पोस्टाच्या ‘आरडी’ योजनेतून मिळवा अधिक नफा, ‘अशी’ करा गुंतवणूक

आपल्या कमाईतून काही ठरावीक रकमेची बचत करणे आवश्यक असते. पुढे हाच पैसा आपल्या संकट काळात उपयोगी येतो. अशा अनेक छोट्या बचत योजना आहेत, ज्या माध्यमातून आपण पैशांची बचत करू शकतो. यापैकीच एक असलेल्या पोस्टाच्या आरडी योजनेबद्दल जाणून घेऊयात.

पोस्टाच्या 'आरडी' योजनेतून मिळवा अधिक नफा, 'अशी' करा गुंतवणूक
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 6:15 AM

नवी दिल्ली : तुम्ही तुमच्या दैनंदीन गरजा पूर्ण करण्यासाठी नोकरी किंवा व्यवसाय करता. यामधून मिळणारा पैसा हा तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च होतो. मात्र पैशांची बचत करणे देखील तेवढेच महत्त्वपूर्ण आहे. कारण हाच बचत केलेला पैसा भविष्यातील संकट काळात तुम्हाला उपयोगी येतो. अनेक बचत योजना असतात ज्या माध्यमातून आपन पैशांची बचत करू शकतो. तसेच आपण बचत केलेल्या पैशांवर आपल्याला चांगला परतावा देखील मिळतो. पोस्टाची आरडी योजना ही यापैकीच एक आहे. तुम्ही दर महिन्याला कमीत कमी 100 व जास्तीत जास्त कितीही रुपये या योजनेमध्ये जमा करू शकता. आरडीवर पोस्टाकडून सध्या 5.8 टक्के व्याज देण्यात येते.

कोणाला उघडता येते खाते?

पोस्टाच्या या योजनेमध्ये कोणालाही खाते उघडता येते. ज्याचे वय 18 वर्षांपेक्षा अधिक आहे तो स्व:ता आपले खाते उघडू शकतो. तर ज्याचे वय हे 18 वर्षांपेक्षा कमी आहे अशा व्यक्तीचे खाते त्याच्या आईवडिलांच्या संमतीने उघडता येते. आरडीमध्ये तुम्ही संयुक्त खाते देखील उघडू शकता. या योजनेचे आणखी एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट म्हणजे एक व्यक्ती कितीही आरडी खाते काढू शकते.

गुतंवणूक किती करावी लागते?

या योजनेमध्ये गुंतवणुकीचे असे काही बंधन नाही. तुम्ही दर महिन्याला कमीत कमी 100 रुपयांपासून जास्तीत जास्त कितीही रुपये गुंतवू शकता. तुम्ही जर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात म्हणजेच 1 तारखेपासून 15 तारखेपर्यंत खाते सुरू केले, तर तुम्हाला दर महिन्याच्या 15 तारखेला तुम्ही जमा करत असलेल्या रकमेचा हाप्ता जमा करावा लागतो. आणि समजा तुम्ही जर 15 तारेखेनंतर आरडी ओपन केलेली असेल तर दर महिन्याच्या तीस तारखेरला तुम्हाला हफ्ता जमा करावा लागतो.

मिळणारे लाभ

ही पोस्टाची एक छोटी बचत योजना आहे. अनेक कुटुंब असे असतात की ते मोठ्याप्रमाणात बचत करू शकत नाहीत. मात्र दर महिन्याला 100 ते 1000 रुपये बाजूला काढणे सहज शक्य असते. हेच पैसे पोस्टाच्या आरडीमध्ये गुंतवल्यास तुमची बचत देखील होते आणि पोस्टाकडून तुम्हाला 5.8 टक्क्यांनी व्याज देखील मिळते. आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्ही पोस्टामध्ये जी आरडी काढली आहे, त्याचे सलग 12 हप्ते भरल्यानंतर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून लोन देखील काढता येते.

संबंधित बातम्या 

आयात शुल्क कपातीचा परिणाम, खाद्य तेल झाले स्वस्त; सर्वसामान्यांना दिलासा

नव्या वर्षात महागाईचा भडका उडणार, ‘या’ वस्तूंच्या दरामध्ये 10 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता

Non Stop LIVE Update
ठाकरे गटात मानसिक खच्चीकरण, 'या' महिला नेत्यांची नावं घेत पक्षाला ठोकल
ठाकरे गटात मानसिक खच्चीकरण, 'या' महिला नेत्यांची नावं घेत पक्षाला ठोकल.
झिशान सिद्दीकींनी व्यक्त केली खंत म्हणाले, पक्षाला आमची किंमत नाही...
झिशान सिद्दीकींनी व्यक्त केली खंत म्हणाले, पक्षाला आमची किंमत नाही....
मंत्र्यांना खाली उतरवले, चिमुकल्यांना घडवली शिंदेंनी हेलिकॉप्टरची सफर
मंत्र्यांना खाली उतरवले, चिमुकल्यांना घडवली शिंदेंनी हेलिकॉप्टरची सफर.
फक्त शरद पवारांचे जरांगेंना फोन, आंदोलनाचा खर्चही केला; कुणाचा घणाघात?
फक्त शरद पवारांचे जरांगेंना फोन, आंदोलनाचा खर्चही केला; कुणाचा घणाघात?.
हे मारूतीच शेपूट... जरांगेंच्या पुढच्या आंदोलनावरून भुजबळांचा हल्लाबोल
हे मारूतीच शेपूट... जरांगेंच्या पुढच्या आंदोलनावरून भुजबळांचा हल्लाबोल.
मनोज जरांगे पाटलांचा पलटवार; शिंदेंच्या जवळच्या नेत्याचं घेतलं नाव
मनोज जरांगे पाटलांचा पलटवार; शिंदेंच्या जवळच्या नेत्याचं घेतलं नाव.
पोलीस बनून रुबाबात द्यायला गेला कॉपी, झाला गजाआड; नेमकं प्रकरण काय?
पोलीस बनून रुबाबात द्यायला गेला कॉपी, झाला गजाआड; नेमकं प्रकरण काय?.
मांजरेकरांच्या अनोखी नात्यांच्या गुंतागुंतीची गाठ प्रेक्षकांना भावणार?
मांजरेकरांच्या अनोखी नात्यांच्या गुंतागुंतीची गाठ प्रेक्षकांना भावणार?.
राणांची बायको निवडणुकीपूर्वी त्याला सोडणार? ठाकरे गटातील नेत्याचा दावा
राणांची बायको निवडणुकीपूर्वी त्याला सोडणार? ठाकरे गटातील नेत्याचा दावा.
McDonald'sचा पिझ्झा,बर्गर खाताय? व्हिडीओ बघाच ग्राहकांना बनवताय उल्लू
McDonald'sचा पिझ्झा,बर्गर खाताय? व्हिडीओ बघाच ग्राहकांना बनवताय उल्लू.