Gold price: डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याचा भाव 52 हजारांपर्यंत पोहोचणार?

Gold Price | सध्या सोन्याचा दर हा दोन महिन्यांतील निच्चांकी पातळीवर आहे. मल्टी कमोडिटी एक्सेंजमध्ये सोन्याच्या किंमतीला 46500 रुपयांच्या पातळीवर भक्कम सपोर्ट आहे.

Gold price: डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याचा भाव 52 हजारांपर्यंत पोहोचणार?
गोल्ड एक्स्चेंजमुळे शेअर मार्केटप्रमाणे सोन्याचे व्यवहार होतील. एका गोल्ड रिसीटच्या माध्यमातून खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार पार पडतील. गोल्ड एक्स्चेंजमुळे सोन्याची किंमत आणि गुणवत्ता याची खात्री असेल.
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 10:13 AM

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा दर एका विशिष्ट पातळीत वरखाली होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव असून सोने 47 हजारांच्या खाली आले आहे. मात्र, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या उदयानंतर सोन्याचे भाव (Gold rates) पुन्हा वर जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे जाणकारांकडून सोन्याचा दर आणखी खाली आल्यास खरेदीचा सल्ला दिला जात आहे. (Gold rates in India)

सध्या सोन्याचा दर हा दोन महिन्यांतील निच्चांकी पातळीवर आहे. मल्टी कमोडिटी एक्सेंजमध्ये सोन्याच्या किंमतीला 46500 रुपयांच्या पातळीवर भक्कम सपोर्ट आहे. शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा सोन्याचा प्रतितोळा दर 46,615 इतका होता. त्यामुळे सोन्याचा दर सपोर्ट प्राईसच्या अत्यंत जवळ आहे. या पातळीपर्यं पोहोचल्यानंतर सोन्याच्या किंमती पुन्हा वरच्या दिशेने प्रवास सुरु करतील. अशातच कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे अनिश्चिततेच्या वातावरणात आणखी भर पडली आहे. त्यामुळे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याच्या किंमती 52 हजाराचा टप्पा गाठतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.

देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात

कोरोना संकटकाळात सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पसंती मिळालेल्या सोन्याच्या आयातीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. 2021-22 या आर्थिक वर्षातील एप्रिल- मे महिन्यांच्या तुलनेत गेल्यावर्षीच्या तुलनेत कितीतरी अधिकपट सोन्याची आयात (Gold Import) झाली आहे. या दोन महिन्यांमध्ये देशात तब्बल 7.91 कोटी डॉलर्स इतक्या मूल्याच्या सोन्याची आयात झाली. परिणामी भारतीय अर्थव्यवस्थेच्या चालू खात्यात (current deficit) मोठी तूट नोंदवण्यात आली आहे. चालू खात्यातील तुटीचा आकडा 21.38 अब्ज डॉलर्स इतका आहे.

तर दुसरीकडे यंदा चांदीची झळाळी मात्र कमी होताना दिसत आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल आणि मे महिन्यात 2.76 कोटी डॉलर्स मूल्याची चांदी आयात करण्यात आली. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 93.7 टक्क्यांनी घटले आहे. भारत हा जगात चीननंतर सोन्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. भारतात प्रामुख्याने दागिन्यांसाठी सोन्याचा वापर केला जातो. त्यासाठी दरवर्षी 800 ते 900 टन सोने आयात केले जाते.

भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीला गळती

कोरोना संकटामुळे एकीकडे भारतीय अर्थव्यवस्था रोडावली असताना परकीय चलनाच्या गंगाजळीत मोठी घट झाल्याने देशाला मोठा झटका बसला आहे. सोन्याच्या दरात (Gold Rate) झालेल्या मोठ्या घसरणीमुळे हा परिणाम पाहायला मिळत आहे. 18 जूनला परकीय चलन गंगाजळी 4.148 अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीवरुन 603.933 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली आहे.

परकीय मुद्रा भांडारातील युरो, पाऊंड आणि येनच्या या परकीय चलनांच्या विनिमय दरात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. यापूर्वी 4 जून रोजी Forex Reserves वाढ पाहायला मिळाली होती. कोरोनाच्या संकटकाळातही परकीय गुंतवणुकदारांनी भारतावर विश्वास ठेवला होता. त्यामुळे भारताची परकीय चलनाची गंगाजळी 600 अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचली होती.

(Gold rates in India)

संबंधित बातम्या:

Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका

Gold: एक व्यक्ती किती सोने बाळगू शकते, काय आहे कायदा, जाणून घ्या सर्वकाही

सोन्याच्या भावात मोठी घसरण, भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीला गळती

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.