AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल; 1 लाखाचे झाले 11 लाख, टाटा केमिकललाही टाकले मागे

शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना काही कंपन्यांच्या शेअरमधून सध्या चांगला नफा मिळत असल्याचे दिसून येत आहे. केमिकल क्षेत्रातील एका कंपनीने गुंतवणूकदारांना तब्बल दहा पट नफा मिळून दिला आहे.

'या' कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल; 1 लाखाचे झाले 11 लाख, टाटा केमिकललाही टाकले मागे
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 1:17 PM
Share

नवी दिल्ली : शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना काही कंपन्यांच्या शेअरमधून सध्या चांगला नफा मिळत असल्याचे दिसून येत आहे. केमिकल क्षेत्रातील एका कंपनीने गुंतवणूकदारांना तब्बल दहा पट नफा मिळून दिला आहे. गुंतवणूकदारांचे एक लाखाची गुंतवणूक अकरा लाखांवर पोहोचली आहे. दीपक नायट्राइट (Deepak Nitrite)असे या कंपनीचे नाव आहे.

तीन वर्षात शेअरमध्ये 984 टक्क्यांची वाढ

दीपक नायट्राइटचे शेअर गेल्या तीन वर्षांमध्ये तब्बल 984 टक्क्यांनी वाढले आहेत. या आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचा शेअर 2,335 रुपयांवर पोहोचला. तीन वर्षांपूर्वी 24 डिसेंबर 2018 रोजी या कंपनीच्या शेअरची किंमत 212.90 रुपये इतकी होती. याचाच अर्थ या कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये तब्बल 984 टक्क्यांची वाढ झाली आहे. याचाच अर्थ 24 डिसेंबर 2018 ला जर एखाद्या व्यक्तीने संबंधित कंपनीमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर त्याचे आज तीन वर्षानंतर 24 डिसेंबर 2021 ला 10.96 लाख रुपये झाले आहेत.

गुंतवणूक वाढली

कंपनीच्या शेअरची किंमत तर वाढीच सोबत कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. सध्या स्थितीमध्ये कंपनीची मार्केट कॅप ही 31,545 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये तब्बल 140 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी देखील मार्केट कॅपमध्ये 144 टक्क्यांची वाढ झाली होती. कंपनी सातत्याने चांगले व्यवसायिक प्रदर्शन करत असल्याने गुंतवणूकदार देखील मोठ्या प्रमाणात या कंपनीकडे वळले असून, या कंपनीमधील गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्याच्या बाबतीत या कंपनीने टाटा केमिकलला देखील मागे टाकले आहे.

संबंधित बातम्या

लहान मुलांसाठी आधार कार्ड का आहे महत्त्वाचे?, कितव्या वर्षी होते अपडेट जाणून घ्या

PF Withdrawal: पीएफ कधी काढता येतो?; जाणून घ्या पीएफबाबतच्या महत्त्वाच्या अटी

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छिता; तर लक्षात ठेवा ‘या’ चार गोष्टी

मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.