व्यावसायिकांच्या विरोधानंतर केंद्र सरकारने तो निर्णय घेतला मागे, जाणून घ्या नक्की घडलं?

Hotel bills | तुर्तास हॉटेल आणि रेस्टॉरंटसमधील बिलांवर परवाना क्रमांक लिहिण्याची गरज नाही. या निर्णयामुळे बऱ्याच समस्या निर्माण होतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. व्यापारी संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) नेही याला आपला विरोध व्यक्त केला होता. त्यामुळे FSSAI ने आपला निर्णय पुढे ढकलला आहे.

व्यावसायिकांच्या विरोधानंतर केंद्र सरकारने तो निर्णय घेतला मागे, जाणून घ्या नक्की घडलं?
हॉटेल्स

नवी दिल्ली: फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (FSSAI) ने 1 ऑक्टोबरपासून अन्न विक्रेत्यांना त्यांच्याकडून जारी केलेल्या सर्व पावत्यावर परवाना क्रमांक लिहिणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, व्यावसायिकांच्या विरोधामुळे या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.

त्यामुळे तुर्तास हॉटेल आणि रेस्टॉरंटसमधील बिलांवर परवाना क्रमांक लिहिण्याची गरज नाही. या निर्णयामुळे बऱ्याच समस्या निर्माण होतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. व्यापारी संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) नेही याला आपला विरोध व्यक्त केला होता. त्यामुळे FSSAI ने आपला निर्णय पुढे ढकलला आहे.

नक्की काय होता निर्णय?

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या सर्व दुकानदारांना 1 ऑक्टोबरपर्यंत आपली नोंदणी करण्याचे निर्देश दिले होते. बिलावर FSSAI नोंदणी क्रमांक नमूद न करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. अन्न सुरक्षा अधिकाऱ्याला हवे असल्यास, तो दुकान बंद करू शकतो आणि त्याच्या मालकावर कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करू शकतो. यामध्ये तुरुंगवासाच्या शिक्षेचीही तरतूद नव्या नियमात होती.

या आदेशानुसार, रेस्टॉरंट्स आणि मिठाईच्या दुकानांसह इतर खाण्या -पिण्याच्या दुकानांना प्रथम एफएसएसएआयसाठी नोंदणी करावी लागेल. त्यानंतर दुकानाच्या बाहेर एक डिस्प्ले बोर्ड लावावा लागेल. ज्यामध्ये खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मालाची माहिती द्यावी लागेल. जर तूप वापरले जात असेल, तर कोणते तूप आहे, तेल आणि इतर वस्तूंची माहिती देखील प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले होते.

सध्या पॅकेज केलेल्या फूड लेबलवर FSSAI नंबर लिहिणे किंवा प्रदर्शित करणे अनिवार्य आहे, परंतु ही समस्या विशेषतः रेस्टॉरंट्स, मिठाईची दुकाने, केटरर्स, अगदी किरकोळ स्टोअरसारख्या आस्थापनांच्या बाबतीत येते. कोणत्याही फूड बिझनेस ऑपरेटरचा 14 अंकी FSSAI क्रमांक सहज दिसत नाही किंवा बिलावर उपलब्ध नाही. यामुळे, ग्राहकांना तक्रार करणे कठीण होते. म्हणूनच हे पाऊल उचलण्यात आले होते.

ग्राहकांना तक्रार करण्याची सोय

प्रस्तावित नियमानुसार जर तुम्हाला देखील कोणत्याही रेस्टॉरंट किंवा खाद्यपदार्थांच्या दुकानांबद्दल तक्रार करायची असेल तर तुम्ही FSSAI च्या पोर्टलला भेट देऊन करू शकता. तुम्ही onlinelegalindia.com/services/consumer-complaint/ ला भेट देऊन तुमची तक्रार नोंदवू शकता. येथे तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल नंबर, मेल आयडी, राज्य आणि झालेल्या नुकसानीचा तपशील नमूद करावा लागेल. मात्र, आता यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.

संबंधित बातम्या:

स्वस्त हॉटेल्स पुरवणारे Oyo Hotels आता देणार गुंतवणुकीची संधी, 1 अब्ज डॉलर्सचा IPO आणण्याच्या तयारीत

सिंधुदुर्गही म्हणणार ‘वाह ताज’! ताज हॉटेल्स ग्रुपसोबत ठाकरे सरकारचा करार

हॉटेलमध्ये स्वत: कूक म्हणून काम, स्वत:च्या हाताने चवदार जेवण बनवलं, आज जगभरात 450 हॉटेल्स, कोण आहेत विठ्ठल कामत?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI