लक्ष देत आहे. तसंच पेन्शन देणाऱ्या प्रत्येक बँकांना सरकारकडून नवीन नियमासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. सरकारकडून फॅमिली पेन्शनसंदर्भात जे नियम काढण्यात आले आहे त्याचे सक्तीने पालन झाले पाहिजे.

पेन्शन विभागाचं महत्त्वाचं पाऊल

पेन्शन विभागाने पेन्शनधारकांचं आयुष्य सुकर जावं यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. हा निर्णय घेऊन मोदी सरकारने म्हणजे सरकारच्या पेन्शन विभागाने महत्त्वाचं पाऊल उचलं आहे. यापूर्वी घटस्फोटित मुलींनाही कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ घेता यावा यासाठी त्यांनी नियम आणले. विशेष म्हणजे मोबाईल अॅपवर पेन्शनसाठी आवश्यक असलेलं जीवन प्रमाणपत्र जमा करु शकतात. तर वृद्ध नागरिकांना डिजिटल माध्यमातून हे प्रमाणपत्र देऊ शकता. त्यामुळे आता पेन्शनचा लाभ घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज राहिली नाहीत.

 इतर बातम्या:

Maharashtra Weather Forecast : महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार, आयएमडीचा 9 जिल्ह्यांना इशारा, गारासंह पावसाचा अंदाज

Budget 2022 : द्राक्ष उत्पादकांना हवी हक्काची बाजारपेठ अन् उत्पादनावरील खर्चावर नियंत्रण, शेतकऱ्यांच्या अपेक्षा होणार का पूर्ण?

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.