Hindusthan Uniliver : एचयूएलच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलीये? मग ही माहिती वाचाच, जाणून घ्या शेअर्स घसरणीमागील कारणे

सध्या एचयूएल म्हणजेच Hindusthan Uniliver च्या शेअर्समध्ये घसरण सुरू आहे. आज आपण त्यामागील नेमकी कारणे जाणून घेणार आहोत.

Hindusthan Uniliver : एचयूएलच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलीये? मग ही माहिती वाचाच, जाणून घ्या शेअर्स घसरणीमागील कारणे
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 5:40 AM

एचयूएल म्हणजेच Hindusthan Uniliver हा तुमच्या माझ्या आणि प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. खाद्यपदार्थांपासून ते आंघोळीच्या उत्पादनांपर्यंत प्रत्येक कुटुंब हे एचयूएलद्वारे बनवले जाणारे उत्पादन वापरत असते. त्याचप्रमाणे एचयूएल उत्पादने (Product) वापरण्याव्यतिरिक्त अनेकजण एचयूएल मध्ये गुंतवणूक (Investment) देखील करत असतात. त्यामुळे अशा लोकांसाठी आम्ही ही माहिती घेऊन आलो आहोत. एचयूएल मध्ये गुंतवणूक करावी असा आमचा बिलकूल उद्देश नाही. गुंतवणूकदार म्हणून देशातील सर्वात मोठ्या (FMCG) कंपनीची माहिती देणे हाच मुख्य उद्देश आहे. एचयूएलच्या शेअर्समध्ये घसरण पहायला मिळत आहे.11 मार्च रोजी एचयूएलचा शेअर 2096 रुपयांवर घसरल, यासोबतच त्याने 52 आठवड्यांची नीचांकी पातळी गाठली, एवढ्या मोठ्या कंपनीच्या शेअरमध्ये एवढी पडझड झाल्यानंतर हृदयाचे ठोके वाढू शकतात. जेव्हा असे घडते तेव्हा काही लोक घाबरतात, तर काही लोक याकडे खरेदीची संधी म्हणून पाहतात.

एचयूएलची बलस्थाने

इथेच एचयूएलची कथा रंजक बनते. पहिल्यांदा एचयूएलच्या शेअर्सच्या किमतीवर एक नजर टाकूयात. गेल्या वर्षी 21 सप्टेंबर रोजी एचयूएलचा शेअर 2859 रुपयांवर ट्रेड करत होता. मग एचयूएलच्या शेअरची किंमत अशी का घसरली? यासाठी कंपनीच्या चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टी समजून घेऊयात. पहिली गोष्ट म्हणजे एचयूएल ही देशातील सर्वात मोठी एफएमजी कंपनी आहे. कंपनीचे 8० टक्यांपेक्षा जास्त ब्रँड मार्केट लीडर आहेत. परंतु यात नीचांकी पातळीवर पोहोचण्याचे कारण काय असू शकते ? एक मोठे वितरण नेटवर्क, 50 हून अधिक ब्रँड आणि मोठ्या प्रमाणात जाहिरात ही एचयूएलची बलस्थाने आहेत. त्यांच्या 14 ब्रँडची वार्षिक कमाई प्रत्येकी 1000 कोटींपेक्षा जास्त आहे. कंपनीचे कारखाने देशभर पसरलेले असल्याने मालवाहतुकीचे शुल्कही वाचण्यास मदत होते. प्रायसिंग पॉवरमुळे उत्पादन खर्च वाढल्यास उत्पादनांची किंमत वाढते. इनपुट कॉस्ट म्हणजेच उत्पादनाचा खर्च वाढला तरीही किंमतीतील वाढ आणि खर्चातील कपात यामुळे कंपनीला जास्त मार्जिन मिळते. जीएसके हेल्थकेअरमध्ये विलीनीकरणामुळे फूड सेगमेंटमध्येही कंपनीचा दबदबा असणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे कंपनीवर कोणतेही कर्ज नाही.

कंपनीचे शेअर्स का घसरले?

आतापर्यंत आपल्याला कंपनीची कामगिरी चांगली असलेली दिसून येते. आता आपण कंपनीच्या नफ्यातील वाढ कमी करणारे घटक पाहूयात. गेल्या तीन त्रैमासिकात, कंपनीची व्हॉल्यूम ग्रोथ कमी होत आहे. तसेच गेल्या तीन महिन्यातील ओमिक्रॉन, रशिया-युक्रेन युद्ध आणि परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा कमी झाल्यामुळे कामगिरी खराब झाली आहे. ग्रामीण भागात विक्री कमी झाल्याने कंपनीची चिंता वाढली आहे. आगामी काळात वस्तूंच्या वाढत्या किमती कंपनीसाठी अडचणी निर्माण करू शकतात. विदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा कमी होणे देखील कंपनीसाठी धोकादायक आहे. याशिवाय कंपनीला खडतर स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. साबणांपासून पर्सनल केअर प्रॉडक्टमध्ये स्पर्धा सुरू आहे. व्हॉल्यूम ग्रोथच्या आकड्यांमधून हे दिसून येते. त्यामुळे शेअसर्समध्ये सध्या घसरण सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची झाल्यास ब्रोकरकडून तुम्ही सल्ला घेऊ शकता. बहुतेक ब्रोकर हे एचयूएलमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सल्ला देतात. कारण त्यांना आजूनही शेअर्स वाढीची अपेक्षा आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.