अल्पवयीन मुलांना उत्पन्नावर टॅक्स भरावा लागतो का? काय आहेत नियम जाणून घ्या

अल्पवयीन मुलांना उत्पन्नावर टॅक्स भरावा लागतो का? काय आहेत नियम जाणून घ्या
अल्पवयीन मुलाच्या उत्पन्नावर कर लागतो का?

मुलांच्या भविष्यासाठी आई - वडील गुंतवणूक करतात. आजी आजोबांकडून भेट म्हणून पैसे दिले जातात. आई वडील या पैशांची गुंतवणूक करतात. मुलांच्या नावे बँक खाते उघडतात. या पैशांवर मिळालेल्या परताव्यावर मुलांनादेखील इनकम टॅक्स भरावा लागतो. अल्पवयीन मुलांच्या बाबतीत टॅक्सचे नियम जाणून घेऊयात.

अजय देशपांडे

|

Mar 29, 2022 | 5:30 AM

18 वर्षापर्यंतची मुलं अल्पवयीन (Minor) वयोगटात मोडतात. पण कुठल्याही प्रकारचे उत्पन्न असल्यास इनकम टॅक्स (Income tax) भरावा लागतो. बचत खाते (Savings account), एफडी किंवा त्याच्या नावावर केलेल्या इतर कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीवर इनकम टॅक्स लागतोच. लहान मुलांचे पालक अनेकदा त्यांच्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी किंवा त्यांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करतात. आजी-आजोबाही आपल्या नातवंडांसाठी गुंतवणूक करतात. बऱ्याचदा मुलं त्यांच्या कलागुणांमधून पैसे कमावतात, उदाहरणार्थ स्पर्धेतील बक्षिसाची रक्क्म किंवा रिअॅलिटी शोमधील कमाईवर देखील कर आकारला जातो. मुलं वयात येईपर्यंत, त्याची कमाई पालकांच्या उत्पन्नात जोडली जाते आणि पालकांना कर भरावा लागतो. आयकराच्या कलम 64 (1A) अंतर्गत पालकांना त्यावर कर भरावा लागेल. जर आई-वडील दोघेही कमावणारे असतील तर मुलांचे उत्पन्न ज्या पालकांचे उत्पन्न जास्त असेल त्यांच्यासोबत एकत्रित केले जाते. पालकांचा घटस्फोट झाला असेल, तर मुलाचा ताबा ज्या पालकांकडे आहे त्यांच्या उत्पन्नात आयकर जोडला जातो. आई-वडील हयात नसल्यास मुलाच्या नावावर आयकर वेगळा भरावा लागतो.

…तर भरावा लागतो कर

मुलाच्या नावावर केलेल्या गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न दीड हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास त्यावर पालकांना कर द्यावा लागत नाही. गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न दीड हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास पालकांना कर भरावा लागतो. तेव्हा पालक प्रत्येक मुलाच्या नावावर केलेल्या गुंतवणुकीवर दीडहजार रुपयांच्या कपातीचा दावा करू शकतात. मुलांचे उत्पन्न पालकांच्या उत्पन्नाशी जोडले जात नाहीत याला तीन अपवाद आहेत एक मुलाने स्पर्धा जिंकणं किंवा टीव्ही शोमध्ये काम करणं किंवा इतर कोणत्याही मार्गाने त्याच्या प्रतिभेच्या आधारे पैसे कमावले तर मुलाला वेगळा आयकर भरावा लागतो. दोन अनाथ मुलाच्या बाबतीत, त्याचे उत्पन्न कोणाशीही जोडले जात नाही. अशा परिस्थितीत मुलाचा कर देखील स्वतंत्रपणे भरला जातो. जर मुलं दिव्यांग असेल आणि आयकर कलम 80U अंतर्गत सूचीबद्ध केल्यानुसार ते मुल अंध, कर्णबधीर, किंवा कोणताही मानसिक आजार असलेलं असेल तर त्याचे उत्पन्न पालकांच्या उत्पन्नात जोडले जात नाही.

उत्पन्नाचे साधन असेल तर कर भरावाच लागतो

अल्पवयीन मुलांचे पॅन कार्ड बनवून त्याच्या नावाने इनकम टॅक्स रिटर्न भरला जातो. मूल 18 वर्षांचे झाल्यावर, म्हणजेच प्रौढ झाल्यावर त्याला प्रौढ श्रेणीचे नवीन पॅनकार्ड घ्यावे लागते. अल्पवयीन पॅनकार्डवर फोटो नसतो. कारण मुलांचे चेहरे बदलतात. त्यामुळे प्रौढ झाल्यावर नवीन पॅनकार्ड बनवणं बंधनकारक आहे. कमावणाऱ्याच्या वयाने काही फरक पडत नाही. जर कमवत असाल तर त्यावर टॅक्स ही द्यावा लागेल. अल्पवयीन मुलांनी कमावलेली कमाई करपात्र असेल तर निश्चितपणे आयकर विवरणपत्र भरावे.

संबंधित बातम्या

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या श्रीलंकेला भारताकडून मदतीचा हात, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा श्रीलंका दौरा

Petrol Diesel Rates in Maharashtra : 7 दिवसात 6 वेळा इंधन दरवाढीचा शॉक, महाराष्ट्रातील 10 प्रमुख शहरांतील दर एका क्लिक वर

एफएमसीजी कंपन्यांना युद्धाचा फटका; महागाई उच्चस्थरावर, विक्रीचे प्रमाण घटले

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें