foreign portfolio investment : परदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे का काढतायेत?, जाणून घ्या कारण

युक्रेन-रशिया युद्धामुळे शेअर बाजारावर परिणाम झाल्याचं आपण सुरुवातीला पाहिलंय. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून पैस देखील काढले. युद्धाचा परिणाम आयात-निर्णात आणि भांडवलावर होतोच. कच्चे तेल, चलन वाढ यासारख्या गोष्टी देखील अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम करतात. यंदाही तसाच परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचं दिसतंय.

foreign portfolio investment  : परदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे का काढतायेत?, जाणून घ्या कारण
भारतीय चलनImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 2:59 PM

मुंबई : युक्रेन-रशिया युद्धामुळे (Ukraine Russia War) शेअर बाजारावर परिणाम झाल्याचं आपण सुरुवातीला पाहिलंय. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी (Investers) शेअर बाजारातून पैस देखील काढले आहेत. युद्धाचा परिणाम आयात-निर्यात आणि भांडवलावर होतोच. कच्चे तेल, चलन वाढ यासारख्या गोष्टी देखील अर्थव्यवस्थेवर (economic) मोठा परिणाम करतात. यंदाही तसाच परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचं दिसतंय. रशिया-युक्रेन युद्ध आणि त्यावरुन उद्भवणारी परिस्थिती पाहता परदेशी गुंतवणूकदार आपले पैसे काढून घेतायेत. यामुळे याचा शेअर बाजारावर मोठा परिणाम दिसून येतोय. डिपॉझिटरी डेटानुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी (FPI) गेल्या महिन्यात शेअर बाजारातून 41 हजार 123 कोटी रुपये काढले आहेत. यापूर्वी त्यांनी फेब्रुवारीमध्ये शेअर बाजारातून 35 हजार 592 कोटी रुपये आणि जानेवारीत 33 हजार 303 कोटी रुपये काढले होते. आता या मोठ्या प्रमाणात काढल्या जाणाऱ्या रक्कमेमुळे याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होण्याची चिन्ह आहे. त्यामुळे अर्थतज्ज्ञ याविषयी चिंता व्यक्त करतायेत.

मोठी रक्कम काढली

परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात शेअर बाजारातून 41 हजार 123 कोटी रुपये काढले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून विदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारामधून पैसे काढत आहेत. ऑक्टोबर 2021 ते मार्च 2022 या कालावधीत त्यांनी भारतीय शेअर बाजारातून निव्वळ 1.48 लाख कोटी रुपये काढले असल्याची माहिती आहे. यामुळे याचा बाजाराला मोठा फटका बसल्याचं बोललं जातंय. परदेशी गुंतवणूकदारांमुळे इतका मोठा फटका बसत असल्याने अर्थतज्ज्ञ देखील चिंता व्यक्त करतायेत.

तज्ज्ञांचे काय मत?

परदेशी गुंतवणूकदारांनी काढलेल्या रक्कमेवर बोलताना UpsideAI चे सह-संस्थापक अतनू अग्रवाल म्हणाले की, ‘FPI काढण्याचे मुख्य कारण म्हणजे व्याजदरातील बदल आणि फेडरल रिझर्व्ह बँकेने प्रोत्साहन संपवण्याचे संकेत दिले, हे आहेत. इतरही अनेक कारणे आहेत. ज्यामुळे FPIs भारतीय बाजारातून माघार घेत आहेत. यामध्ये भारतीय बाजार महाग होणे, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, रुपयाची कमजोरी आणि रशिया-युक्रेन संघर्ष या कारणांचा समावेश आहे. त्यामुळेच परदेशी गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूकदार पर्यायांकडे वळत आहेत. फेडरल रिझव्‍‌र्हकडून व्याजदर वाढ पुढे ढकलण्याचे संकेत मिळाले असते, तर कदाचित हा प्रकार झाला नसता.’

अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार?

डिपॉझिटरी डेटानुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी (FPI) गेल्या महिन्यात शेअर बाजारातून 41 हजार 123 कोटी रुपये काढले आहेत. यापूर्वी त्यांनी फेब्रुवारीमध्ये शेअर बाजारातून 35 हजार 592 कोटी रुपये आणि जानेवारीत 33 हजार 303 कोटी रुपये काढले होते. आता या मोठ्या प्रमाणात काढल्या जाणाऱ्या रक्कमेमुळे याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे अर्थज्ज्ञ याविषयी चिंता व्यक्त करतायेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

इतर बातम्या

VIDEO : बुडत्या जहाजाच कॅप्टनशीप कोण घेणार? – Chandrakant Patil

Ramzan 2022 : सेहरी आणि इफ्तारच्या वेळी आहारात या गोष्टींचा समावेश करा, दिवसभर ऊर्जा राहील!

Ginger For Dandruff : आल्याच्या वापराने कोंड्याच्या समस्येपासून सुटका करा, फक्त हे तीन उपाय आणि कोंडा गायब…

Non Stop LIVE Update
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.