After Death | हे महत्त्वाचंय! मृत्यूनंतर तुमच्या Aadhaar आणि Pancardचा गैरवापर झाला तर…

पॅनकार्ड आणि आधार कार्ड या जिवंत असताना लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण मृत्यू झाल्यानंतर तर तुमच्या आधार आणि पॅनकार्डचा गैरवापर झाला तर..? अर्थात तसं काही होऊ नये म्हणून वेळीच महत्त्वाची गोष्टी करुन घेणं गरजेचंय.

After Death | हे महत्त्वाचंय! मृत्यूनंतर तुमच्या Aadhaar आणि Pancardचा गैरवापर झाला तर...
आधार कार्ड पॅन कार्ड
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 5:36 PM

मुंबई : आधार (Aadhaar) आणि पॅनकार्ड (Pancard) ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मोबाईलचं सिमकार्ड घेण्यापासून ते बँकेत अकाऊंट (Bank Account) काढण्यापर्यंत आधारकार्ड आणि पॅनकार्ड लागतच. कायदेशीर कामांना आधार आणि पॅनकार्डशिवाय कामं पूर्ण होतच नाहीत. जिवंत असताना अत्यंत महत्त्वाचं असणारं पॅन आणि आधारकार्ड हे मृत्यूनंतरही महत्त्वाचंय. कारण मृत्यूनंतर (After Death) तुमच्या पॅन आणि आधारकार्डचा गैरवापर होण्याची दाट भीती असते. गेल्या काही महिन्यांपासून या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढही झाल्याचं समोर आलंय. आयकर विभागानं जीएसटी चोरीच्या प्रकरणांमध्ये केलेल्या कारवायांनंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे. चौकशीअंती बोगस पॅन नंबर आणि कागदपत्रांच्या आधारे एक कंपनी (Bogus Firm) तयार करण्यात आल्याचं उघड झालं. आश्चर्याची गोष्ट जो बनावट पॅन नंबर कंपनी तयार करण्यासाठी वापरण्यात आला होता, तो नंबर ज्या व्यक्तीचा होता, ती व्यक्ती जिवंतच नव्हती! मृत व्यक्तीच्या नावावर बनवण्यात आलेल्या कंपनीच्या माध्यमातून लाखो रुपयांचा कर चुकवण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली.

या घटनेनंतर मृत व्यक्तीच्या डॉक्युमेन्ट्सचा गैरवापर सहज शक्य असल्याचं अधोरेखित झालं. त्यामुळे असे डॉक्युमेन्ट्स (Documents) नीट जपले नाहीत, तर मृत व्यक्तीचे नातलग मोठ्या अडचणीत येण्याचीही भीती असते. अशावेळी एक स्वाभाविक प्रश्न कुणालाही पडेल! मृत व्यक्तीच्या पॅन, आधार किंवा वोटिंग कार्डचा करायचं तरी काय? चला तर मग याबाबत जाणून घेऊयात…

पॅन कार्डची विल्हेवाट कशी लावायची? (How to dispose Pancard after death)

तर मंडळी पॅन कार्डची विल्हेवाट लावायची म्हणजे, ते कापून फेकून द्यायचं, किंवा जाळायचं किंवा त्याचे तुकडे करायचे, असं काहीही करायचं नाही. पॅन कार्ड हे इनकम टॅक्स म्हणजेच आयकर विभागाचं एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेन्ट आहे. वित्तीय कामकाजासाठी पॅनकार्डचा वापर होतो. पॅननंबर आपल्या आपल्या डी-मॅट अकाऊंट, बँक खातं आणि आधारसोबत लिंक केला जातो. अशा वेळी कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील सदस्याला मृत व्यक्तीचं पॅनकार्ड डीएक्टीव्हेट करण्याची सोय करण्यात आलेली आहे. यालाच पॅन सरेंडर करणं असं म्हणतात.

