रेल्वे प्रवाशांसाठी IRCTC ची विशेष सुविधा; तिकीट कॅन्सल केल्यावर लगेच मिळणार रिफंड

Railway Ticket Booking | त्यासाठी IRCTC IPay सुविधेचा वापर केला जाऊ शकतो. IRCTC पोर्टलवर 'ऑटो पे' आणि 'आय-पे', असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. त्यामुळे यूपीआय बँक खात्याच्या माध्यमातून पैसे लवकर मिळण्यास मदत होते.

रेल्वे प्रवाशांसाठी IRCTC ची विशेष सुविधा; तिकीट कॅन्सल केल्यावर लगेच मिळणार रिफंड
irctc

मुंबई: कोरोनाच्या काळात अनेक एक्स्प्रेस ट्रेन अचानक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे तिकीटाचे पैसे अडकून पडल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अनेक प्रवाशांनी स्वत:हून तिकीटं रद्द केली होती. ऑनलाईन तिकीट बुक (Online Ticket Booking) केले असेल तर ते रद्द झाल्यास पैसे परत मिळण्यासाठी प्रवाशांना 48 ते 72 तास वाट पाहावी लागते. मात्र, आता IRCTC ने रेल्वे प्रवाशांसाठी नवी सुविधा सुरु केली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना रिफंडचे पैसे तात्काळ मिळू शकतात. (Indian Railway IRCTC rules passanger may get full refund on cancellation of train know process)

त्यासाठी IRCTC IPay सुविधेचा वापर केला जाऊ शकतो. IRCTC पोर्टलवर ‘ऑटो पे’ आणि ‘आय-पे’, असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. त्यामुळे यूपीआय बँक खात्याच्या माध्यमातून पैसे लवकर मिळण्यास मदत होते.

वेळेची बचत होणार

या नव्या सुविधेमुळे तात्काळ बुकिंगचे पैसे रिफंड मिळण्याचा कालावधी कमी होईल. वेटिंग लिस्टमध्ये असलेले प्रवाशी अनेकदा रिफंडसाठी लागणार वेळ बघता तिकीट लवकर रद्द करतात. मात्र, आता यूपीआय बँक खात्याच्या वापरामुळे प्रवाशाचे तिकीट कन्फर्म झाल्यानंतर पैसे कापले जातील.

काही दिवसांपूर्वीच IRCTC कडून तिकिटांचे आरक्षण वेगाने करण्यासाठी www.irctc.co.in हे संकेतस्थळ अपग्रेड केले होते. त्यानंतर आता IRCTC-iPay हा पेमेंट गेटवे सुरु करण्यात आला आहे.

रेल्वे स्टेशनवर स्क्रीनिंगवेळी शरीराचे तापमान जास्त असल्यास पाठवणार घरी; रिझर्व्हेशनचे पैसे परत मिळणार

देशातील कोरोनाची दुसरी साथ नियंत्रणात आली असली तरी रेल्वे प्रशासनाकडून अजूनही प्रचंड खबरदारी घेतली जात आहे. सध्या रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्यांतील प्रवासासाठी सोशल डिस्टन्सिंगचे अनेक नियम आखून दिले आहेत. रेल्वे स्थानकात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे स्क्रीनिंग केले जात आहे. त्यानंतर शरीराचे तापमान योग्य असेल तरच प्रवाशांना आतमध्ये प्रवेश दिला जात आहे.

रेल्वे तिकीट बुक केल्यानंतरही प्रवाशी अनफिट असल्यास त्यांना थेट घरी पाठवले जात आहे. रेल्वेकडून अशा प्रवाशांच्या तिकीटाचे पैसेही परत केले जात आहेत. त्यासाठी प्रवासाच्या दिवसापासून 10 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला टीडीआर फाईल करावा लागेल. त्यानंतर टीटीई सर्टिफिकिटी सादर करुन प्रवाशी आपले पैसे परत मिळवू शकतात.

तुम्ही रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर स्क्रीनिंगमध्ये अनफिट आढळलात तर तुम्हाला प्रवास करता येणार नाही. तुम्ही कुटुंबीय किंवा मित्र-मैत्रिणींसोबत बाहेरगावी जाणार असाल. मात्र, रेल्वे स्थानकात गेल्यावर तुमच्यापैकी एकजण स्क्रीनिंगमध्ये अनिफट आढळला तर सर्व लोकांचे पैसेही रिफंड मिळू शकतात.

संबंधित बातम्या:

Mumbai | Central Railway | तिकीट कन्फर्म असेल तरच गावी जाण्यासाठी परवानगी, मध्य रेल्वेचा निर्णय

आता रेल्वेचं तिकिट बुक करणं आणखी सोपं, IRCTC कडून नवं फिचर लाँच

(Indian Railway IRCTC rules passanger may get full refund on cancellation of train know process)