गुंतवणुकीवर चांगला परतावा हवाय? मग पोस्टाच्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवा; दहा वर्षात पैसे दुप्पट

तुम्ही जर गुंतवणुकीसंदर्भात विचार करत असाल तर पोस्ट ऑफीसच्या योजना (Post Office Scheme) तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. असे म्हणतात की पैशांची बचत (Save money) ही काळाजी गरज असते. मात्र केवळ पैशांची बचत करूनच भागत नाही, तर ते योग्य ठिकाणी गुंतवावे देखील लागतात. तुम्ही पैसे कोणत्या योजनेत गुंतवले आहेत? त्यावरून तुम्हाला भविष्यात त्याचा परतावा किती मिळणार आहे हे ठरते.

गुंतवणुकीवर चांगला परतावा हवाय? मग पोस्टाच्या 'या' योजनेत पैसे गुंतवा; दहा वर्षात पैसे दुप्पट
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 9:01 AM

तुम्ही जर गुंतवणुकीसंदर्भात विचार करत असाल तर पोस्ट ऑफीसच्या योजना (Post Office Scheme) तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. असे म्हणतात की पैशांची बचत (Save money) ही काळाजी गरज असते. मात्र केवळ पैशांची बचत करूनच भागत नाही, तर ते योग्य ठिकाणी गुंतवावे देखील लागतात. तुम्ही पैसे कोणत्या योजनेत गुंतवले आहेत? त्यावरून तुम्हाला भविष्यात त्याचा परतावा किती मिळणार आहे हे ठरत असते. आयुष्याचा एका टप्प्यावर जर तुमच्या हातात मोठी रक्कम असेल तर तुमचे भविष्य अधिक सुरक्षित होते. पोस्ट ऑफीस आपल्या ग्राहकांसाठी अनेक चांगल्या योजना घेऊन आले आहेत. ज्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता. आज आपन पोस्ट ऑफीसच्या अशाच एका योजनेची माहिती घेणार आहोत. ही योजना म्हणजे बचत योजना (Saving Schemes)होय. या योजनेत तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला एक चांगला परतावा मिळू शकतो. सोबतच जर एखादी बँक दिवाळखोरीत निघाली किंवा इतर कारणांमुळे बंद झाली तर तुम्हाला केवळ पाच लाखांपर्यंतच रक्कम परत मिळू शकते. मात्र पोस्टाच्या योजनेचे तसे नसते तुम्हाला तुमची संपूर्ण रक्कम परत मिळते. तर जाणून घेऊयात पोस्ट ऑफीसच्या बचत योजनेबाबत

व्याज दर

पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेवर वार्षिक आधारावर 6.9 टक्के व्याज दिले जाते. हे व्याज दर एका ठराविक कालावधीनंतर कमी – जास्त होत असतात. मात्र एक एप्रिल 2020 पासून बचत योजनेमध्ये गुंतवलेल्या रकमेववर 6.9 टक्के व्याज देण्यात येत आहे. हे व्याज तीन महिने, सहा महिने किंवा वर्षाला तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाते. तुम्ही जर पोस्टाच्या बचत खात्यामध्ये गुंतवणूक केली तर ही रक्कम 124 महिने म्हणजे दहा वर्ष चार महिन्यात दुपट्ट होते. पोस्टाच्या या योजनेमध्ये किती पैसे गुतवावेत याला काही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही, तुम्ही एक हजारापासून पुढे कितीही रक्कम पोस्टाच्या बचत खात्यामध्ये गुंतवू शकता.

खाते कोणाला सुरू करता येते?

पोस्टच्या या योजनेचा लाभ कुठल्याही प्रौढ भारतीय नागरिकाला घेता येतो. दोन किंवा तीन व्यक्ती मिळून जॉईंट खाते देखील ओपन करू शकता. जर एखाद्या अल्पवयीन बालकाला पोस्टच्या या योजनेसाठी खाते ओपन करायचे असेल तर तो आपल्या पालकांच्या संमतीने खाते ओपन करू शकतो. तुमच्या खात्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला व्याजासह या रकमेचा परतावा मिळतो. त्यानंतर तुम्ही अन्य एखाद्या ठिकाणी ही रक्कम गुंतवू शकता.

संबंधित बातम्या

आणखी तीन बँकांना आरबीआयकडून दंड; चेक करा यामध्ये तुमची बँक तर नाहीना?

पर्सनल लोन हवं आहे चिंता करू नका; ‘या’ बँका देतायेत सर्वात स्वस्त लोन ते देखील अगदी कमी प्रोसेसिंग फीमध्ये

वैयक्तिक लोन: नव्या वर्षात नवे व्याजदर, प्रक्रिया शुल्क ते EMI- एका क्लिकवर

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.