पॅन नंबर सरेंडर करण्यासाठी आयकर विभागाला संपर्क करावा. सरेंडर करण्याआधी मृत व्यक्तीच्या सर्व अकाऊंन्ट्स दुसऱ्या एका व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर करुन तेही बंद करावेत. अर्था ट्रान्सफरनंतर सर्व रक्कम किंवा रिफंड खात्यात जमा होत नाही, तोपर्यंत पॅननंबर सरेंडर करु नये!

वोटिंग कार्डचं (Voting Card) काय करायचं?

दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे वोटिंग कार्ड! मृत व्यक्तीचं वोटिंग कार्ड रद्द केलं नाही, तर त्याद्वारे बोगस मतदान होण्याचा धोका असतो. भूतनाथ रिटर्न सिनेमा तर तुम्ही पाहिला असेलच. त्यामध्ये भूत बनलेल्या अमिताभसारखं वोटिंग फक्त त्या सिनेमातच होऊ शकतं. खऱ्याखुऱ्या आयुष्यात नाही. त्यामुळे मृत व्यक्तीचं वोटिंग कार्ड रद्द करणं महत्त्वाचं असतं आणि अनिवार्यही! त्यामुळे वोटिंग कार्ड रद्द करण्यासाठी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना निवडणूक कार्यालयात जाऊन फॉम-7 भरावा लागतो. त्यासाठी डेथ सर्टिफिकेट (Death Certificate) अर्थात मृत्यू प्रमाणपत्राची गरज लागते.

आधार कार्डला निराधार कसं कराल?

तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेन्ट असलेल्या आधार कार्डबाबत भरपूर सतर्कता बाळगण्याची गरज आहे. मृत्यूनंतर आधार कार्डचा गैरवापर होऊ नये यासाठी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी विशेष खबरदारी बाळगायला हवी. अर्थात यूनिक आयडेंटिफिकेशन आयटीमुळे आधार कार्ड रद्द केलं जाऊ शकत नाही. पण ते ब्लॉक निश्चितच केलं जाऊ शकतं. त्यासाठी uidai.gov.in या संकेतस्थळावर जाऊन काही औपचारीकता पार पाडावी लागते. My Aadhaar मधील आधार सर्विसेज सेक्शनमध्ये आधार लॉक आणि अनब्लॉक हे पर्याय वापरता येऊ शकतात.

कसं करायचं आधार ब्लॉक? (How to block Adhaar Card?)

Lock and Unblock वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Lock UID आणि Unlock UID असे दोन पर्याय दिसतील, त्यातील लॉ युआयडीवर क्लिक करावं. यनंतर 12 अंकी आधार कार्ड नंबर , नाव आणि आपला पिनकोडही आपल्याला टाकावा लागले. त्यानंतर स्क्रिनवर दिसणाऱ्या सिक्युरीटी कोडचा वापर केल्यानंतर ओटीपी किंवा टी-ओटीपी ऑप्शन दिसतील. त्यापैकी गरजेप्रमाणे एकावर क्लिक करुन मृत व्यक्तीचं आधार कार्ड तुम्हाला ब्लॉक करता येऊ शकते.

जर वरील सर्व गोष्टींची खबरदारी बाळगली, तर मृत व्यक्तीच्या महत्त्वाच्या डॉक्युमेन्ट्सचा गैरवापर होण्यापासून टाळता येतील. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या अडचणींनाही कायमचा पूर्णविराम लावता येऊ शकेल. अडचणीत आल्यानंतर चिंता करत बसण्याआधी आधीच खबरदारी घेतली, तर अनेक गोष्टी सोप्या होऊन जाती आणि सुरक्षितही राहतील!

संबंधित बातम्या – 

Cidco Lottery | 2022 | घर घेण्याचं स्वप्न होणार साकार, सिडको स्वस्तात घर विकणार?

तुमच्या नावावर बोगस सीम कार्ड तर नाही? घरबसल्या माहिती मिळवा, अन्यथा कारवाईची भीती

आता तुम्हीही गॅस कनेक्शन सहज ट्रान्सफर करू शकता; या स्टेप्स करा फॉलो

इनकम टॅक्स रिटन भरताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; अन्यथा होऊ शकते नुकसान

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.