PM घरकुल योजना : तुमचं आतापर्यंतच्या यादीत नाव नाही? वाचा काय आहेत कारणं

ज्यांचं पंतप्रधान घरकुल योजनेच्या यादीत नाव आलं नाही त्यांनाही यामागील कारण समजलेलं नाही. त्यामुळेच तुमचं यादीत नाव का नाही हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

PM घरकुल योजना : तुमचं आतापर्यंतच्या यादीत नाव नाही? वाचा काय आहेत कारणं
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 10:59 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत (PMAY) आर्थिक मागास वर्गातील नागरिकांना घर बांधण्यासाठी अनुदान दिलं जातं. यामुळे अनेकांना आपलं हक्काचं घर बांधण्यासाठी मदत झालीय. मात्र, असेही अनेक लोक आहेत ज्यांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज केलाय मात्र अद्याप त्यांचं या योजनेच्या लाभार्थी यादीत नाव आलं नाहीये. ज्यांचं या यादीत नाव आलं नाही त्यांनाही यामागील कारण समजलेलं नाही. त्यामुळेच तुमचं यादीत नाव का नाही हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तसं झालं तरच तुम्हाला अपूर्ण बाबी पूर्ण करुन या योजनेचा लाभ घेता येईल (Know why your name not came in beneficiary list of PMAY).

पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत सरकार पहिल्यांदा घर बांधणाऱ्या आर्थिक मागास घटकातील कुटुंबाला 2.67 लाख रुपयांचं अनुदान देतं. देशातील प्रत्येक राज्यातून हजारो लोक यासाठी अर्ज करतात. मात्र, यादीत नाव येण्यासाठी काही अटी आणि निकष पूर्ण करणं गरजेचं असतं. या अटी आणि निकष काय आहेत याचा हा खास आढावा.

योजनेच्या लाभार्थी यादीत नाव न येण्याची कारणं

  • अर्ज भरताना चुकीची माहिती भरली जाणं
  • पीएम घरकुल योजनेत नाव येण्यासाठी या आधी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसणं बंधनकारक
  • संपत्तीच्या मालकीत पुरुषांसह महिलांचंही नाव असणं आवश्यक
  • कुटुंबाचं उत्पन्न 3 लाख, 6 लाख आणि 12 लाख रुपये या 3 श्रेणींपैकी असावं

पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं?

  • वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपर्यंत असणाऱ्या आर्थिक मागास घटकातील कुटुंब
  • वार्षिक उत्पन्न 3 लाख ते 6 लाख रुपयांपर्यंत असलेलं कुटुंब
  • मध्यम उत्पन्न गट I – उत्पन्न 6 लाख ते 12 लाख रुपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न असलेलं कुटुंब
  • मध्यम उत्पन्न गट II – 6 लाख ते 12 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेलं कुटुंब
  • EWS आणि LIG वर्गातील महिला
  • अनुसुचित जाती, जमाती आणि इतर मागास वर्ग (OBC)

योजनेसाठी अर्ज कसा कराल?

मोबाईल अॅपमधून सर्वात सोप्या पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करता येतो. यासाठी तुम्हाला तुमच्या अँड्रॉईड मोबाईलवर गुगल प्ले स्टोअरमधून प्रधानमंत्री आवास योजना अॅप (Pradhan Mantri Aawas Yojana App) डाऊनलोड करावं लागेल. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरच्या मदतीने नोंदणी करावी लागेल. नोंदणी करताना तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल. त्याचा उपयोग करुन तुम्ही लॉगिन करा. त्यानंतर नाव, पत्ता, आधार नंबर, उत्पन्न आणि इतर आवश्यक माहिती भरुन अर्ज करा.

यादीत नाव आहे की नाही कसं तपासाल?

पीएम आवास योजनेसाठी अंतिम झालेल्या यादीत तुमचं नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला पीएमएवायच्या अधिकृत वेबसाईट https://pmaymis.gov.in/ वर जावं लागेल. तेथे ‘सर्च बेनिफिशियरी’ पर्यायावर क्लिक केलं की तुम्हाला तुमचं नाव टाकून यादी तपासता येईल.

हेही वाचा :

घर खरेदीसाठी मान्सून सगळ्यात चांगली वेळ, कधीही फसवणूक होणार नाही, कारण काय?

एसआरए प्रकल्पातील झोपडी पाडल्यापासून 5 वर्षांनी घरं विकता येतील : जितेंद्र आव्हाड

PNB आणि SBI बँकेकडून मालमत्तांचा लिलाव; घर आणि दुकाने स्वस्तामध्ये खरेदी करण्याची नामी संधी

व्हिडीओ पाहा :

Know why your name not came in beneficiary list of PMAY

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.