Indian Railway Fact : रेल्वे ट्रॅकवर या अनुकुचीदार दगडांचे काम तरी काय? कशासाठी होत असेल बरं यांचा वापर

Indian Railway Fact : देशात दररोज हजारो रेल्वे ट्रॅकवरुन धावतात. लाखो प्रवाशी भारतात दररोज प्रवास करतात. रेल्वे ट्रॅकवर दगडांचा हा खच्च पाहून त्यांना नेहमी प्रश्न पडतो की हा रुळावर या दगडांचे काम तरी काय?

Indian Railway Fact : रेल्वे ट्रॅकवर या अनुकुचीदार दगडांचे काम तरी काय? कशासाठी होत असेल बरं यांचा वापर
या दगडोबाचं काय काम
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 5:30 PM

नवी दिल्ली : देशात रेल्वेतून प्रवास (Railway Journey) करणे सर्वात आरामदायकच नाही तर किफायतशीरही मानण्यात येते. देशात दररोज हजारो रेल्वे ट्रॅकवरुन (Railway Track) धावतात. लाखो प्रवाशी भारतात दररोज प्रवास करतात. प्रवास करताना प्रवाशांना एक प्रश्न नक्की पडला असेल की, रेल्वे रुळावर दगड (Stone on Railway Track) का टाकतात, हे दगड अंथरुन काय फायद होत असेल? ट्रॅकवर दगड टाकले नाही तर त्याने कोणती आपत्ती, संकट ओढावेल. विशेष म्हणजे यातील अनेक दगड अनुकुचीदार असतात. त्यामुळे या दगड पुराणाबद्दल अनेक प्रवाशांना कायम प्रश्न पडतो. त्याचा फायदा काय असू शकतो, हा प्रश्न त्यांच्या मनात घोळत असतो.

रेल्वे ट्रॅकवर (Railway Track) टाकण्यात येणारे दगड हे रुळावरील गिट्टी (Track Ballast) असते. दगड आंथरण्यामागे कारणे आहेत. या दगडांमुळे ट्रॅकच्या खालील पट्टी म्हणजेच स्लीपर्स पसरत नाही. रेल्वे सूसाट धावत असल्याने ट्रॅकवर मोठ्या प्रमाणावर कंपन होतात. ट्रॅकमधील गिट्टीमुळे कंपन कमी होऊन, धक्के कमी बसतात. रेल्वे ट्रॅकवर गिट्टी पडल्याने त्याठिकाणी गवत अथवा इतर झाड उगवत नाही.

रेल्वे ट्रॅकवर अनुकुचीदार दगडांचाच वापर करण्यात येतो. यामागे एक खास कारण आहे. खरेतर अनुकुचीदार दगड स्लीपर्सला चिकटून राहतात. त्यांना पसरु देत नाही. अनुकुचीदार दगडांऐवजी जर गोल दगड ठेवले तर ते रेल्वेच्या धावण्याने बाहेर फेकल्या जातील. त्यामुळे स्लीपर पसरेल आणि ट्रॅक वाढण्याची भीती राहते.

हे सुद्धा वाचा

रेल्वे स्थानकाच्या छतावर आता रुफ प्लाझा (Roof Plaza) सुरु करण्यात येणार आहे. याठिकाणी प्रवाशांना खाद्य पदार्थांचा तर आस्वाद घेताच येईल, पण त्यांना खरेदीचाही आनंद लुटता येईल.रेल्वे स्टेशन आधुनिक करण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. त्यादृष्टीनेच आता रेल्वे स्टेशनवर रुफ प्लाझा होणार आहे. यामध्ये वेटिंग एरिया, स्थानिक उत्पादने, फुड कोर्ट, मुलांच्या खेळण्याचे ठिकाण, इतर वस्तूंची खरेदी करता येईल.

सुरुवातीला देशातील 50 रेल्वे स्थानकांवर रुफ प्लाझा सुरु करण्यात येणार आहे. याविषयीचा आढावा आणि डिझाईन पंतप्रधानांना दाखविण्यात आले. पण त्यांनी त्यावर पूर्ण समाधान व्यक्त केले नाही. पुढील 50 वर्षांतील बदल लक्षात घेऊन हा प्रकल्प हाती घेण्यात यावा अशी सूचना त्यांनी केली. त्यामुळे आता डिझाईनमध्ये बदल करण्यात येणार आहे.

गेल्या महिन्यात कॅबिनेटची बैठक झाली. त्यात देशातील रेल्वे स्टेशनच्या पूनर्निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनचा कायपालट होणार आहे. रेल्वे स्टेशनचा विमानतळाच्या धरतीवर विकास करण्यात येणार आहे. विमानतळावर एकाबाजूने आत येता येईल. तर दुसऱ्या बाजूने बाहेर पडता येईल. त्यामुळे गर्दी होणार नाही. तर 2026 पर्यंत देशात बुलेट ट्रेन (Bullet Train) धावण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.