SBI च्या कामचुकार कर्मचाऱ्यांची तक्रार कशी कराल; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SBI employee | SBI बँकेने आपल्या कामुचकार कर्मचाऱ्यांना चाप लावण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर संबंधित कर्मचाऱ्याविरोधात तक्रार करण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे.

SBI च्या कामचुकार कर्मचाऱ्यांची तक्रार कशी कराल; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
एसबीआय बँक

मुंबई: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) शाखांमध्ये अनेकदा योग्यप्रकारे काम सुरु नसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ग्राहक अनेकदा याबाबत तक्रारीही करतात. मात्र, या सगळ्यावर चर्चा आणि थट्टेपलीकडे फारसे काही घडत नाही. (How to file online complaint of SBI employee or branch manager)

मात्र, SBI बँकेने आपल्या कामुचकार कर्मचाऱ्यांना चाप लावण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर संबंधित कर्मचाऱ्याविरोधात तक्रार करण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे आता बँकेचे ग्राहक कोणत्याही कर्मचाऱ्याने योग्य वागणूक किंवा सहकार्य न केल्यास एसबीआयच्या पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतात.

कर्मचाऱ्याची तक्रार कशी कराल?

बँकेच्या कर्मचाऱ्याची तक्रार करण्यासाठी https://cms.onlinesbi.com/CMS याठिकाणी जाऊन तक्रार नोंदवता येईल. संकेतस्थळावर गेल्यानंतर General Banking पर्याय क्लिक करावा, त्यानंतर Branch Related पर्याय निवडावा. त्यामध्ये तुम्ही आपली तक्रार नमूद करु शकता. तसेच 1800 11 2211 (टोल-फ्री), 1800 425 3800 (टोल-फ्री) आणि 080-26599990 या हेल्पपाईनवर फोन करुनही तुम्हाला तक्रार नोंदवता येईल. या हेल्पलाईन्स सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत सुरु असतील.  आता या तक्रारींची बँकेकडून कितपत दखल घेतली जाणार, हेदेखील पाहावे लागेल.

बँकेच्या कामकाजाची नवी वेळ

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा आता सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहतील. नव्या आदेशानुसार बँकेत पुन्हा 50 टक्के कर्मचाऱ्यांना बोलावण्यात येणार आहे. बँकेत येताना ग्राहकांच्या तोंडावर मास्क असणे बंधनकारक आहे. बँकेत पूर्वीप्रमाणे पैसे किंवा चेक जमा करणे, डिमांड ड्राफ्ट, RTGS आणि NEFT संबंधित सर्व कामे केली जातील.

संबंधित बातम्या:

Alert! एसबीआयच्या 44 कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना, नेट बँकिंग इतक्या तासांसाठी बंद

SBI चा ग्राहकांना मोठा दिलासा, घरबसल्या वारसदाराची नोंदणी करण्याची सुविधा सुरु

SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण, लाभ घेण्यासाठी काय करायचं?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI