सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या या आठवड्यातील भाव

सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या या आठवड्यातील भाव
gold rates

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावामध्ये अस्थिरता जाणवत आहे. या आठवड्यामध्ये मौल्यवान धातुंचे दर घसरल्याचे दिसून आले. 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे 59 रुपयांनी, तर चांदीचे दर प्रति किलो 837 रुपयांनी कमी झाले आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Dec 11, 2021 | 12:56 PM

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावामध्ये अस्थिरता जाणवत आहे. या आठवड्यामध्ये मौल्यवान धातुंचे दर घसरल्याचे दिसून आले. 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे 59 रुपयांनी, तर चांदीचे दर प्रति किलो 837 रुपयांनी कमी झाले आहेत. या आठवड्यात सोन्याचे दर प्रति तोळा 48 हजारांच्या आसपास राहिले, तर चांदीचा भाव प्रति किलो 61 हजारांवर पोहोचला.

मौल्यवान धातुंच्या किमतीमध्ये घट 

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशने दिलेल्या माहितीनुसार आठड्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर प्रति तोळा 47875 रुपये एवढे होते. त्यानंतर दरामध्ये घसरण होऊन, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सोन्याचे भाव प्रति तोळा 47816 रुपयांवर पोहोचले. सोन्याची किंमत आठवडाभरता 59 रुपयांनी कमी झाली आहे. तर दुसरीकडे आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी चांदीचे दर प्रति किलो 61 हजार रुपये होते. शुक्रवारपर्यंत त्यामध्ये 837 रुपयांची घसरण झाली आहे. शुक्रवारी सकाळच्या तुलनेमध्ये संध्याकाळी सोन्याच्या दरामध्ये आणखी घसरण झाली. शुक्रवारी सकाळी सोन्याचा दर 47836 रुपये इतका होता, त्यामध्ये घट होऊन संध्याकाळी तो 47816 वर पोहोचला. मात्र दुसरीकडे शुक्रवारी संध्याकाळी चांदीच्या दरात थोडी तेजी पहायला मिळाली. शुक्रवारी सकाळी चांदीचे दर 60094 रुपये प्रति किलो होते. सध्यांकाळी भावामध्ये वाढ होऊन ते प्रति किलो 60155 वर पोहोचले आहेत. दरम्यान पुढील आठवड्यात सोन्या-चांदीचे भाव आणखी कमी होऊ शकतात असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

सोन्यामधील गुंतवणुकीला फटका

गेल्या वर्षभरापासून सोन्याचे दर सातत्याने अस्थिर असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर सर्वोच्च स्थरावर म्हणजे प्रति तोळा 56 हजार इतके झाले होते. मात्र त्यानंतर त्यात सातत्याने घसरण होत गेली. या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात तर सोन्याचे दर 45 हजारांपर्यंत खाली आले होते. मात्र त्यानंतर पुढील दोन महिन्यांत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये त्यात सरासरी अडीच ते तीन हजारांची वाढ होऊन ते 47 हजारांपर्यंत पोहोचले आहे. सोन्याचे भाव सातत्याने कमी जास्त होत असल्याने गुंतवणूकदार जोखमी घेण्याच्या तयारीत नसल्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी होत आहे. गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी सोन्यापेक्षा इतर मार्गाचा शोध घेत आहेत.

संबंधित बातम्या 

कर्ज वसुलीसाठी बँकांची कठोर पाऊले, थकबाकीदार कंपन्यांचा दिवाळखोरीच्या प्रक्रियेमध्ये समावेश

आयकर रिटन भरणाऱ्यांच्या संख्येत घट; …या कारणांमुळे घटली करदात्यांची संख्या

तुम्ही डेबिट कार्ड वापरता?; मग घ्या ‘ही’ काळजी, अन्यथा होऊ शकते फसवणूक

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें