स्वस्त व्याजदरावर पर्सनल लोन हवंय, मग ‘हा’ मार्ग निवडा

Personal loan | कमी व्याजदरात कर्ज मिळवण्याचा हमखास मार्ग म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवणे. क्रेडिट स्कोअरवरुन तुम्ही मागील काळात कर्जाची रक्कम कशाप्रकारे भरली, याचा माग काढला जातो.

स्वस्त व्याजदरावर पर्सनल लोन हवंय, मग 'हा' मार्ग निवडा
पर्सनल लोन
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 6:45 AM

मुंबई: प्रत्येकजण आपल्या गरजा आणि खर्च पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेत असतात. पण त्यासाठी तुम्हाला त्याबद्दलची थोडी तरी माहिती असणे गरजेचे आहे. सध्या पसर्नल लोन मिळणे फार कठीण झाले आहे. मात्र पात्र असलेल्या लोकांना सहज कर्ज मिळते. मात्र तुम्ही जर एखादे वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेत असाल तर त्यापूर्वी ते फेडणं तुम्हाला झेपणार आहे का याचा अंदाज घ्या.

कमी व्याजदरात कर्ज मिळवण्याचा हमखास मार्ग म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवणे. क्रेडिट स्कोअरवरुन तुम्ही मागील काळात कर्जाची रक्कम कशाप्रकारे भरली, याचा माग काढला जातो. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर बँका तुम्हाला स्वत:हून कर्जासाठी विचारणा करतात. मात्र, हाच क्रेडिट स्कोअर चांगला नसेल तर तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी अनेक हेलपाटे घालावे लागतील.

चांगल्या बँकेतून कर्ज घ्या

पर्सनल लोन घेताना संबंधित बँक किंवा पतसंस्थेची पूर्ण माहिती घ्या. कोणती बँक किंवा पतसंस्था कमी व्याजदरावर कर्ज देत आहे, हे तपासून पाहा. याशिवाय, काही बँका कर्जावर प्रोसेसिंग फी आकारत नाहीत. त्यामुळे तुमचे पैसे वाचू शकतात. याशिवाय, ऑनलाईन ईएमआय कॅल्क्युलेटरचा वापर करुन तुम्हाला कर्ज घेतल्यानंतर महिन्याला किती हप्ता भरावा लागेल, हेदेखील तपासून पाहा. अनेक बँकामध्ये सणांच्या काळात पर्सनल लोनच्या विशेष ऑफर सुरु असतात. अशाप्रकारच्या संधीचा लाभ घेऊन तुम्ही स्वस्त व्याजदराने पर्सनल लोन मिळवू शकता.

कर्ज घेतेवेळी या गोष्टींची काळजी अवश्य घ्या

वैयक्तिक कर्ज घेताना तुम्हाला किती EMI भरावा लागणार आहे ते आवश्यकरित्या पाहा. तसेच ते EMI विनामूल्य परतफेड करण्याचा पर्याय आहे का? तुम्हाला किती दिवसांत वैयक्तिक कर्ज मिळू शकते? तुम्ही ज्या संस्थेकडून कर्ज घेत आहात ते कसे आहे? ते सोशल मीडियावर अॅक्टीव्ह आहे की नाही? याचीही थोडी माहिती घ्या. तसेच तुम्ही कर्ज घेणारी बँक तुम्हाला ग्राहक म्हणून चांगली सेवा देते की नाही हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे वैयक्तिक कर्ज घेतेवेळी तुमच्या प्रत्येक शंकाचे निराकरण करणे सोपे होईल.

व्याजदरासह इतर माहितीही आवश्यक

जर तुम्ही वैयक्तिक कर्ज घेणार असाल, तर ते तुम्ही कोणत्या बँकेतून घेणार आहात हे निश्चित करा. यानंतर कर्ज घेताना तुम्हाला नेमका किती खर्च येतो, याची माहिती असणे गरजेचे आहे. यासोबतच तुम्हाला कर्जासोबत कोणती सुविधा मिळते याचीही माहिती असणे आवश्यक असते. त्या ठराविक बँकेची ग्राहक सेवाही लक्षात घ्या. वैयक्तिक कर्ज घेतेवेळी केवळ व्याज दरच नव्हे तर आगाऊ भरलेली रक्कम शुल्क आणि मुदतपूर्व बंद शुल्काची देखील माहिती असणे गरजेचे आहे. तसेच वैयक्तिक कर्ज घेण्याशी संबंधित सर्व खर्च जाणून घ्या.

संबंधित बातम्या :

PPF आणि NPS कशात सर्वाधिक फायदा? जाणून घ्या निवृत्तीनंतरची सर्वोत्तम योजना

‘या” शेअरमध्ये गुंतवणूक केल्यानंतर आठवड्यात 50 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा, दर 25 रुपयांपेक्षाही कमी

SBI ग्राहकांसाठी नवी सूचना! अशाप्रकारे करा मोबाईल नंबर अपडेट आणि घरबसल्या अर्ज करून मिळावा ATM कार्ड!

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.