होम लोनचा दर निचांकी पातळीवर, घर खरेदी करण्यासाठी हीच योग्य संधी?

Home loan | कोरोनामुळे गेल्या काही काळात गृहकर्जाच्या व्याजदरात मोठी घट झाली आहे. गृहकर्जावरील व्याजदर सतत कमी होत आहे. एक एक करून सर्व बँका आणि वित्तीय संस्था गृहकर्जावरील व्याजदर कमी करत आहेत.

होम लोनचा दर निचांकी पातळीवर, घर खरेदी करण्यासाठी हीच योग्य संधी?
होम लोन

नवी दिल्ली: घर खरेदी हा अनेकांच्या स्वप्नपूर्तीचा भाग असला तरी त्यानंतर फेडावे लागणारे गृहकर्जाचे हप्ते ही बहुतांश लोकांसाठी एकप्रकारची टांगती तलवार असते. गृहकर्जाचे हप्ते वेळेवर फेडले नाही तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. गृहकर्ज फेडण्यासाठी साधारण 15 ते 20 वर्षांचा अवधी लागतो. त्यामुळे गृहकर्ज घेताना काही गोष्टींचे भान बाळगणे गरजेचे आहे.

कोरोनामुळे गेल्या काही काळात गृहकर्जाच्या व्याजदरात मोठी घट झाली आहे. गृहकर्जावरील व्याजदर सतत कमी होत आहे. एक एक करून सर्व बँका आणि वित्तीय संस्था गृहकर्जावरील व्याजदर कमी करत आहेत. अशा परिस्थितीत मोठा प्रश्न निर्माण होतो की त्याचा फायदा घ्यायचा का? अलीकडेच एचडीएफसी, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कोटक महिंद्रा बँकेने गृहकर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. या बँका 7 टक्क्यांपेक्षा कमी दराने कर्ज देत आहेत.

जाणकारांच्या सल्ल्यानुसार तुम्ही राहण्यासाठी घर विकत घेत असाल तरच त्यासाठी गुंतवणूक करणे योग्य आहे. घरांकडे गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहू नये. कारण हा पर्याय अत्यंत खार्चिक आहे. अडीअडचणीच्या वेळेला तुम्हाला तातडीने पैशांची गरज असेल तेव्हा घर विकून लगेच पैसा उभारणे शक्य नसते. अशावेळी तुम्हाला या गुंतवणुकीचा परतावाही फार चांगला मिळणार नाही. याऐवजी शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील पैसे तुम्ही गरज पडल्यास काढू शकता.

घर खरेदी करून भाड्याने देण्याचा पर्याय कितपत योग्य

नोकरीसाठी दुसऱ्या शहरात राहणाऱ्या लोकांसाठी भाड्याने राहणे हा एक चांगला पर्याय आहे. या परिस्थितीत जर तुम्ही एका शहरात घर खरेदी केले असेल आणि दुसऱ्या शहरात नोकरी मिळवली असेल तर ते भाड्याने देणे हे एक मोठे आव्हान आहे. कोरोना महामारीमुळे घरून काम करण्याची संस्कृती वाढली आहे. अशा परिस्थितीत अनावश्यकपणे मोठी आणि महागडी घरे खरेदी करणे टाळावे.

घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला, तर प्रथम तुम्हाला डाउन पेमेंट करावे लागेल जे तुमचे मोठे पैसे आहेत. यानंतर मुद्रांक शुल्क, दलाली शुल्क, नोंदणी शुल्क, नियमित देखभाल शुल्क, पार्किंग शुल्क, मालमत्ता कर, दुरुस्ती खर्च सुरू होतो. यानंतर, दरमहा एक मोठी रक्कम ईएमआयच्या स्वरूपात जाते. त्यामुळे केवळ गुंतवणूक म्हणून घर खरेदी करताना या सर्व गोष्टींचा विचार करावा.

करातून सूट मिळते?

घर खरेदी हा कर बचतीसाठी उत्तम पर्याय मानला जातो. कलम 80 सी अंतर्गत, मूळ रकमेच्या परतफेडीवर 1.5 लाखांची सूट आहे. याशिवाय, दरवर्षी कलम 24 बी अंतर्गत व्याज देण्यावर 2 लाखांची सूट आहे. तथापि, कलम 80 सी अंतर्गत अनेक प्रकारचे कपात पर्याय उपलब्ध आहेत. शेअर मार्केट लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ईएलएसएस), सार्वजनिक भविष्य निधी, नोकरदार लोकांसाठी भविष्य निर्वाह निधीचा लाभ या विभागांतर्गत उपलब्ध आहेत.

संबंधित बातम्या:

होम लोन घेतलंय, मग ‘या’ तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

जाणून घ्या प्लॉट लोन आणि होम लोनमध्ये काय फरक असतो?

आता घर खरेदी करणं झालं स्वस्त, HDFC नेी गृह कर्जावर व्याजदर केलं कमी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI