दिवाळीत खरेदी करताना क्रेडीट स्कोअरकडेही लक्ष द्या, या ऑफर्समुळे बिघडू शकतो स्कोअर
वेगवेगळ्या दुकाने आणि शोरूममध्ये अनेक प्रकारच्या ऑफर्स आणि सवलती सुरू आहेत. यासोबतच क्रेडिट कार्डवर अनेक ऑफर्स आहेत, परंतु या ऑफरमुळे तुम्हाला शॉपिंग करताना काही गोष्टींची काळजी घ्यावीच लागेल. जाणून घेऊया.

तुम्ही दिवाळीत खरेदी करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, दिवाळीत तुम्ही खरेदी कराल आणि तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. आम्हाला कल्पना आहे की, दिवाळीमुळे वेगवेगळ्या ऑफर्स मिळत आहे, सूट देखील आहे. पण, यासाठी नेमकी कोणती काळजी घ्यायची, याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.
सणासुदीच्या काळाची चमक आता चारही बाजूला दिसू लागली आहे. लोकांची घरे सजवली जात आहेत आणि खरेदीमुळे बाजारातही गर्दी दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत दिवाळीचा सणही येणार आहे. अशा परिस्थितीत लोक सध्या प्रचंड खरेदी करत आहेत.
वेगवेगळ्या दुकाने आणि शोरूममध्ये अनेक प्रकारच्या ऑफर्स आणि सवलती सुरू आहेत. यासोबतच क्रेडिट कार्डवरही अनेक ऑफर्स येत आहेत, ज्यामुळे लोकांना खूप फायदे मिळत आहेत, परंतु या ऑफर्समुळे तुम्हाला खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.
या ऑफर्स आणि डिस्काउंट्समुळे अनेक लोक फेस्टिव्ह सीझनमध्ये आपला क्रेडिट स्कोअर खराब करतात. अशा परिस्थितीत हे टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. चला जाणून घेऊया.
आपल्या बजेटमध्ये खरेदी करा
सणासुदीच्या काळात दुकानदारांकडून अनेक प्रकारच्या ऑफर्स आणि डिस्काऊंट चालवल्या जातात, ज्या लोकांना खूप आवडतात. अशा परिस्थितीत, लोक प्रचंड खरेदी करतात आणि काही लोक ऑफरमुळे त्यांची गरज नसलेल्या वस्तू देखील खरेदी करतात. दुकानदारांकडून दिल्या जाणाऱ्या ऑफरसोबतच क्रेडिट कार्डवरून ऑफर्स देखील येत आहेत, ज्या ग्राहकांना आकर्षित करतात. अशा परिस्थितीत, अनेकदा लोक क्रेडिट कार्डची मर्यादा पूर्णपणे काढून टाकतात, ज्याचा परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो..
क्रेडिट कार्डचा जास्त वापर करू नका
सणासुदीच्या काळात लोक क्रेडिट कार्डच्या मदतीने खूप खरेदी करतात, त्यानंतर क्रेडिट कार्डचे जाडजूड बिल लोकांचे बजेट डळमळीत करते. परिणामी, लोक महिन्याच्या शेवटी क्रेडिट कार्डचे बिल भरू शकत नाहीत, ज्याचा थेट परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो. यासोबतच स्वतंत्र शुल्कही भरावे लागते.
सणासुदीच्या काळात पर्सनल लोन घेणे
काही लोक सणासुदीच्या हंगामापूर्वीच आपल्या गरजा भागविण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेतात. लोक घाईघाईत हे कर्ज घेतात आणि ईएमआय भरण्याचा विचार करत नाहीत. तसेच ते ईएमआयनुसार आपले बजेट तयार करत नाहीत. परिणामी, ते ईएमआय भरण्यास असमर्थ आहेत, ज्याचा क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो.
