मोबाईल डेटा क्षेत्रातील जिओच्या मक्तेदारीला शह बसणार? जगातील ‘हा’ बडा उद्योजक ग्रामीण भागात इंटरनेटचे जाळे विस्तारणार

Interne Data | कंपनी ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी ग्रामीण भागात काम करण्यास तयार आहे. भार्गव पुढे म्हणाले की, डिसेंबर 2022 पर्यंत भारतात दोन लाख टर्मिनल उपलब्ध करण्याचे त्यांचे ध्येय आहे. मात्र, त्यासाठी प्रथम केंद्र सरकारची मंजूरी मिळणे आवश्यक आहे.

मोबाईल डेटा क्षेत्रातील जिओच्या मक्तेदारीला शह बसणार? जगातील 'हा' बडा उद्योजक ग्रामीण भागात इंटरनेटचे जाळे विस्तारणार
इंटरनेट

नवी दिल्ली: जगप्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांनी आगामी काळात भारतातील ग्रामीण क्षेत्रात इंटरनेटचे जाळे विस्तारण्याचा मानस व्यक्त केला आहे. एलन मस्क यांच्या SpaceX ची उपकंपनी असलेल्या स्टारलिंकच्या माध्यमातून भारतातील ग्रामीण क्षेत्रात ब्रॉडबँड इंटरनेट सेवा सुरु केली जाईल. डिसेंबर 2022 पासून या कामाला सुरुवात होईल. त्यामुळे आगामी काळात SpaceX कंपनीकडून इंटरनेट क्षेत्रातील जिओ कंपनीच्या मक्तेदारीला शह बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

डिसेंबर 2022 पर्यंत दोन लाख टर्मिनल्सची उभारणी

स्टारलिंकचे भारताचे संचालक संजय भार्गव यांनी म्हटले आहे की, कार्यालयात पहिल्या दिवशी कंपनीला भारतात आधीच 5000 प्री-ऑर्डर मिळाल्या आहेत. कंपनी ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी ग्रामीण भागात काम करण्यास तयार आहे. भार्गव पुढे म्हणाले की, डिसेंबर 2022 पर्यंत भारतात दोन लाख टर्मिनल उपलब्ध करण्याचे त्यांचे ध्येय आहे. मात्र, त्यासाठी प्रथम केंद्र सरकारची मंजूरी मिळणे आवश्यक आहे.

स्टारलिंक ग्राहकांना प्राधान्य यादीचा भाग होण्यासाठी $ 99 किंवा 7,350 रुपयांची ठेव घेत आहे. एकदा सेवा सक्रिय झाल्यावर प्री-ऑर्डर डिपॉझिट मासिक शुल्काशी जुळवून घेतले जाईल. हे पैसे संबंधित कंपन्यांना परतही मिळू शकतात. स्टारलिंक कंपनीचा दावा आहे की ते बीटा स्टेजमध्ये 50 ते 150 मेगाबाइटच्या रेंजमध्ये डेटा स्पीड देतील. ब्रॉडबँड विभागात रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि भारती ग्रुपच्या वनवेब या कंपन्यांशी स्टारलिंकला सामना करावा लागेल.

केंद्र सरकार मंजुरी देणार?

गोव्यातील एका दुर्गम भागाने स्टारलिंक कंपनीने नेटवर्क उभारण्यासाठी परवानगीची मागणी केली आहे. अन्य भागांमध्ये 100 टक्के मागणी असल्यास स्टारलिंककडून त्याठिकाणी सेवा पुरवली जाईल. यापैकी बहुतांश इंटरनेट नेटवर्क स्थानिक प्रदात्यांच्या माध्यमातून पुरवले जाईल. परंतु ज्या भागात सेवा पुरवणे कठीण आहे तेथे स्टारलिंक सारखे सेटकॉम प्रदाते पुढाकार घेतील.

आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहे जेव्हा भारतातील ग्रामीण भाग स्वतःला १००% ब्रॉडबँड असल्याचे जाहीर करेल. स्टारलिंक आणि इतर ब्रॉडबँड प्रदात्यांसह काम करू इच्छिणारे राजकारणी आणि नोकरशहा माझ्याशी संपर्क साधू शकतात, असे संजय भार्गव यांनी सांगितले.

प्री-ऑर्डर नोटमध्ये स्टारलिंकने म्हटले आहे की त्याची सेवा अनेक देशांमध्ये उपलब्ध आहे. भारताकडून मोठ्या प्रमाणात प्री-ऑर्डर मिळाल्यास त्याला सरकारी मान्यता मिळवणे सोपे होईल.

संबंधित बातम्या:

मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारताचा नंबर पाकिस्तान, श्रीलंका आणि नेपाळच्याही मागे

Special Report | कोण पुरतंय सर्वात फास्ट इंटरनेट, ट्रायची नवी आकडेवारी जाहीर

मोबाईलमधल्या स्लो इंटरनेटमुळे वैतागलाय? मग ‘हे’ उपाय करुन पाहाच!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI