Bank Account : KYC अपडेट न केल्याने आले संकट, असे पुन्हा सुरु करा बँक खाते

Bank Account : जर तुम्ही बँक खात्यात केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमचे बँक खाते बंद झाले असेल तर आता काय करावे, असा प्रश्न खातेदारांना पडला असेल. त्यावर उपाय आहे. तो केला तर तुमचे बँक खाते पुन्हा सुरु करता येईल. त्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.

Bank Account : KYC अपडेट न केल्याने आले संकट, असे पुन्हा सुरु करा बँक खाते
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 7:31 PM

नवी दिल्ली | 10 सप्टेंबर 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) बनावट खाते ओळखण्यासाठी आणि बोगसगिरीला चाप लावण्यासाठी खास मोहिम सुरु केली आहे. त्यात अनेकदा ग्राहकांना त्यांचे केवायसी कागदपत्रे (KYC Document) जमा करण्यास सांगण्यात येते. बँका वेळोवेळी ग्राहकांना याविषयीची माहिती देतात. ई-मेल, एसएमएस याद्वारे ही माहिती देण्यात येते. बँका ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने केवायसी अपडेट करतात. पण त्यासाठी बँका कोणतीही लिंक पाठवत नाहीत. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येते अथवा जवळच्या शाखेत जाऊन कागदपत्रे जमा केल्यास केवायसी अपडेट होते. पण ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यांचे खाते बंद होते. अशावेळी हे खाते कायमचे बंद (Account Block) झाले आहे की काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. पण असे नसते. तुम्हाला या पद्धतीने ही खाते पुन्हा सक्रिय करता येते.

प्रत्येक ग्राहकाला केवायसी महत्वाचे

प्रत्येक ग्राहकाला केवायसी महत्वाचे असते. केवायसी प्रक्रिया प्रत्येक कॅटेगिरीतील ग्राहकांसाठी वेगवेगळी असते. अतिजोखीम असणाऱ्या ग्राहकांसाठी दोन वर्ष, मध्यम जोखीम घेणाऱ्या ग्राहकांसाठी 8 वर्षे तर कमी जोखीम असणाऱ्या ग्राहकांना 10 वर्षांतून एकदा केवायसी करणे आवश्यक आहे. ज्यांचा जास्त व्यवहार त्यांच्यासाठी दोन वर्षात एकदा केवायसी अपडेट करणे आवश्यक असते. कारण हँकर्स त्यांच्या खात्यावर लक्ष ठेऊन असतात.

हे सुद्धा वाचा

आरबीआयचे म्हणणे काय

भारतीय रिझर्व्ह बँकेने 4 मे 2023 रोजी यापूर्वीचे 29 मे 2019 रोजीचे परिपत्रक अपडेट केले आहे. जर कोणताही ग्राहक त्यांचे पॅन अथवा फॉर्म 16 देणार नाही, त्यांचे खाते बंद करण्यात येईल. अर्थात बँक थेट तुमचे खाते बंद करत नाहीत. त्यासाठी अगोदर तुम्हाला एसएमएस अथवा ई-मेल पाठविण्यात येईल. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

कसे करता येईल खाते सक्रिय

  1. केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमचे खाते बंद होऊ शकते. हे खाते तुम्हाला सक्रिय करता येते. आरबीआयनुसार, सर्व बँकांमध्ये बंद खाते पुन्हा सुरु करता येते. ते पुन्हा सक्रिय करता येते. त्यासाठीची प्रक्रिया सर्वच बँकेत एकच आहे. कागदपत्रे सादर केलीत तर संबंधित बँक काही तासातच तुमचे खाते पडताळा करुन सक्रिय करते.
  2. तुमचे बँक खाते बंद झाले असेल तर बँका तुमच्याकडे त्या खात्यासंबंधीची माहिती आणि केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रांची मागणी करतात. कागदपत्रांची पुर्तता केली तर प्रक्रिया पूर्ण करुन लागलीच हे खाते सक्रीय होते.
  3. बँक ऑफ बडोदानुसार, ग्राहक केवायसी दस्तावेज, री-केवायसी फॉर्म संबंधित बँकेत जमा करु शकतो. आता आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे, व्हिडिओ कॉलद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरुन, कागदपत्रे जोडून खाते सक्रिय करता येते.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.
बापच बाजी मारणार, आत्रामांच्या मुलीचा पवार गटात प्रवेश अन् कोणाचा दावा
बापच बाजी मारणार, आत्रामांच्या मुलीचा पवार गटात प्रवेश अन् कोणाचा दावा.
लाडक्या गौरी-गणपती बाप्पाला आज निरोप देताना पाऊस कोसळणार?
लाडक्या गौरी-गणपती बाप्पाला आज निरोप देताना पाऊस कोसळणार?.
महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीवर काही शिजतंय? शिंदेंच्या नेत्याचं वक्तव्य
महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीवर काही शिजतंय? शिंदेंच्या नेत्याचं वक्तव्य.
पण आम्ही पवार साहेबांच्या लेखी वाईट, दादांच्या समर्थकाचं पत्र व्हायरल
पण आम्ही पवार साहेबांच्या लेखी वाईट, दादांच्या समर्थकाचं पत्र व्हायरल.
विविध सर्व्हे अन् आकडे वेग-वेगळे? सत्ताधारी-विरोधक आनंद दोन्हीकडे?
विविध सर्व्हे अन् आकडे वेग-वेगळे? सत्ताधारी-विरोधक आनंद दोन्हीकडे?.
तर भारतात आरक्षण रद्द करु...काय म्हणाले राहुल गांधी
तर भारतात आरक्षण रद्द करु...काय म्हणाले राहुल गांधी.
मराठ्यांत फूट पाडणाऱ्या आमदारांनो... जरांगे यांनी काय दिल इशारा
मराठ्यांत फूट पाडणाऱ्या आमदारांनो... जरांगे यांनी काय दिल इशारा.
बारामतीतून कोण लढणार ? सुप्रिया सुळे यांनी दिले उत्तर
बारामतीतून कोण लढणार ? सुप्रिया सुळे यांनी दिले उत्तर.