मृत व्यक्तीचाही आयटीआर भरणे अनिवार्य, जाणून घ्या हे नियम

Income Tax | मृत्यूच्या तारखेपर्यंत त्या व्यक्तीच्या कायदेशीर वारसांच्या वतीने आयटीआर दाखल करणे आवश्यक आहे. यासाठी आधी वारस व्यक्तीने मृत व्यक्तीच्या जागी आयटीआरसाठी नोंदणी करावी.

मृत व्यक्तीचाही आयटीआर भरणे अनिवार्य, जाणून घ्या हे नियम
आयकर परतावा

मुंबई: आयकर परतावा (Income Tax Return) भरणे ही एव्हाना अनेकांसाठी सामान्य बाब झाली आहे. दरवर्षी करपात्र उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना आयकर रिटर्न्स भरण्याचे सोपस्कार पार पाडावे लागतात. मात्र, मृत व्यक्तीही याला अपवाद नसतात. हे ऐकून तुम्हाला थोडा धक्का बसेल. पण एखाद्या व्यक्तीचे करपात्र उत्पन्न असेल आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याचे आयटीआर दाखल करणे आवश्यक आहे. हे काम त्याच्या कायदेशीर वारसदारांनी करणे आवश्यक आहे.

मृत्यूच्या तारखेपर्यंत त्या व्यक्तीच्या कायदेशीर वारसांच्या वतीने आयटीआर दाखल करणे आवश्यक आहे. यासाठी आधी वारस व्यक्तीने मृत व्यक्तीच्या जागी आयटीआरसाठी नोंदणी करावी. अशा परिस्थितीत वडिलांच्या मृत्यूनंतर जर मुलगा किंवा मुलगी मृत व्यक्तीच्या मालमत्तेचा वारसा घेत असेल तर ते वारस म्हणून गणले जातील.

जर एखाद्या वारसांना मृत व्यक्तीचा आयटीआर दाखल करायचा असेल तर त्यांना कायदेशीर वारस म्हणून नोंदणी करावी लागेल. उल्लेखनीय आहे की मृत व्यक्ती आणि कायदेशीर वारस या दोघांचा पॅन आयकर ई-फायलिंग पोर्टलमध्ये नोंदणी करावी. जर मृत व्यक्तीचा पॅन नोंदणीकृत नसेल तर कायदेशीर वारस मृत व्यक्तीच्या वतीने नोंदवू शकतात.

वारसदार म्हणून नोंदणी करावी

कायदेशीर वारस म्हणून नोंदणी करण्यासाठी चार स्टेप्स आहेत. सर्व प्रथम ‘e-Filing’ पोर्टलवर जा. यानंतर ‘My Account’ मेनूमधील ‘Register as Representative’ या पर्यायावर क्लिक करून पुढे जा. मग ‘Request Type’ मधील ‘New Request’ आणि ‘Category to Register’ मधील ‘Deceased (Legal Heir)’ वर क्लिक करा. यानंतर, आवश्यक माहिती भरून ई-फाइलिंगची प्रक्रिया पूर्ण करा.

कोणत्या कागदपत्रांची गरज

* मृत्यूचा दाखला
* मृत व्यक्तीचे पॅनकार्ड
* वारसदाराच्या पॅनकार्डची साक्षांकित प्रत
* वारसदार असल्याचे प्रमाणपत्र
ही कागदपत्रे सबमिट केल्यानंतर कर विभागाकडून तुम्हाला एक ट्रान्झेक्शन आयडी मिळेल. एकदा तुमची विनंती मंजूर झाल्यावर तुम्हाला कायदेशीर वारसाच दर्जा दिला जाईल.

मृत व्यक्तीचा ITR कसा फाईल कराल?

* आयकर साइटवरून मृत व्यक्तीसाठी जारी केलेला आयटीआर फॉर्म डाउनलोड करा. ते भरा आणि XML फाईलमध्ये रूपांतरित करा
* आता प्राप्तिकर वेबसाइट https://incometaxindiaefiling.gov.in वर जा
* कायदेशीर वारस म्हणून तुमची सर्व माहिती इथे टाका
* ई-फाइलवर जा आणि रिटर्न अपलोड करा
* जिथे पॅनचा उल्लेख आहे, मृत व्यक्तीचे पॅन लिहा आणि एक्सएमएस फाइल निवडा
* ITR फॉर्मचे नाव ITR 1, 2, 3 किंवा मृत व्यक्ती पात्र म्हणून भरा
* आता मूल्यांकन वर्ष भरा
* ही xml फाइल पोर्टलवर अपलोड करा
* कायदेशीर वारस मृत व्यक्तीच्या आयटीआरवर डिजिटल स्वाक्षरी करू शकतो. यासाठी वारसाने त्याचे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र वापरावे. यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे.

इतर बातम्या:

नोकरीची चिंता सोडा, ‘हा’ व्यवसाय सुरु करा, सरकारकडून 35 ते 90 टक्के अनुदान, महिन्याला दोन लाखांची कमाई

मोदी सरकारच्या e-Shram पोर्टलला मोठा प्रतिसाद, अवघ्या दोन महिन्यांत 3 कोटी कामगारांची नोंदणी

Indian Railways: मालवाहतुकीतून रेल्वेने कमावला बक्कळ पैसा, सप्टेंबरमध्ये 10,815 कोटींचे रेकॉर्डब्रेक उत्पन्न

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI