Gold latest price : सोन्या-चांदीचे भाव वधारले, जाणून घ्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. तरीही सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल कायम आहे. आज (9 जुलै) सोन्याच्या प्रतितोळा किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

Gold latest price : सोन्या-चांदीचे भाव वधारले, जाणून घ्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत
Gold Silver Price
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 10:54 AM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. तरीही सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल कायम आहे. आज (9 जुलै) सोन्याच्या प्रतितोळा किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. शुक्रवारी 22 कॅरेट सोन्याची किरकोळ किंमत ही 10 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे 22 कॅरेट प्रति दहा ग्रॅम सोन्याची किंमत ही 46 हजार 980 इतकी झाली आहे. एकीकडे सोन्याची किंमत वाढत असताना दुसरीकडे चांदीची किंमतही 1 हजार रुपयांनी घसरली आहे. त्या चांदीची किंमत ही प्रतिकिलो 69,000 रुपये झाली आहे. (Gold Sliver Price Rate Today 09 July 2021)

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅमवर 47,990 आणि 100 ग्रॅमवर 4,79,900 वर आहे. जर आपण प्रति 10 ग्रॅम सोन्याचे भाव पाहिले तर 22 कॅरेट सोनं 46,990 वर विकलं जात आहे. जर आपण मोठ्या शहरांतील सोन्याच्या किमतींकडे नजर टाकली तर दिल्लीतील 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,800 आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,850 वर आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे 46,990 आणि 24 कॅरेट सोन्याचे 47,990 वर धाव आहे.

आपल्या शहरातील सोने-चांदीची किंमत काय?

शहर 22 कॅरेट सोन्याचा दर 24 कॅरेट सोन्याचा दर
चेन्न्ई 45,200 49,310
मुंबई 46,990 47,990
नवी दिल्ली 46,800 50,850
कोलकाता 47,200 49,900
बंगळूरु 44,750 48,820
हैदराबाद 44,750 48,820
केरळ 44,750 48,820
पुणे 46,990 47,990
वडोदरा 47,150 49,150
अहमदाबाद 47,150 49,150
जयपूर 46,800 50,850
लखनऊ 46,800 50,850
कोईंबत्तूर 45,200 49,310
मदुराई 45,200 49,310
विजयवाडा 44,750 48,820
पाटणा 46,990 47,990
नागपूर 46,990 47,990
छत्तीसगड 46,800 50,850
सुरत 47,150 49,150
भुवनेश्वर 44,750 48,820
मँगलोर 44,750 48,820
विशाखापट्टणम 44,750 48,820
नाशिक 46,990 47,990
म्हैसूर 44,750 48,820

सोन्याच्या मागणीत वाढ

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन डॉलरमध्ये कमकुवतपणा, किंमती वाढवणे, कोरोनाची तिसरी लाट यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढली आहे.

सोने-चांदी का वाढले?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, न्यूयॉर्कच्या कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याची स्पॉट किंमत आज किरकोळ कमी झाली. मंगळवारी यूएस यील्डमध्ये वाढ झाली. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत कमी होत आहे. त्याचवेळी मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे व्हीपी कमोडिटीज रिसर्च नवनीत दमानी म्हणाले की, व्यापारी आणि गुंतवणूकदार यूएस फेडच्या घोषणेची वाट पाहत आहेत.

(Gold Sliver Price Rate Today 09 July 2021)

संबंधित बातम्या :

विमा कंपनीने तुमचाही क्लेम फेटाळलाय? तक्रार करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

जिथे 40 हजार क्विंटल सोने ठेवले, त्या जागेबद्दल जाणून घ्या, अशी केली जाते सुरक्षा

Gold Price Today: सोन्याच्या किमतींमध्ये आज मोठी घसरण, रेकॉर्ड हायपेक्षा अजूनही 8,750 रुपयांनी स्वस्त

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.